How Mobile Phone Radiation Affect Men’s Fertility : मोबाइल आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातात मोबाइल असतो; मोबाइलशिवाय जगणे कठीण अशी अवस्था आहे. तरुण मुले तर मोबाइलच्या इतक्या आहारी गेली आहेत की, त्यांना मोबाइलशिवाय कोणतीही गोष्ट अशक्यच वाटते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, मोबाइलच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्यावर किती गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात?

सेलटॉवर, मोबाइल, वायफाय इत्यादींच्या रेडिएशनमुळे अनेक आजार होतात. उदा. मेलाटोनिनची पातळी कमी होणे, मेंदूवर दुष्परिणाम दिसणे, गर्भवती महिलांना धोका निर्माण होणे, शरीरात स्ट्रेस प्रोटीन निर्माण होणे, त्वचा, कान व डोळ्यांवर परिणाम होणे इत्यादी.
२००६ मध्ये अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन (American Society for Reproductive Medicine) यांनी आपल्या अहवालात नमूद केलेले आहे की, मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे पुरुषांच्या शरीरातील वीर्याची गुणवत्ता घसरते. वीर्यामधील शुक्राणूंच्या संख्येत घट होते. शुक्राणूंची हालचाल मंदावते, मोबाइलचा अतिवापर करणाऱ्यांच्या वीर्यामध्ये ३० टक्के घट आढळून आलेली आहे.
१ मिलिलीटर सेमिनल फ्लूईडमध्ये साधारणत: ८३ दशलक्ष शुक्राणू आढळतात, मोबाइल फोनचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये केवळ ५९ दशलक्ष किंवा त्यापेक्षा कमी शुक्राणू आढळतात. तसेच सेमिनल फ्ल्यूईडमध्ये शुक्राणूंची हालचाल करण्याचे प्रमाण मोबाइलचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये केवळ ३६.३ टक्के असते; तर मोबाइल न वापरणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ५१.३ टक्के असते

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

पुणे येथील इंदिरा आयव्हीएफ (Indira IVF) चे संचालक आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. अमोल लुंकड या विषयी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला माहिती देताना सांगतात, “मोबाइलच्या रेडिएशन आणि उष्णतेमुळे पुरुषांच्या शुक्राणूंवर परिणाम होतो. शुक्राणूची हालचाल व आकार यावर त्याचा परिणाम दिसून येतो.” तरुण पिढी मोबाइलचा अतिवापर करते आहे, त्यामुळे भविष्यात पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढू शकते का, या संदर्भात विचारले असता डॉ. लुंकड पुढे सांगतात, “गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ही समस्या वाढतच आहे. आता शुक्राणूंची साधारण पातळी १५ दशलक्ष प्रति मिलिलीटर आहे, पण पूर्वी ती ४० दशलक्ष प्रति मिलिलीटर होती. आता ती संख्या कमी होत आहे. पुरुषांमध्ये दिवसेंदिवस वंध्यत्व वाढत आहे. आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये ५० टक्के पुरुषांमध्ये शुक्राणूंची मोठी समस्या असते. यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील मोबाइल रेडिएशन हे एक कारण आहे.”

हेही वाचा : जास्त वेळ बसून राहण्यामुळे आरोग्यावर होत आहेत दुष्परिणाम? रोज फक्त पाच ते दहा मिनिटे व्यायाम करा; जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितलेले सहा व्यायाम

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या नॅशनल इन्स्टिस्टूट ऑफ हेल्थ (National Institutes of Health) म्हणजेच एनआयएच (NIH) संस्थेनी २०१४ मध्ये एका अभ्यासात सांगितले होते की मोबाइलच्या रेडिएशनचा थेट शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. या अभ्यासात ३२ निरोगी पुरुषांवर अभ्यास केला. प्रत्येक शुक्राणूचा नमुना दोन समान भागामध्ये ठेवण्यात आला. एका थर्मोस्टॅटमध्ये पाच तासांसाठी शुक्राणूंचे नमुने ठेवण्यात आले तर दुसऱ्या थर्मोस्टॅटमध्ये सुद्धा पाच तासांसाठी शुक्राणूंचे नमुने ठेवण्यात आले. पण या थर्मोस्टॅटजवळ मोबाइल फोन ठेवण्यात आला होता. योग्यरित्या मूल्यांकन केल्यानंतर मोबाइल रेडिएशनमुळे दुसऱ्या थर्मोस्टॅटमधील शुक्राणूंची गतिशीलता कमी दिसून आली.”

