Essential Vitamins : जीवनसत्त्वे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. सप्लिमेंट्सवर किंवा पूरक आहारावर अवलंबून राहण्याऐवजी आरोग्य तज्ज्ञ अनेकदा आहारातून ‘हे’ महत्त्वाचे पोषक घटक मिळवण्याची शिफारस करतात. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ती शरीराच्या प्रत्येक कार्याला चालना देताता. प्रत्येक जीवनसत्त्वाचे कार्य वेगवेगळे असते. जर तुमच्या शरीरात एखाद्या जीवनसत्त्वाचा अभाव असेल, तर तुम्हाला त्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊ, कोणती जीवनसत्त्वे शरीरात काय काम करतात?

क्लिनिकल पोषणतज्ज्ञ वेदांती दवे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलचताना स्पष्ट केले, “जीवनसत्त्वे ही आपल्या आहाराद्वारे आपल्या शरीराला मिळणे आवश्यक आहे. याच वेगवेगळ्या जीवनसत्त्वांचे फायदे जाणून घेऊ.

stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Spinach or Palak benefits in hair growth and prevent hairfall Why Spinach Is The Secret To Healthier, Fuller Hair
केस लांब हवे, पण केसगळती थांबतच नाही? फक्त एक महिना आहारात पालकचा समावेश करा
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
fruits pack the most nutritional punch
Nutrient Rich Fruits : कोणती फळं सर्वात जास्त पोषण देतात तुम्हाला माहिती आहे का? मग आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ यादी वाचा

व्हिटॅमिन ए

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, दृष्टिदोष दूर होण्यासाठी, तसेच त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन एची आवश्यकता असते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन एची कमतरता असेल, तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. तसेच डोळ्यांशी संबंधित विविध समस्याही निर्माण होऊ शकतात. व्हिटॅमिन एच्या स्रोतांमध्ये अंडी, गाजर, कोथिंबीर व पालक यांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन बी १ म्हणजेच थायमिन

मज्जातंतू वहन आणि ऊर्जा उत्पादनासाठी व्हिटॅमिन बी १ गरजेचे आहे. व्हिटॅमिन बी १ च्या कमतरतेमुळे मानसिक उदासीनता, गोंधळ व स्नायूंची ताकद कमी होऊ शकते. व्हिटॅमिन बी १ च्या स्रोतांमध्ये मांस, सगळी धान्ये व शेंगा यांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन बी २ म्हणजे रिबोफ्लेविन

व्हिटॅमिन बी २ हे तुमच्या मज्जासंस्थेसाठी अत्यंत गरजेचे असते. दही, दूध, केळी व मशरूम यांच्या सेवनातून तुम्हाला व्हिटॅमिन बी मिळू शकते. व्हिटॅमिन बी २ च्या कमतरतेमुळे तोंडावर फोड येणे, त्वचेवर जखम होणे आणि स्नायूंचा प्रतिसाद कमी होऊ शकतो.

व्हिटॅमिन बी ३ म्हणजेच नियासिन

व्हिटॅमिन B3 जे अतिसार, त्वचारोग आणि स्मृतिभ्रंश दूर करते. शेंगदाणे आणि मांस हे समृद्ध स्त्रोत आहेत.

व्हिटॅमिन बी ५ म्हणजेच पॅथोजेनिक अॅसिड

व्हिटॅमिन बी5, ज्याला पँटोथेनिक ऍसिड असेही म्हणतात, हे शरीरातील विविध कार्यांसाठी महत्त्वाचे आहे. हे आपल्या शरीराच्या ऊर्जा निर्माण प्रक्रियेत मदत करते आणि फॅट्स, प्रोटीन्स, आणि कार्बोहायड्रेट्सचे विभाजन करून ऊर्जा निर्माण करते. यामुळे आपल्या मज्जासंस्थेची कार्यक्षमता वाढते, त्वचा आणि केसांचे आरोग्य टिकवून ठेवते, आणि शरीरातील स्टेरॉईड्स आणि न्यूरोट्रान्समीटरची निर्मितीही यावर अवलंबून असते.

व्हिटॅमिन बी ६

व्हिटॅमिन बी ६ लाल रक्तपेशींचे उत्पादन सक्षम करते. त्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, झोपेचा त्रास आणि चिडचिड होऊ शकते. व्हिटॅमिन बी ६ च्या स्रोतांमध्ये मांस, मासे यांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन बी ७ म्हणजेच बायोटिन

बायोटिन हे जीवनसत्त्व निरोगी त्वचा, केस आणि नखांसाठी अत्यंत गरजेचे असते. त्याची कमतरता असल्याने जाणवणाऱ्या लक्षणांमध्ये नैराश्य, भ्रम व स्नायू दुखणे या त्रासांचा समावेश होतो. अंड्यातील पिवळ बलक आणि सोयाबीन हे याचे सर्वोत्तम स्रोत आहेत.

व्हिटॅमिन बी ९ म्हणजेच फोलेट

फॉलिक अॅसिड डीएनए संश्लेषणासाठी महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः गर्भधारणेदरम्यान कारण- ते विकसनशील बाळामध्ये न्यूरल ट्यूब दोष टाळण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी ९ च्या कमतरतेमुळे वजन कमी होणे, अशक्तपणा होऊ शकतो. कडधान्ये, अंडी आणि पालेभाज्यांमध्ये फोलेट भरपूर प्रमाणात असते.

व्हिटॅमिन बी १२

लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी बी १२ महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे रक्तपेशी अपरिपक्व होऊ शकतात. आंबलेले पदार्थ आणि भरपूर पाणी हे याचे सर्वोत्तम स्रोत आहेत.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी अँटिऑक्सिडंट्स म्हणून कार्य करते. त्यामुळे लोह शोषण्यास आणि मोतीबिंदू टाळण्यास मदत होते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होऊ शकतो, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि जखमा भरण्यास उशीर लागू शकतो. आवळा हे व्हिटॅमिन सीच्या सर्वांत श्रीमंत स्रोतांपैकी एक आहे.

हेही वाचा >> केक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! ‘या’ १२ केकच्या सेवनानं होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टरांनी सांगितला धोका

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी हाडांची निर्मिती आणि देखभाल यांसाठी आवश्यक आहे. सागरी मासे, लोणी आणि अंड्यातील पिवळ बलक हे या जीवनसत्त्वाचे समृद्ध स्रोत आहेत.

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो. त्याच्या सर्वोत्तम स्रोतांमध्ये वनस्पती तेल, काजू बदाम आणि कडधान्ये यांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के रक्त गोठण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो. हिरव्या पालेभाज्या आणि स्प्राउट्स हे व्हिटॅमिन केचे उत्कृष्ट स्रोत आहेत.

हेही वाचा >> सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज’ पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक; जाणून घ्या काय काळजी घ्यायला हवी…

तुमच्या आहारात काहीही समावेश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.