मधुमेह हा चयापचय क्रियेशी संबंधित आजार आहे. सध्या १०० दशलक्षाहून अधिक भारतीयांना मधुमेह झालेला आढळून येतो. अनेकांना त्यांच्या जेवणाच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. जेवणाच्या अनियमित वेळा, अयोग्य प्रकारचे जेवण, विरुद्धान्न यामुळे मधुमेह होऊ शकतो. युनायटेड किंगडममधील आयसीएमआर या वैद्यकीय संशोधन प्रकाशित करणाऱ्या जर्नलमध्ये १३६दशलक्ष लोकसंख्येच्या जवळपास असलेल्या भारतीय लोकसंख्येपैकी १५.३ टक्के लोक पूर्व-मधुमेहाच्या अवस्थेत आहेत, असे संशोधन प्रकाशित केले. पूर्व मधुमेहाच्या अवस्थेमध्ये आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींचा समावेश होतो. यातील मुख्य म्हणजे दुपारचे जेवण. कार्यालयीन वेळा, कामाचे तास यामुळे अनेक लोक पुरेसे आणि व्यवस्थित दुपारी जेवत नाहीत. यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. अशा कोणत्या सवयी मधुमेह वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुपारच्या जेवणाची वेळ

मधुमेहाचे प्रमाण हे आहाराच्या सवयी आणि प्रमाण यावर अवलंबून असते. दुपारचे आणि रात्रीचे जेवण हे महत्त्वाचे असते. दुपारच्या जेवणाबाबत लोक काही सामान्य चुका करतात. दुपारच्या जेवणाची वेळ पाळणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. ठराविक वेळी व्यवस्थित जेवण होणे आवश्यक आहे. काही कार्यालयांमध्ये कामाचा ताण, अधिक काम यामुळे जेवणाच्या वेळा अनियमित असतात. अशावेळी शरीराचे घड्याळ बिघडण्याची शक्यता असते. दुपारचे जेवण हे दिवसातील पहिले जेवण असते. ते पोटभर आणि व्यवस्थित होणे आवश्यक आहे. विशेषतः तुम्ही दुपारचे जेवण उशिरा करता तेव्हा आणि सकाळी न्याहारी न केल्याने रक्तातील साखरेच्या पातळीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात. सकाळी सर्वात आधी नाश्ता केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दिवसाची सुरुवात चांगल्या आणि सकस आहाराने केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.

हेही वाचा : आठवणी नक्की कुठे साठवल्या जातात ? काय सांगते नवीन संशोधन

जेवणाआधीही थोडे खा

बरेच जण दुपारी जेवायचे आहे, तेव्हा पोट भरू असे समजून असतात. परंतु, यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. जास्त वेळ पोट उपाशी ठेवू नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण विचलित होऊ शकते. त्यामुळे २-२ तासांनी योग्य प्रमाणात आहार घ्यावा. दुपारी जेवणावेळी संतुलित आहार घ्यावा.

शिजवलेले आणि ताजे अन्न घ्या

आजकाल सुपरमार्केटमध्ये सॅलड, सॅण्डविच असे पॅक केलेले पदार्थ मिळतात. काही दुपारी जेवणाच्या वेळी नुसतेच सॅलड खातात. रेडी टू इट पदार्थ खातात. या पदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले असतात. तसेच, चाट मसाला, मीठ यांचेही प्रमाण अधिक असते. या पदार्थांमुळे पचनक्रिया बिघडू शकते. त्याचे परिणाम एक-दोन दिवसात दिसत नाहीत. परंतु, मधुमेह पूर्व स्थिती निर्माण होऊ शकते. अन्नाचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह्जचा वापर मधुमेहासारख्या चयापचय विकारांना कारणीभूत ठरतो. म्हणून दुपारी जेवणात शिजवलेले, पौष्टिक अन्न घ्यावे.

हेही वाचा : जिमला जाताय? तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा… व्यायाम करताना होणारे अपघात टाळण्यासाठी काय करावे ?

जेवणानंतर किंवा आधी फ्लेवर्ड ड्रिंक घेता का ?

सध्या जेवणासह कोल्डड्रिंक किंवा गोड, फ्लेवर्ड ड्रिंक घेण्याची प्रथा निर्माण झाली आहे. प्रथम अशा प्रकारची पेये तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. दुसरे या पेयांमधून उपयोगी अशा कॅलरीज मिळत नाहीत आणि त्यांचे पोषण मूल्य नाही. तिसरे म्हणजे, या पेयांमुळे भूक कमी होते. जेवणानंतर हे पेय घेऊन त्याचा शरीराला काही उपयोग होत नाही. याऐवजी जेवणानंतर ताजे ताक प्यावे.

हेही वाचा : विश्लेषण : तुम्ही धूम्रपान सोडू इच्छिता? पण, विज्ञानाच्या मते…

दुपारच्या जेवणानंतर लगेच काम सुरू करता तेव्हा…

कार्यालयीन वेळेत जेवणासाठी अधिक वेळ नसतो, तसेच कामही असते. कामाची मुदत असते. जेवणानंतर १० मिनिटे चालणे हे फायदेशीर ठरते. जेवण झाल्या झाल्या लगेच कामाच्या ठिकाणी बसू नका.

दुपारच्या जेवणाबाबतच्या या सवयी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These afternoon snacking habits can increase your diabetes how to control blood sugar vvk
Show comments