Natural home remedies for kidney stones: मूतखडा म्हणजेच किडनी स्टोन होणं ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. किडनी स्टोन किंवा मूतखड्याच्या समस्येमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अलीकडे वेगवेगळ्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे लोकांना किडनी स्टोनची समस्या होऊ लागली आहे. या वेदनादायी समस्येमुळे लोक हैराण झालेले असतात. सतत पोटात दुखणे, लघवी करण्यास त्रास होणे अशा अनेक समस्या लोकांना होऊ लागतात. जर तुम्हाला वारंवार किडनी स्टोनच्या समस्येचा त्रास होत असेल, तर तुम्हाला खाण्या-पिण्याबाबत खास काळजी घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत की, ज्यांच्या मदतीने तुम्ही किडनी स्टोन होणे रोखू शकता.

किडनी स्टोन म्हणजे नेमके काय?

शरीरातील खनिजे आणि क्षार जेव्हा स्टोनचे रूप धारण करतात, तेव्हा त्याला आपण मुतखडा झाला म्हणतो. जेव्हा अतिरिक्त क्षार एखाद्या व्यक्तीला शरीरातून लघवीद्वारे काढून टाकता येत नाहीत तेव्हा ते क्षार मूत्रपिंडात जमा होऊन, त्याचे दगड तयार होतात. या किडनी स्टोनचा थेट परिणाम आपल्या मूत्रमार्गावर होतो. शरीरामध्ये किडनी स्टोन निर्माण होण्याची कारणे वेगवेगळी असतात. पण, आपल्या शरीरामध्ये खनिजे आणि क्षार पदार्थ यांची मात्रा वाढल्यास शरीरामध्ये किडनी स्टोन तयार होऊ लागतो. खाण्या-पिण्यातील अनियमितता आणि आवश्यक तेवढे पाणी न पिणे हे मूतखडा होण्याचे मुख्य कारण आहे.

Kidney Stone Causing Food
किडनी स्टोन होऊ नये म्हणून चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; धोका वेळीच ओळखा, डाॅक्टरांनी सांगितलेली यादी एकदा वाचाच!
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
shani dev margi 2024 today horoscope
१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा

(हे ही वाचा : हळदीमध्ये ‘हा’ पदार्थ घातल्याने खराब कोलेस्ट्रॉल होईल झपाट्याने कमी? हृदयविकाराचा धोका टाळता येणार? जाणून घ्या… )

किडनी स्टोन रोखण्यासाठी नैसर्गिक उपाययोजना

स्वतःला हायड्रेटेड ठेवा

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किडनी स्टोन रोखण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे. दिवसभरातून साधारण आठ ते १० ग्लास पाणी प्यावे. भरपूर द्रव प्या. त्यामुळे लघवीतील दगड तयार करणारे पदार्थ पातळ होतात. बीअर, कॉफी, चहा, वाईन, संत्र्याचा रस यांसारख्या इतर पेयांसह, पाण्याच्या विशेषत: द्रवपदार्थांच्या वापरामुळे मूतखड्यांची निर्मिती करणारे पदार्थ पातळ होतात.

सायट्रिस अॅसिड असलेली फळे

किडनी स्टोनपासून वाचण्यासाठी सायट्रिक अॅसिड असलेली फळे जसे की, संत्री, लिंबू, मोसंबी इत्यादींचे सेवन केले पाहिजे. सायट्रिक अॅसिडमध्ये कॅल्शियम-ऑक्झलेट जमा होण्यापासून रोखण्याची क्षमता असते.

– पुरेसे कॅल्शियम मिळवा

तुम्हाला कॅल्शियमचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे; जेणेकरून तुम्हाला कॅल्शियमयुक्त खडे होऊ नयेत ही सामान्य समज असली तरी कॅल्शियमयुक्त आहार खरोखरच दगड तयार होण्याचा धोका कमी करण्यासाठी ओळखला जातो. आहारातील कॅल्शियम ऑक्झलेटशी बांधले जाते आणि ते शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते म्हणून मूत्रपिंडांना त्या मूत्रप्रणालीतून जावे लागत नाही.

जास्त मीठ खाणे टाळा

जास्त प्रमाणात मिठावर अवलंबून असलेला आहार काही लोकांमध्ये किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढवतो. कारण- सोडियममुळे मूत्रावाटे कॅल्शियम बाहेर टाकण्याचे प्रमाण वाढते. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, आपण पॅकेज केलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करून सोडियमचे सेवन दररोज २,३०० मिलिग्रॅमपर्यंत मर्यादित करू शकता.

Story img Loader