Blood Clotting Signs: शरीरात रक्त गोठणे खूप गंभीर असू शकते. त्याला आपण ब्लड क्लॉटिंग असेही म्हणतो. रक्ताच्या गुठळ्यांचे अनेक प्रकार आहेत. बहुतेक रक्ताच्या गुठळ्या पायाच्या खालच्या बाजूला दिसतात. तुमचे हृदय, फुफ्फुस, मेंदू आणि पोटाच्या भागातही रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात.
रक्त गोठणे हा करोनाच्या दुष्परिणामांपैकी एक आहे. पोस्ट-करोनाव्हायरस अभ्यासात असे आढळून आले की ज्या रुग्णांना विषाणूची लागण झाली होती त्यांच्यामध्ये सुमारे एक वर्षानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे रुग्णांमध्ये इतर आजारांचाही धोका दिसून आला. रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या काळात, तुमच्या शरीरात अनेक लक्षणे दिसतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा धोका वाढण्याची शक्यता असते. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधल्यास या समस्येवर योग्य उपचार मिळण्यास मदत होईल.
दुखापत किंवा कट झाल्यास रक्त गोठणे आवश्यक आहे कारण ते शरीरातून जास्त रक्तस्राव थांबवते, परंतु जेव्हा शरीराच्या आतल्या शिरांमध्ये रक्त गोठण्यास सुरुवात होते तेव्हा ते धोकादायक बनते. शिरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे धोकादायक आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हार्ट स्ट्रोक येऊ शकतो.
( हे ही वाचा: आतड्यांमध्ये जमलेली घाण ‘हे’ ६ पदार्थ सहजपणे काढून टाकतील; कॉस्टिपेशनची समस्याही पुन्हा होणार नाही)
रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची मुख्य लक्षणे
त्वचेचा रंग बदलणे: रक्ताच्या गुठळ्या हात आणि पायांच्या शिरा अवरोधित करतात आणि तुमच्या त्वचेचा रंग बदलू लागतो.
सूज: रक्ताची गुठळी तुमच्या रक्ताभिसरणात अडथळा आणते. त्यामुळे रक्त साचून पेशींना सूज येते. तुमच्या हातामध्ये किंवा पोटात रक्ताची गुठळी तयार होऊ शकते. अशा स्थितीत दर ३ पैकी एक व्यक्ती शरीराच्या वेगवेगळ्या भागात सूज येण्याची तक्रार करतो.
छातीत दुखणे: जर तुम्हाला वेदना होत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरात तयार झालेली रक्ताची गुठळी तुटली आहे. अशा वेळी हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.
(हे ही वाचा: आवळा खाल्ल्याने ‘खराब कोलेस्ट्रॉल’ झपाट्याने कमी होईल; फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या)
श्वास घेण्यात अडचण: जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ते फुफ्फुसात किंवा हृदयात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे तुमच्या हृदयाची गती वाढू शकते. तुम्ही बेशुद्ध देखील होऊ शकता. हे लक्षण खूप गंभीर आहे.
सततचा खोकला: सततचा खोकला हे देखील शरीरात रक्त गोठण्याचे लक्षण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमच्या छातीत दुखापत झाल्यास किंवा खोकल्याने रक्त येत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.