Skin tea for all problems: आपण चेहऱ्यावर लावण्यासाठी क्रीम, लोशन व मास्कसंबंधी ऐकले आहे; पण स्किन टी एक नवीन उपाय समोर आला आहे. या उपायाने फक्त त्वचेसाठीच नव्हे, तर तुमच्या केसांसाठीसुद्धा फायदे होण्याचा दावा केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कन्टेन्ट क्रिएटर डॉली शाह यांच्या पोस्टनुसार, ही उत्तम स्किन टी अनेक प्रकारे फायद्याची ठरू शकते, जसे की पिंपल्स, पिगमेंटेशन, (त्वचा अधिक काळी पडणे) काळे डाग, केसगळती थांबवणे आणि वयाच्या आधी केस पांढरे होण्यापासून वाचवणे इत्यादी. “हे खास माझ्याद्वारे चाचणी करून तयार केले गेले आहे,” अशी आपल्या माहितीची पुष्टी करताना तिने म्हटले आहे.

हेही वाचा… वायू प्रदुषणामुळे तुमच्याही डोळ्यांना त्रास होतोय? मग अशाप्रकारे घ्या काळजी, तज्ज्ञ सांगतात…

शाह पुढे म्हणाली, “यात वापरलेला प्रत्येक घटक हा जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडन्ट्स यांचे पॉवरहाऊस आहे. त्यात अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत. त्यामुळे तुमचे रक्त शुद्ध होते आणि हार्मोन्सवर नियंत्रण ठेवते. परिणामी ही स्किन टी तुमच्या प्रत्येक त्वचेच्या समस्येवर उपचार करू शकते.”

ही आहे स्किन टीची रेसिपी

३ धागे – केसर
६ पाकळ्या – वेलची
१ चमचा – तूप
आल्याचे तुकडे
ज्येष्ठमध (लिकोरिस)

पद्धत

*उकळलेले पाणी (सुमारे १ ते १.५ कप घ्या)
*केसर, वेलची, तूप, आले व ज्येष्ठमध घाला.
*हे मिश्रण ३-४ मिनिटे उकळू द्या. छान गाळून प्यायला घ्या.

हा एक प्रभावी उपाय आहे का?

डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजिस्ट व डर्मॅटो-सर्जन, दी एस्थेटिक क्लिनिक्स यांनी सांगितले की, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, एकच पेय सर्व त्वचा किंवा केसांशी संबंधित समस्यांचे मोठ्या प्रमाणात निराकरण करू शकत नाही.

“ही समस्या होण्याचं मुख्य कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार एक विशेष उपचार योजना तयार करणं आवश्यक आहे. त्वचेच्या समस्या आणि केसगळती होण्यामागे अनेक कारणं असू शकतात; जसे की जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता, आनुवंशिकता, खराब आहार, हार्मोन्सचं असंतुलन, तणाव, डिप्रेशन व काही औषधं,” असं डॉ. कपूर म्हणाल्या.

हेही वाचा… “सकाळी ब्लॅक कॉफी प्यायल्याने…”, बॉलीवूड अभिनेता वरुण धवनच्या वक्तव्यावर झाली टीका, पण तज्ज्ञ म्हणाले…

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी लोकांना त्यांच्या जीवनशैलीत काही सुधारणा करण्याचा सल्ला दिला जातो; जसे की विविध प्रकारच्या जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिनांनी भरपूर असा निरोगी आहार घेणे, पाणी पिणे, धूम्रपान किंवा मद्यपान यांसारख्या वाईट सवयी टाळणे आणि ३० मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करणे.

“जर तुमच्या केसांची आणि त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या तुमच्या जीवनशैलीत बदल केल्यानंतरही दीर्घकाळ टिकली, तर तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या,” असं डॉ. कपूर म्हणाल्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tea that will solve problem of pimples hairfall dark spots skin tea but know this expert advice dvr