जन्म मृत्यूबद्दल माणसाला नेहमीच कुतूहल राहिलेलं आहे. विशेषतः मृत्यूनंतर काय होतं, मृत्यू येतो तेव्हा माणसांना काय वाटतं, काय जाणवतं हे सगळे प्रश्न माणसांना सतत पडत असतात. पण क्वचितच कुणी या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतं. एकतर मृत्यूबद्दल कितीही कुतूहल असलं तरीही भीती असतेच. माध्यमांच्या विविध परिणामांमध्ये वास्तव आणि आभास यातली सीमारेषा धूसर होत जाणं हा मोठा दुष्परिणाम अनेकदा नोंदवला जातो. शक्तिमान आपल्याकडे आलं होतं तेव्हा लहान मुलांमध्ये शाक्तिमान सारखं वागण्याचा ट्रेंड होता. शक्तिमान ज्या गोष्टी करतो त्या आपणही कराव्यात असं वाटणारी अनेक मुलं त्या काळात होती. शक्तिमान प्रमाणे वागू नका, ते सगळं खरं नाहीये असं सांगण्याची वेळ तेव्हा पालक आणि शिक्षकांवर आली होती. आपल्या लाडक्या हिरो किंवा हिरॉइनचा सिनेमा बघितल्यावर अनेकदा तरुणतरुणींची देहबोली काही काळासाठी बदलते. हा त्या माध्यमाचा आणि त्यांच्या लाडक्या आयडॉलचा त्यांच्यावर झालेला परिणाम असतो. अनेकदा हत्येसारख्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार माध्यमातल्या कुठल्यातरी सिनेमा नाहीतर सीरिअलमधून तपशील उचलून मग त्यानुसार खून प्लॅन करतो असं दिसून आलेलं आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील जिथे माध्यमे माणसांवर प्रभाव टाकतात. त्यांच्या वर्तनावर आणि विचार करण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकतात.

अशीच एक अतिशय खळबळजनक घटना दक्षिण कोरियात घडली. वीस वर्षीय जंग यु जुंग ‘ट्रू क्राईम’ या मनोरंजन प्रकारची चाहती होती. सिनेमे, सीरिअल्स, पॉडकास्ट या सगळ्या गोष्टी ती नियमित बघत, ऐकत असे. माणसाला मृत्यू येतो तेव्हा काय होतं हे समजून घेण्यासाठी तिने २६ वर्षीय महिलेला १०० वेळा भोसकले. तिने हे का केलं याची जेव्हा चौकशी झाली तेव्हा तिने कुतूहलापोटी तो खून केला असल्याचं पुढे आहे. आपलं सावज हेरण्यासाठी तिने इंग्लिश शिक्षिका एका एपवर शोधली. भुसान मधून तिला एक शिक्षकाही मिळाली. आपण शालेय विद्यार्थिनी आहोत असं दाखवत ती शिक्षिकेच्या घरी गेली आणि तिला भोसकलं आणि महिलेचा मृतदेह एका नदीकाठच्या बागेत टाकून दिला. टॅक्सीचालकानी पोलिसांना फोन केल्यावर सगळा प्रकार पुढे आला.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Baba Siddique murder Accused Arrested
Baba Siddique Murder : मुंबई पोलिसांची दंगल उसळलेल्या जिल्ह्यात २५ दिवस शोधमोहिम; बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणातील आरोपीला नेपाळ सीमेजवळ बेड्या
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘ट्रू क्राईम’ स्टोरी प्रकारातले मनोरंजन बघता बघता, पॉडकास्ट ऐकता ऐकता आपणही खून करुन बघावा असं तिला वाटलं आणि कुतूहलापोटी तिने ते केलंही. हा सगळाच अतिशय धक्कादायक प्रकार आहे. माध्यमांचा माणसांच्या विचारांवर, मानसिकतेवर परिणाम होत असतो. विशेषतः मुलांच्या बाबतीत तर हे घडण्याची दाट शक्यता असते.

गेमिंग करत असताना आपण जे नाही तो अवतार घेऊन एक प्रकारे खऱ्या आयुष्यातल्या अपूर्णतेला पूर्ण करण्याचा प्रयत्नच माणसे करत असतात. सोशल मीडियावर वावरत असताना अनेकदा आपण जे एरवी करणं शक्य नाही अशा अनेक गोष्टी माणसं करत असतात. OTT असेल नाहीतर डिजिटल जगातली माध्यमे, ही सगळी माध्यमे आपल्याबरोबर चोवीस तास बारा महिने असतात. कधीही, कुठेही बघण्याची-ऐकण्याची सोय ही दुधारी तलवार आहे. याचे आपल्यावर काय आणि कसे परिणाम होतात हे न समजल्यामुळे अनेकदा आपण वाहवत जातोय हेही लक्षात येत नाही. मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांच्या बाबतीत हे होतंय, होऊ शकतेय हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या समोर असलेले सिनेमे, सीरिअल्स, पॉडकास्ट या सगळ्याचा अर्थ काय असतो, वास्तव आणि आभास यातली सीमारेषा काय असते हे समजून घेणं आणि त्याच भान जाऊ न देणं आवश्यक असतं. हे कौशल्य आहे, सजगता आहे जी विकसित करता येऊ शकते. म्हणूनच माध्यम शिक्षण आवश्यक आहे.