“देही आरोग्य नांदते भाग्य नाही यापरते” हे संतवचन सुपरिचित आहे आणि सहज समजण्यासारखे आहे. संसारातील सुख-दुःखे सहन करण्यासाठी दणकट देह आणि बळकट मन आवश्यक आहे. रोग होऊ नयेत म्हणून या पुण्यभूमीत आयुर्वेदासारखी शास्त्रे उदयाला आली. हळदीचा वापर तिच्या औषधी गुणधर्मामुळे भारतात फार पुरातन काळापासून जेवणात करतात. हा वापर पिवळा रंग आणि चव आणण्या शिवाय तिच्या औषधी गुणधर्मामुळे सर्व ठिकाणी करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात हजारो वर्षांपासून मसाला आणि औषधी वनस्पती म्हणून याचा वापर केला जात आहे. पारंपारिक दावा आहे की हळदीमध्ये औषधी गुणधर्म असलेली संयुगे असतात. या संयुगांना कर्क्युमिनोइड्स म्हणतात. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे कर्क्युमिन. हळदीमध्ये कर्क्युमिन हा मुख्य सक्रिय घटक आहे.यात शक्तिशाली दाहक-विरोधी प्रभाव आहेत आणि एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडेंट आहे.

१. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असलेले जीवसक्रीय (बायोएक्टिव्ह) संयुगे असतात-

हळदीमध्ये कर्क्युमिनचे प्रमाण सुमारे १% आहे.या औषधी वनस्पतीवरील बहुतेक अभ्यासांमध्ये हळदीचे अर्क वापरले जातात ज्यात जास्त प्रमाणात कर्क्युमिन असतात व डोस सहसा दररोज १ ग्रॅमपेक्षा जास्त असतो. केवळ आपल्या पदार्थांमध्ये मसाला म्हणून हळदीचा वापर करून ही पातळी गाठणे खूप कठीण आहे म्हणूनच काही लोक पूरक आहार वापरतात.

हेही वाचा… भात किंवा गव्हाच्या पोळ्यांचे पर्याय किती फायद्याचे? तज्ज्ञ सांगतात, ताट वाढताना ‘असा’ नियम पाळावा

तथापि, कर्क्युमिन आपल्या रक्तप्रवाहात अल्प प्रमाणात शोषले जाते.कर्क्युमिनचे संपूर्ण परिणाम अनुभवण्यासाठी, त्याची जैवउपलब्धता (ज्या दराने आपले शरीर एखादा पदार्थ शोषून घेते) सुधारणे आवश्यक आहे. हे काळी मिरीसह सेवन केले तर शक्य होते. काळ्या मिरीमध्ये पिपेरिन असते. पिपेरिन हा एक नैसर्गिक पदार्थ आहे जो कर्क्युमिनचे शोषण दोन हजार टक्क्यांनी वाढवतो. खरं तर,सर्वोत्तम कर्क्युमिन पूरकमध्ये पिपेरिन असते आणि यामुळे ते बऱ्यापैकी प्रभावी ठरतात. कर्क्युमिनदेखील चरबीमध्ये विरघळणारे आहे, म्हणूनच चरबी जास्त असलेल्या जेवणासह कर्क्युमिनपूरक आहार घ्यावा.

२. कर्क्युमिन एक नैसर्गिक दाहक-विरोधी कंपाऊंड आहे

जठरातील अ‍ॅसिड हे शरीरासाठी महत्वाचे आहे. अन्नामधून येणाऱ्या बाहेरील जंतू व आक्रमणकर्त्यांशी लढण्यास ते मदत करते आणि आपल्या शरीरातील नुकसान कमी करण्यात भूमिका बजावते. तीव्र, अल्प-मुदतीची जळजळ फायदेशीर असते, परंतु जर ती तीव्र झाली व अनेक काळ चालली तर ती शरीरावर दुष्परिणामही करू शकते. अ‍ॅसिडिटीमुळे पोटात जळजळ, अल्सर, आवाज बसणे व खोकल्याचे आजार होणे हे सगळ्यांना माहीतच आहे. परंतु बराच काळ जळजळ सुरु राहिली तर हृदयरोग, कर्करोग, अन्न न पचणे व शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होऊ शकते. म्हणूनच तीव्र जळजळ कमी होण्यास मदत करणारी कोणतीही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. अनेक वर्षे असणारी जळजळ हा विषय बहुस्तरीय आहे आणि त्याला सोपे उत्तर नाही. कर्क्युमिन जळजळ विरूद्ध लढू शकते. तथापि,औषधी परिणाम तयार करण्यासाठी खूप जास्त डोस आवश्यक असतो.

