Khajoor In Winters: खजूर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात हिवाळ्यात खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. खजुरामध्ये लोह आणि फ्लोरीन मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हिवाळ्यात शरीरात अनेक बदल होतात. यासाठी खजूर खाल्ल्याने या बदलांचा प्रभाव कमी होतो. खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्सही आढळतात. यामुळे मेंदूच्या आरोग्यासाठी खजूर हे उत्तम फळ आहे. खजूरमध्ये कोलेस्टेरॉल नसते. चरबी देखील खूप कमी आहे. त्यामुळे हृदयरोगींसाठीही ते फायदेशीर आहे. जाणून घेऊया खजुराचे फायदे…
खजूर खाण्याचे फायदे
- हाडे मजबूत बनविते
खजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
- शरीर उबदार ठेवते
खजूरमध्ये भरपूर फायबर, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असतात. हिवाळ्यात खजूर खाणे खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते तसेच ऊर्जा मिळते.
- सर्दी आणि खोकल्यामध्ये फायदेशीर
जर हिवाळा सुरू होताच सर्दी-सर्दीची समस्या सतावत असेल तर 2-3 खजूर, काळी मिरी आणि वेलची पाण्यात उकळून घ्या. झोपण्यापूर्वी हे पाणी प्या. यामुळे सर्दी-खोकलामध्ये आराम मिळेल.
( आणखी वाचा : Shahnaz Husain Hair Tips: हिवाळ्यात होणाऱ्या कोरड्या केसांच्या समस्येतून हवीय सुटका? जाणून घ्या शहनाज हुसैनच्या ‘या’ खास टिप्स )
- पचन सुधारण्यासाठी प्रभावी
ज्यांना अपचचा त्रास आहे. तसेच कपचा त्रास असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळते. फायबर्सचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असते. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते. रात्री चार खजूर रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर खा. आपल्याला काही दिवसात याचा फायदा लक्षात येईल.
- मज्जासंस्था सुधारते
खजूरमध्ये पोटॅशियम आणि थोड्या प्रमाणात सोडियम असते. या दोन्हीमुळे शरीरातील मज्जासंस्थेचे (Nervous System) कार्य सुधारते. याव्यतिरिक्त, पोटॅशियम कोलेस्ट्रॉल कमी करते. याशिवाय खजूर खाल्ल्याने पक्षाघाताचा धोकाही कमी होतो.
खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यवर्धक मात्रा असतात. ग्लुकोज, फळातील साखर प्रमाण असते. त्यामुळे खजूर खाण्यामुळे याचा शरीराला लाभ होतो. दोन ते चार खजूर खाल्ले तर आपल्याला एनर्जी मिळते. खजूर खाल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते, आपल्याला ऊर्जा मिळते.