आपल्याला रोजच्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असला पाहिजे असे प्रत्येक जण सुचवत असतो. आजच्या धावपळीच्या काळात रोज प्रत्येक पदार्थ पौष्टिक करणे शक्य नसते. पौष्टिक खाणेही शक्य नसते, तसेच आपली जीवनपद्धतीही बदलेली आहे. बदलत्या जीवनपद्धतीमुळे रक्तदाब, मधुमेह, कॅल्शियमची कमतरता आदी आजार होत असतात. मग अशावेळी कोणते पदार्थ खाणे योग्य ठरेल, याविषयी डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’सह संवाद साधला. त्यांनी ४ असे पदार्थ सांगितले आहेत, ज्यांचा आहारात समावेश केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, मज्जासंस्था-स्नायू यांचे कार्य व्यवस्थित सुरू होते, तसेच या पदार्थांमधील पोटॅशियम शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राखते. तर हे असे चार पदार्थ कोणते हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

आहारात पोटॅशियमची आवश्यकता का आहे ?

पोटॅशियम हे विविध खाद्यपदार्थांमध्ये आढळणारे एक खनिज आहे. पोटॅशियममुळे शरीराला ऊर्जा मिळते. सतत थकल्यासारखे वाटणे, मरगळ याचे एक कारण पोटॅशियमची कमतरता हे असू शकते. पोटॅशियम रक्तात विरघळल्यानंतर शरीरात ऊर्जेची निर्मिती होते. ही ऊर्जा विविध शारीरिक क्रियांसाठी वापरली जाते. साधारणतः प्रौढांना २,५०० ते ३,४०० मिलिग्रॅम पोटॅशियमची आवश्यकता असते. अर्थात वय, वजन आणि लिंगानुसार पोटॅशियमचे प्रमाण बदलते. पोटॅशियमची काही प्रमुख कार्ये आहेत.
रक्तदाबाचे नियमन करणे
जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. पोटॅशियममुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास हृदयावर ताण येऊ शकतो. पोटॅशियममुळे हे अडथळे दूर होण्यास मदत होते. हृदयरोग आणि पक्षाघात होण्याच्याही शक्यता कमी होतात.
स्नायूंचे कार्य
स्नायूंची हालचाल , आकुंचन-प्रसारण, वजन उचलण्याची ताकद स्नायूंमध्ये असणे आवश्यक आहे. सतत हालचाल केल्यामुळे प्रौढ काळात स्नायुदुखी जाणवते. पोटॅशियमच्या योग्य सेवनामुळे स्नायूंशी संबंधित आजार होत नाहीत. तसेच हृदयाचे ठोके स्थिर ठेवण्याचे कार्य पोटॅशियम करते.
मज्जासंस्थेचे कार्य
मज्जासंस्था पोटॅशियम आणि सोडियमच्या योग्य संतुलनामुळे कार्यरत असतात. मज्जासंस्था ही मेंदूला शरीरात होणाऱ्या क्रियांची माहिती पोहोचवणारी संस्था आहे. पोटॅशियमचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. अपुऱ्या पोटॅशियममुळे स्नायू कमकुवत होणे, मुंग्या येणे, पक्षाघात होणे असे आजार होऊ शकतात.
आम्लतेचे संतुलन
पोटॅशियम शरीरातील पीएचचे संतुलन राखते. तसेच द्रवपदार्थांची आम्लता, क्षारता नियंत्रित करण्याचे काम पोटॅशियम करते. चयापचय क्रियांसाठी पोटॅशियमचे आवश्यकता असते. एकूणच शरीरातील महत्त्वाच्या क्रियांसाठी पोटॅशियमचे आवश्यकता असते.

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
article about weakness problem in wome causes of weakness in women
स्त्री आरोग्य : बायांनो, तुम्हाला विकनेस जाणवतो?
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
effective treatment on psoriasis with side effects advice from dermatologist
सोरायसिसवर आता प्रभावी उपचार अन् दुष्परिणामही कमी! त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन

कोणत्या पदार्थांमध्ये पोटॅशियम असते ?

शरीरात पोटॅशियमची पातळी पुरेशी राखण्यासाठी, पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. पोटॅशियमयुक्त चार फळे-भाज्या आहारात समाविष्ट असणे आवश्यक असते. रताळी, केळी, बीन्स, पालक या चार घटकांचा आहारात समावेश करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते,
केळी हा पोटॅशियमचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये ४००-४५० मिलिग्रॅम पोटॅशियम असते. मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये ५००-६०० मिलिग्रॅम पोटॅशियम असते. पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. शिजवलेल्या एक बाऊल पालकांमध्ये ८००-९०० मिलिग्रॅम पोटॅशियम असते. संत्र्यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये २५०-३०० मिलिग्रॅम पोटॅशियम असते. बीन्स, शेंगा, राजमा, मसूर, कडधान्ये ही पोटॅशियमने युक्त असतात. तसेच मध्यम आकाराच्या शिजवलेल्या बटाट्यामध्ये ९०० मिलिग्रॅम पोटॅशियम असते.
·

पोटॅशियमचे संतुलन बिघडल्यास काय होऊ शकते ?

पोटॅशियमचे शरीरात योग्य संतुलन असणे आवश्यक आहे. पोटॅशियमची कमतरता आणि अतिरिक्त पोटॅशियम धोक्याचे असते. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे हायपोक्लेमिया आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. स्नायू कमकुवत होणे, थकवा जाणवणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे अशा समस्या उद्भवू शकतात. घाम येणे, अतिसार होणे हेही याची लक्षणे आहे. गंभीर प्रकरणांमध्येअर्धांगवायूदेखील होऊ शकतो. पोटॅशियमचा अतिरिक्त प्रमाणामुळे हायपरक्लेमिया आजार होऊ शकतो. हायपरक्लेमियामुळे हृदयावरती ताण येऊ शकतो. काही वेळा मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात.

त्यामुळे आहारातील पोटॅशियमचे प्रमाण संतुलित राखणे आवश्यक आहे. पोटॅशियम असणारी फळे, भाज्या यांचा आहारामध्ये समावेश करावा.