३. हळद शरीराची अँटीऑक्सिडेंट क्षमता वाढवते

ऑक्सिडेटिव्ह हे आपल्या शरीराचे नुकसान करते व वृद्धत्व आणि अनेक रोगांमागील हे कारण असल्याचे मानले जाते. म्हणूनच अनेक आजारात अँटिऑक्सिडंट्स घेण्याचा सल्ला दिला जातो. अँटिऑक्सिडंट्स इतके फायदेशीर असण्याचे मुख्य कारण म्हणजे ते आपल्या शरीराचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. कर्क्युमिन एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे जे त्याच्या रासायनिक संरचनेमुळे मुक्त रॅडिकल्सला निष्प्रभ करू शकते. कर्क्युमिनमुक्त रॅडिकल्सची क्रिया अवरोधित करू शकते आणि इतर अँटीऑक्सिडंट्सच्या क्रियेस उत्तेजन देऊ शकते.

४. कर्क्युमिन मेंदू-व्युत्पन्न न्यूरोट्रॉफिक घटकास चालना देऊ शकते

हल्ली संशोधनात असे आढळते आहे की, न्यूरॉन्सची नवीन कनेक्शन तयार करण्यास मेंदू-व्युत्पन्न न्यूरोट्रॉफिक फॅक्टर (बीडीएनएफ)आवश्यक आहे. हे एक जनुक आहे.बीडीएनएफ प्रथिने स्मृती आणि शिक्षण यामध्ये भूमिका निभावतात आणि ते खाणे, पिणे आणि शरीराच्या वजनासाठी जबाबदार असलेल्या मेंदूच्या भागात आढळू शकते. मेंदूचे बरेच विकार, नैराश्य आणि अल्झायमर रोगासह बीडीएनएफ प्रथिनांच्या कमी पातळीशी जोडले गेले आहेत. कर्क्युमिन बीडीएनएफच्या मेंदूची पातळी वाढवू शकते, असे केल्याने मेंदूचे अनेक आजार आणि मेंदूच्या कार्यक्षमतेत वयोमानानुसार होणारी घट लांबणीवर टाकण्यास किंवा उलट करण्यास ही प्रभावी ठरू शकते. हे स्मरणशक्ती आणि लक्ष सुधारण्यास देखील मदत करू शकते.

५. कर्क्युमिन हृदयरोगाचा धोका कमी करू शकते

हृदयविकार हे जगात मृत्यूचे पहिल्या क्रमांकाचे कारण आहे. विविध गोष्टी त्याला हातभार लावतात. हृदयरोगाच्या बाबतीत कर्क्युमिनचा मुख्य फायदा म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांचे अस्तराचे (एंडोथेलियम) कार्य सुधारणे. एंडोथेलियल डिसफंक्शन हा हृदयरोगाचा एक प्रमुख घटक आहे. याव्यतिरिक्त, कर्क्युमिन जळजळ आणि ऑक्सिडेशन कमी करण्यास मदत करू शकते, जे हृदयरोगात भूमिका बजावू शकते. एका अभ्यासात कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया करणाऱ्या १२१ लोकांना संशोधकांनी शस्त्रक्रियेच्या काही दिवस आधी आणि नंतर त्यांना दररोज एकतर प्लेसबो (औषध नसलेली गोळी) किंवा ४ ग्रॅम कर्क्युमिन दिले. कर्क्युमिन गटात रुग्णालयात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ६५% कमी आढळला.

६. हळद कर्करोगापासून बचाव करू शकते

कर्करोग हा एक आजार आहे, जो अनियंत्रित पेशींच्या वाढीद्वारे दर्शविला जातो. कर्क्युमिनपूरक आहारामुळे या पेशी प्रभावित झाल्याचे दिसून आटोक्यात आल्याचे दिसले आहे. कर्करोगाच्या उपचारांमध्ये कर्क्युमिनचा एक फायदेशीर औषधी वनस्पती म्हणून अभ्यास केला गेला आहे आणि कर्करोगाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम झाल्याचे आढळले आहे. हळदीतील कर्क्युमिनमुळे ट्यूमरमध्ये नवीन रक्तवाहिन्यांची वाढ कमी होते आणि मेटास्टेसिस (कर्करोगाचा प्रसार) कमी होतो. यावर जास्त संशोधनाची गरज आहे.

