सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. लाडक्या बाप्पाचे उत्साहात घरोघरी आगमन झाले आहे. गणपत्ती बाप्पला जास्वंदाचे फूल आवडत असल्यामुळे त्याला प्रसन्न करण्यासाठी जास्वंदाचे फूल अर्पन करतात. पण बाप्पाच्या आवडत्या फुलाचे महत्त्व तुम्हाला माहित आहे. जास्वंद ज्याला हिबिस्कस या नावानेही ओळखले जाते. जास्वंद ही अशिया खंडात आढळणारी सदारहरित वनस्पती आहे. भारतात कित्येक वर्षांपासून जास्वंदाच्या फुलांचा वापर पूजा आणि विधींसाठी केला जातो. जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या सुकवून त्यांचा नैसर्गिक रंग म्हणून वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, बाप्पाच्या आवडत्या जास्वंदाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
जास्वंदाच्या फुलाचे आहेत आरोग्यासाठी अनेक फायदे
आयुर्वेदामध्येही जास्वंदाच्या फुलांचा वापर केला जातो. जास्वंदाच्या फुलांचा औषध म्हणूनही वापर केला जातो. जास्वंदाच्या फुलांचा चहा किंवा तेल म्हणून वापर केला जातो, कारण हे फूल अत्यंत गुणकारी आहे. काही लोक जास्वंदाच्या फुलांचे सलाड म्हणून सेवन करतात. याबाबत आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ या…
हेही वाचा – पावसाळ्यात टोमॅटो वापरण्यापूर्वी एकदा नव्हे दोनदा करा खात्री, कारण तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी जास्वंदाच्या फुलांचे काही फायदे सांगितले आहेत.
जास्वंदाचा चहा किंवा जास्वंदाचा अर्क हा तुमच्या मेंदूसाठी अत्यंत उपयुक्त असतो.
तुम्हाला अस्वस्थता जाणवत असेल, रक्तदाबाची समस्या असेल तर त्यावर जास्वंदाचा चहा पिणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
तुम्ही जे पाणी पिता, त्यात जास्वंदाचे परागकण काढून त्याच्या पाकळ्या टाकून ते पाणी प्यायला तर तुमच्या शरीराला चांगले अँटीऑक्सिडंट मिळतात; त्यामुळे जास्वंद अत्यंत उपयुक्त आहेत.
जर तुम्हाला ॲक्ने किंवा त्वचेच्या समस्या असतील तर जास्वंदाची पावडर, जास्वंदाच्या पाकळ्यांचे पाणी, जास्वंदाचा चहा (हिबिस्कर टी) प्यायल्यास अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
तुम्हाला पोटाच्या समस्या असतील तर जास्वंदाचा चहा फायदेशीर ठरू शकतो, कारण तो सहज पचवता येतो.
जास्वंदाच्या पाकळ्या पाण्यात ठेवून नंतर ते पाणी गरम करून प्यायले तर त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार जास्वंदाच्या चहाचे आणखी काही फायदे
अँटीऑक्सिडंट्स : जास्वंदाच्या चहामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल संयुगेशी लढण्यास मदत करतात.
कमी रक्तदाब : उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अतिरिक्त ताण पडतो आणि ते कमकुवत होऊ शकते. हे हृदयविकाराच्या वाढीव जोखमीशीदेखील संबंधित आहे. नैसर्गिक उपायांसाठी जास्वंदाच्या चहाचे सेवन केले जाऊ शकते, परंतु जर एखाद्याला तीव्र रक्तदाबाचा त्रास होत असेल आणि औषधोपचार होत असतील तर अशा नैसर्गिक उपायांमध्ये सहभागी होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो.
फॅट्सचे प्रमाण कमी करते : रक्तातील फॅट्सचे प्रमाण विविध हृदयविकारांना कारणीभूत ठरू शकते, म्हणून एक कप गरम जास्वंदाचा चहा प्यायल्याने नैसर्गिकरित्या खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते आणि शरीर आतून लवकर बरे होऊ शकते.
वजन कमी होणे : जास्वंदाच्या अर्कामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होतात, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. बीएमआय पातळी कमी करणेदेखील फायदेशीर आहे.
बॅक्टेरियाच्या संसर्गासाठी नैसर्गिक उपाय : जीवाणू हे एकलपेशी सूक्ष्मजीव आहेत, ज्यामुळे ब्रॉन्कायटिस ते न्यूमोनिया ते मूत्रमार्गाच्या संसर्गापर्यंत विविध प्रकारचे संक्रमण होऊ शकतात. अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असण्याव्यतिरिक्त ते बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यासदेखील मदत करू शकते.
सुखदायक प्रभाव : ज्या लोकांना सतत मूड स्विंग, मळमळ किंवा अस्वस्थता असते त्यांनी नियमित जास्वंदाचा गरम चहा प्यावा, कारण ते तुमच्या मज्जातंतूंना शांत करते आणि तुम्हाला आराम देते.