कोरोनाच्या काळापासून अनेकांचं ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झालं आहे. घरून काम करीत असल्यामुळे अनेकांना शरीरसंबंधीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यात सतत लॅपटॉपकडे बघितल्यामुळे मानेसंबंधीच्या समस्या अनेकांना त्रास देत आहेत. सध्याच्या काळात बहुतेक लोकांचं काम हे डेस्कवर बसून असतं. मग ऑफिसमध्ये सतत एकाच जागी बसून लोक काम करताना दिसतात. त्यात आजकालचे लोक फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. एकाच जागी बसून काम करणं, फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खाणं अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. परिणामत: लोकांच्या शरीरातील चरबी वाढते, पोट सुटायला लागतं. अशा वेळी लोक व्यायाम, डाएट करून स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र तुम्ही फिट आहात की नाही हे कसं कळणार? तर, काळजी करू नका हे एक आसन करून बघा तुम्ही खरोखर फिट आहात का आणि किती फिट आहात ते. स्थिर संतुलन राखण्याची तुमची क्षमता समजून घेण्यासाठी फ्लेमिंगो बॅलन्स टेस्ट केली जाते, या संदर्भात दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे सुपर स्पेशालिटी, कन्सल्टंट, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश एल. भालेराव यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चाचणीमध्ये व्यक्तीला एका पायावर उभे राहावे लागते आणि दुसरा पाय पहिल्या पायाला टेकवावा लागतो. तुम्ही जितका जास्त वेळ हे आसन राखू शकाल तितके तुम्ही तंदुरुस्त राहाल. जास्त काळ स्थिर स्थितीत टिकून राहण्याची तुमची क्षमता मोजून तुमचे शारीरिक आरोग्य समजून घेण्यास मदत मिळते.

दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाल सिंग म्हणाले की, वयानुसार स्नायूंची ताकद आणि शरीराचे नियंत्रण कमी झाल्यामुळे एका पायावर संतुलन राखण्याची त्यांची क्षमता अनेकदा कमी होते. हे आसन केल्याने मानसिक लक्ष केंद्रित करणे आणि शरीराचे नियंत्रण याबाबतची क्षमता दिसून येते,” असे डॉ. सिंग म्हणाले. “या आसनाचा सराव केल्याने केवळ स्नायूंची ताकदच वाढत नाही, तर मानसिक संतुलन आणि चालण्याच्या सुधारणेसाठीदेखील हे आसन फायदेशीर ठरते. कालांतराने, नियमितपणे फ्लेमिंगो आसन केल्याने शरीराचे नियंत्रण चांगले होते आणि स्नायूंची प्रणाली मजबूत होते, ज्यामुळे शारीरिक स्थिरता वाढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक मौल्यवान व्यायाम आहे.

जर तुम्ही हे आसन करू शकत नसाल तर काय?

हे आसन जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्हाला व्यायाम, योगा करण्याची गरज आहे. तुमचा गाभा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. भालेराव यांनी नमूद केले.

हे आसन करून चाचणी करणे ही तुमची शारीरिक ताकद तपासण्याचा एक मार्ग वाटत असला तरी ती प्रत्येकासाठी योग्य नसेल. गंभीर संतुलन समस्या, विकार, दुखापत, न्यूरोलॉजिकल विकार आणि संधिवात असलेल्या लोकांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अशा चाचण्या करणे टाळावे. जर तुम्हाला वेदना किंवा अस्वस्थता जाणवू लागली, तर लगेच हे आसन करणे थांबवा” असे डॉ. भालेराव निक्षून बजावले.