कोलेस्ट्रॉल हा शरीरात आढळणारा चरबीसारखा पदार्थ आहे, जो शरीरातील पेशी, जीवनसत्त्वे आणि इतर हार्मोन्स तयार करण्यास मदत करतो. मात्र, कोलेस्टेरॉलची पातळी आवश्यकते पेक्षा जास्त वाढली तर अनेक समस्या उद्भवू शकतात. शिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेल्या बदलामुळे नको असलेल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढत आहे. ज्यामुळे हृदयविकाराचा झटक्यांसारख्या समस्या वाढू शकतात.

शिवाय सततच्या बैठ्या कामामुळे देखील आपल्या शरीराबाबतच्या अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्याचा आपल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीसह जीवनशैलीवर परीणाम होत असतो. आपल्या आहारात योग्य बदल करुन आपण कॉलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करु शकतो. ज्यामुळे आपण शरीराला हानिकारक असलेल्या आजारांपासून लांब राहू शकतो.

Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
Solapur Onion auction resumed on Monday after a four day work stoppage by Mathadi workers
चार दिवसांच्या खंडानंतर, सोलापुरात कांदा लिलाव
minister nitesh rane put on onion garland by the farmer
नाशिक : नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ; शेतकरी ताब्यात
potato prices , prices vegetables pune,
आवक वाढल्याने कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरात घट
nashik Angry farmers protested on Manmad Yewla Road halting auction due to falling onion prices
येवला बाजार समितीत शेतकऱ्यांकडून लिलाव बंद, मनमाड रस्त्यावर ठिय्या

हेही वाचा- ‘या’ पद्धतीने पाणी प्यायल्याने वाढतो डायबिटीज व कॅन्सरचा धोका? तज्ञांनी दिले स्पष्ट उत्तर

एका अभ्यासानुसार, विरघळणारे फायबर लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. वनस्पती-आधारित पदार्थ किंवा भाज्यांमध्ये असणारी चरबी कमी असते आणि कोलेस्ट्रॉल मुक्त असते जीकोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते. विरघळणारे फायबर कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करुन यकृतामध्ये कोलेस्टेरॉल तयार करण्याचे प्रमाणही कमी करते. प्रीती त्यागी, मुख्य आरोग्य प्रशिक्षक, पोषणतज्ञ आणि MY22BMI च्या संस्थापक, यांनी काही अशा काही भाज्या सुचवल्या आहेत, ज्या शरीरातील उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्या भाज्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

पालक –

आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. पालक ही हंगामी भाजी असून त्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे की शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी काढून टाकण्यास मदत करते. शिवाय वाईट कोलेस्टेरॉलही शरीराबाहेर काढते. त्यामुळे ही भाजी तुम्ही शिजवून किंवा कच्चही खाऊ शकता.

हेही वाचा- अशुद्ध रक्तामुळे निर्माण होऊ शकतात गंभीर समस्या; रक्त शुद्ध करण्याचे ‘हे’ नैसर्गिक उपाय जाणून घ्या

ब्रोकोली –

ब्रोकोली ही उच्च फायबर आणि व्हिटॅमिन सी चे भांडार असणारी भाजी आहे. जी आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. तिच्यातील उच्च फायबरचे गुणधर्म शरीरातील खराब कोलेस्टेरॉलला काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कंट्रोल करण्यासाठी या भाजीचा तुम्ही आहारात समावेश करु शकता.

गाजर –

गाजर हा फायबर आणि बीटा कॅरोटीनचा एक चांगला स्रोत आहे, जो आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करतो. शिवाय हृदयाच्या आरोग्य चांगले राखण्यास ही मदत करतो.

बीट –

बीट हे नायट्रेट्सचा एक उत्तम स्रोत आहे जो रक्तवाहिन्या रुंद करण्यास आणि शरीरातील रक्तदाबाची पातळी कमी करण्यास मदत करतो. शिवाय शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही बीट करते.

हेही वाचा- घसा सतत खवखवतोय? तर झटपट आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा

शतावरी –

शतावरी ही इतर भाज्यांप्रमाणेच आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक उत्तम स्रोत आहे. ते शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासह ब्लड सर्कुलेशन सुरळीत करण्यास मदत करते.

कोबी –

कोबी ही एक फायबर युक्त भाजी आहे, जी अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी भरलेली आहे. तिचे सेवन हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यास मदत करते. ती व्हिटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्त्रोत असून ती रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यासही मदत करते.

कारले –

कारले हे विविध गुणधर्म युक्त अशी भाजी आहे. रक्त शुद्ध करणे, शरीरातील कोलेस्टेरॉल आणि साखरेची पातळी कमी करणे अशी अनेक कामे कारल्याची भाजी करते. कारल्याचा रस दररोज पिल्याने अनेक शाररीक समस्या नष्ट होतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Story img Loader