७. अल्झायमरच्या उपचारात कर्क्युमिन उपयुक्त ठरू शकते

अल्झायमर रोग हा डिमेंशियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि डिमेंशियाच्या ७०% प्रकरणांमध्ये योगदान देऊ शकतो. त्याच्या काही लक्षणांवर उपचार नवीन उपचार येत असले तरी अल्झायमरवर अद्याप कोणताही ठोस इलाज नाही. म्हणूनच ते पहिल्यांदा होण्यापासून रोखणे इतके महत्वाचे आहे. कर्क्युमिन रक्त-मेंदूचा अडथळा ओलांडत असल्याने कर्क्युमिनचा या आजारावर प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त, अल्झायमर रोगाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अमायलॉइड प्लेक्स नावाच्या प्रथिने वाढतात व कर्क्युमिन हे प्लेक्स कमी करण्यास मदत करू शकते.

८. संधिवात रुग्ण कर्क्युमिन सप्लीमेंट्सला चांगला प्रतिसाद देतात

कर्क्युमिन एक शक्तिशाली दाहक-विरोधी कंपाऊंड आहे व ते संधिवातास मदत करू शकते.

९. कर्क्यूमिनचे नैराश्यापासून बचाव करण्यासाठी फायदे आहेत

१०. कर्क्युमिनमुळे वृद्धत्वास उशीर होतो आणि ते जुनाट (chronic) आजारांशी लढण्यास मदत करू शकते.

कर्क्युमिन हृदयरोग, कर्करोग आणि अल्झायमर रोखण्यास मदत करू शकते व त्यामुळे दीर्घायुष्यासाठी देखील त्याचे फायदे आहेत. त्यामुळेच ते अँटी-एजिंग म्हणूनही मानलं जातं.

हळदीचा वापर जंतुनाशक आहे म्हणून प्राचीन काळापासून तिचा औषधांमध्ये वापर केला जातो. लहानपणी जखम झाली किंवा रक्त आले तर आई ताबडतोब त्याला हळद लावत असे. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये हळद असतेच. तिच्यामुळे आरोग्य तर लाभतेच पण ती सौंदर्यवर्धकही आहे. स्मरणशक्ती वाढते आणि बुद्धी तल्लख राहते. मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. सर्दी खोकला,डोकेदुखी दूर करणे असे थक्क करणारे फायदे हळदीत आहेत. त्यामुळे हळदीचे पाणी, लोणचे, दूध,पेय असे अनेक प्रकार आज बाजारात लोकप्रिय आहेत.

हेही वाचा… Health Special: फॅट्स कमी होतात म्हणजे नक्की जातात कुठे?

लग्नसराईतील महत्त्वाच्या समारंभांपैकी एक समारंभ म्हणजे हळदी समारंभ होय. वास्तविक लग्नाच्या दिवशी जेवढा उत्साह असतो त्यापेक्षा जास्त उत्साह हा हळदीच्या वेळेस असतो. आगरी समाजात तर लग्नापेक्षा हळद मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. हिंदू संस्कृती मध्येही हळदीच्या समारंभाला मोठे महत्त्व सांगितले आहे. पण तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की लग्नाआधी नवरा नवरीला अशी हळद का लावण्यात येते? हळदीचे उपयोगी गुणधर्म वगळता हळदीची विशेषता कोणती असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर म्हणजे हळदीचा रंग हा पिवळा असतो आणि या रंगाला भारतीय परंपरा आणि संस्कारांमध्ये खूप पवित्र स्थान आहे. पिवळा रंग हा प्रेम, त्याग आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नव्याने आयुष्य सुरु करायला जाणारे नवरा नवरी यांना जणू हळद लावून ही सर्व प्रतीके आत्मसात करा आणि सुखाने संसार करा असे सांगितले जाते. म्हणूनच हिंदू संस्कृती मध्ये लग्नाआधी हळद लावून नवरा आणि नवरीला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देतात.

आपल्या आयुष्यात विविध वेळी हळदीचा उपयोग केला जातो. वरण असो की भजी असोत हळद ही वापरली जाते. त्याचा आरोग्यदायी उपयोग हा अनेक वर्षांपासून सुरु आहे. अनेक फायद्यांबरोबर शरीराला अनेक आजारांना पळवून लावण्यास मदत करते.म्हणूनच हळद ही आवश्यक त्या प्रमाणात वापरली पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The solution for cancer heart disease alzheimers is a turmeric hldc dvr
Show comments