नॅशनल इन्स्टिस्टूट ऑफ हेल्थनी २०१६ मध्ये आणखी एक अहवाल सादर केला होता. लॅपटॉप मांडीवर ठेवून का वापरू नये, याची कारणे या अभ्यासात सांगितली होती. या अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, मांडीवर लॅपटॉप ठेवल्यामुळे पुरुषांच्या पुनरुत्पादन क्षमतेवर याचा परिणाम दिसून येतो. जेव्हा आपण लॅपटॉप मांडीवर ठेवतो तेव्हा फक्त लॅपटॉपमधून बाहेर पडणारी उष्णता पुरुषांच्या अंडकोषांवर परिणाम करत नाही तर त्याच बरोबर लॅपटॉपमधून इलेक्ट्रॉनिक सर्किट्सद्वारे तयार होणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड, वाय-फाय, रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि रेडिएशनमुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरते त्यामुळे जास्त वेळ लॅपटॉप मांडीवर ठेवू नये.

हेही वाचा : तुम्ही वारंवार फोन बघता का किंवा वारंवार हात धुता का? तुम्हाला OCD असू शकतो; OCD म्हणजे नेमकं काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या… 

डॉ. लुंकड याविषयी सांगतात, “फक्त मोबाइल फोन नाही तर लॅपटॉपमुळेसुद्धा पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. कारण अनेकदा मांडीवर लॅपटॉप घेऊन जे लोक काम करतात, त्याचासुद्धा परिणाम शुक्राणूंच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. जेवढा मोबाइल लॅपटॉपचा वापर कमी करता येईल, तितके चांगले आहे. मोबाइलचा थेट शरीराशी संपर्क टाळावा. लॅपटॉप जेव्हा आपण मांडीवर घेऊन काम करतो, तेव्ही जी उष्णता निर्माण होते ती सुद्धा शुक्राणू निर्मितीवर परिणाम करते.” ते पुढे सांगतात, “मोबाइल टॉवरमुळेसुद्धा यावर दुष्परिणाम दिसून येतो. मोबाइलचे सिग्नल जर सतत टॉवरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळी हानिकारक रेडिएशनपासून वाचण्यासाठी पँटच्या खिशात फोन ठेवणे टाळावे.”

या संदर्भात रेडिओलॉजिस्ट सल्लागार डॉ. नितीन काटकर यांचे मत जाणून घेतले. डॉ. नितीन काटकर लोकसत्ताशी बोलताना सांगतात, “मोबाइल हा खूप जास्त वापरला जातो, ज्याचा परिणाम शुक्राणूंवर दिसून येतोय. मोबाइलचा वापर टाळता येत नाही, पण त्याचा दुष्परिणाम समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. मोबाइलशिवाय वायफाय, लॅपटॉप, टीव्ही, मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये जे रेडिएशन्स असतात, ते थेट पिट्युटरी ग्रंथीवर परिणाम करतात. या ग्रंथीत असणाऱ्या लेडिंग आणि सर्टोली पेशी ज्या अंडकोषातील सेमिनिफेरस ट्यूबल्सच्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये असतात. या पेशी टेस्टोस्टेरोन हार्मोन तयार करतात. टेस्टोस्टेरोन हा शरीरातील महत्त्वाचा हार्मोन आहे.हा हार्मोन थेट लैंगिक क्षमतेची संबंधित आहे. रेडिएशन्सचा थेट परिणाम टेस्टोस्टेरोन हार्मोनवर होतो. जेव्हा टेस्टोस्टेरोनची पातळी कमी होते, तेव्हा शुक्राणूची गुणवत्ता आणि संख्येवर परिणाम होतो आणि पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होते.”