मुलांमध्ये अॅप्स डाउनलोड करण्याचं प्रमाण प्रचंड असतं. दर वेळी ते प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरमधूनच अॅप डाउनलोड करतात असं नाही, मुलं एकमेकांना वेगवेगळ्या अॅप्सच्या लिंक्स पाठवत असतात. यात प्रामुख्याने गेमिंगची अॅप्स असतात. पण या लिंक व्हेरीफाईड असतीलच असं नाही. अनेकदा या लिंक्समधून व्हायरस फोनमध्ये शिरतो. फोन हँग होणे, स्लो होणे अशा अनेक गोष्टी भलत्या सलत्या लिंक्सवरुन अॅप्स डाउनलोड केल्यामुळे होतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुलांच्या हातात फोन देताना आणि मोठ्यांच्या जगाने स्वतःही निरनिराळी अॅप्स डाउनलोड करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
१० महत्वाच्या टिप्स!
सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट कधीही कुठल्याही लिंकवरुन अॅप डाउनलोड करू नये.
मुलांना हे सांगितलं पाहिजे, कितीही भारी गेम असू देत, फुकट आहे असं लिंक बरोबरच्या मेसेजमध्ये लिहिलेलं असू देत, तरीही त्या लिंकवर क्लिक करुन गेम डाऊनलोड करण्याचा मोह टाळला पाहिजे. कारण त्यामुळे तुमचा फोन हँग होऊन, तुमचा सगळा डेटा म्हणजे फोनमधले कॉन्टॅक्ट, फोटो, व्हिडीओ आणि इतर माहिती चोरीला जाऊ शकतात.
अशा लिंक्समधून काहीवेळा हॅकर्स आपल्या फोनमध्ये बॅक डोअर एंट्री घेऊ शकतात. म्हणजे आपला फोन हॅक झालेलं आपल्याला समजत नाही, पण फोनचा संपूर्ण अॅक्सेस हॅकरला मिळालेला असतो. कुठलंही अॅप आणि गेम डाउनलोड करण्याआधी त्याचं रेटिंग बघायला मुलांना शिकवा. हे रेटिंग चार किंवा त्यापेक्षा जास्त असलंच पाहिजे. शिवाय ते रेटिंग हजारो-लाखो-करोडो लोकांनी दिलेलं असलं पाहिजे. पाचपन्नास लोकांत चार किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंगला अर्थ नसतो.
हेही वाचा… Health Special: स्मूदी प्या, ऑक्टोबर हिटला दूर ठेवा
रेटिंग बरोबरच कॉमेंट्स दिलेल्या असतात त्याही वाचायला हव्यात. ही सवयही मुलांना लावण्याचा प्रयत्न करा. त्यावरून ऍप व्यवस्थित चालतंय ना, जाहिरातींचा भडीमार आहे की नाही, फोनची किती जागा घेतं, ऍप डाउनलोड केल्यावर फोन स्लो होतो का ही सगळी माहिती समजते.
अॅप स्टोअर मध्ये ‘एडिटर्स चॉइस’ दिलेला असतो. ती ॲप्स व्हेरीफाईड म्हणजे चांगली आहेत ना? याची खात्री करून घेतलेली असतात; त्यामुळे तशी ती सुरक्षित मानता येऊ शकतात.
बहुतेक अॅप्स डाऊनलोड करताना आपणच सरळ सगळ्या परमिशन्स देऊन टाकतो. काही अॅप्सचा आपल्या फोनमधल्या फोटो गॅलरीशी, आपल्या फोनच्या लोकेशनशी काहीही संबंध नसतो तरीही आपण त्यांना या गोष्टी वापरण्याची परवानगी देतो कारण ते काय काय वापरणार आहेत याची यादी आपण अनेकदा बारकाईने बघतच नाही. असं करुन चालणार नाही. त्यामुळे अॅप्स डाउनलोड करताना ते व्हेरिफाय केलेले आहेत का, त्याचं रेटिंग किती आहे, डाउनलोड किती आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सगळं बघितलंच पाहिजे.
हेही वाचा… Health Special: वैद्यानां शारदी माता असं शरद ऋतूला का म्हटलं जातं?
प्रत्येक अॅपवर ते कुठल्या वयोगटासाठी आहे हेही लिहिलेलं असतं. आपलं मुलं त्याच्या वयानुरुप अॅप डाउनलोड करतंय ना याकडे लक्ष हवं. कारण ऍप स्टोअरमध्ये १८+ ऍप्सही असतात.
आपण जी अॅप्स गेल्या दोनचार महिन्यात वापरलेली नाहीत ती फोनमधून काढून टाकली पाहिजेत. जेणेकरुन फोनची स्पेस मोकळी राहील. आणि ज्या अर्थी इतक्या महिन्यात आपण ते वापरलेलं नाही, त्याचा अर्थ आपल्याला ते वरचेवर लागत नाही. अशी अॅप्स कधीही काढून टाकलेली बरी.
कुठलंही अॅप आपल्याला कधीही डाउनलोड करता येऊ शकतं. त्यामुळे उगाच अॅप्सचा साठा फोनमध्ये करण्याची गरज नसते. हा डिजिटल कचरा वेळच्या वेळी काढून टाकला पाहिजे. मुलांना आपण खऱ्या जगण्यातल्या स्वच्छतेबद्दल शिकवतो तसंच डिजिटल स्वच्छतेबद्दलही शिकवलं पाहिजे. कारण आपण हायब्रिड आयुष्य जगतो आहोत आणि मुलांच्या हातात फोन्स आहेत.