गाढ झोपेत असताना अनेकांना दात चावण्याची सवय असते. पण असे का होते याचे नेमके कारण त्यांना माहित नसते. हे एका आजाराचे लक्षण असु शकते. या आजाराचे नाव ब्रुक्सिज्म आहे. यामुळे ‘ऑब्सट्रक्टिव स्लीप एप्निया’ म्हणजेच झोप पुर्ण न होण्याची, श्वास घेण्यास अडचण येण्याची समस्या निर्माण होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या कारणांमुळे ब्रुक्सिज्म होऊ शकतो?
धूम्रपान, अति प्रमाणात चहा, कॉफी प्यायल्याने, तणाव, थकवा, झोप न लागणे, रागीटपणा यांमुळे ब्रुक्सिज्म होऊ शकतो.

आणखी वाचा: थंडीत सतत अंगदुखी का होते? जाणून घ्या यामागचे कारण

ब्रुक्सिज्मची लक्षणं
ब्रुक्सिज्ममुळे तोंडांचे स्नायू आणि हिरडयांमध्ये वेदना जाणवतात. तसेच सकाळी उठल्यावर डोके दुखू शकते, दातांमध्ये सेन्सिटिव्हीटी जाणवते, यामुळे थकवा, चिडचिड, ताण अशा समस्यांनाही सामोरे जावे लागते.

या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करतील मदत

  • नियमितपणे ७ ते ८ तासांची झोप घ्या.
  • जास्त चहा, कॉफी पिणे टाळा
  • ब्रुक्सिज्म असणाऱ्या व्यक्तींनी झोपताना मोबाईल, टीव्ही पाहणे टाळावे.
  • केळी, डार्क चॉकलेट, एवकॅडो, ड्राय फ्रुट्स अशा मॅग्नेशिअम जास्त असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. ज्यामुळे जबड्याला होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळेल.
  • जास्त त्रास होत असल्यास हिटिंग पॅडचा वापर करा. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला १० ते १५ मिनिटांसाठी हिटिंग पॅड ठेवा, यामुळे वेदना कमी होण्यासह, रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळेल.
  • झोपण्यापुर्वी हळदीचे दुध किंवा हर्बल चहा प्या. दुधात अँटी इनफ्लामेंटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे जबडयांना होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळेल. तसेच हर्बल चहामुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teeth grinding in sleep can be a symptom of bruxism know its symptoms and how to get rid of pain pns
Show comments