सुपरफूड्स म्हटलं की अनेकांना परदेशी फळे किंवा महागड्या पावडर असे पदार्थांची प्रतिमा मनात येतेप पण खरं तर तुमच्या स्वयंपाकघरात सर्वात शक्तिशाली आणि सहज उपलब्ध होणारे काही सुपरफूड आहेत. सुकामेवा, बिया, धान्य आणि शेंगा यांसारखे पदार्थ देखील सुपरफुड आहेत. या सुपरफुडचे आरोग्याला मिळणारे फायदे वाढवण्याचे एक रहस्य म्हणजे ते भिजवणे.

सुफरफुड का भिजवावे याबद्दल ‘द इंडियन एक्सप्रेस’ला माहिती देताना हैदराबादचे यशोदा हॉस्पिटल्सचे फिजिशियन आणि डायबेटोलॉजी, वरिष्ठ सल्लागार डॉ. के. सोमनाथ गुप्ता यांनी सांगितले की, “काही पदार्थांमध्ये फायटिक ऍसिड आणि एंझाइम इनहिबिटर सारखी संयुगे असतात. हे आपल्या शरीराद्वारे आवश्यक पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणू शकतात. पण हे पदार्थ भिजवल्याने ही संयुगे नष्ट होण्यास मदत होते, ज्यामुळे अधिक योग्य पोषक द्रव्ये शोषून घेण्यास मदत करतील.”

How To Make Dahi Mirchi dahi mirchi recipe in Marathi
झणझणीत दही मिरची; दोन भाकऱ्या जास्त खाल या दह्यातल्या मिरचीसोबत, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ramphal health benefits In Marathi
Ramphal : रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Should You Cook Everything In Ghee? Pros And Cons You Need To Know
जेवणात तेल वापरावे की तूप? हा प्रश्न पडलाय; महिलांनो जाणून घ्या उत्तर
healthy honey
भेसळयुक्त मध कसा ओळखावा? चांगला मध शरीराला कसा फायदेशीर ठरतो?
Why Drinking Cold Water May Not Be Good For Your Digestive System, As Per Experts
थंड पाणी सोडून रोज कोमट पाणी प्यायलं तर शरिरावर काय परिणाम होतील? तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे

सुपरफूड्स खाण्यापूर्वी भिजवण्याचे फायदे (Benefits of soaking superfoods before eating them)

  • पोट फुगणे आणि अस्वस्थता कमी करते: सुपरफूड्स खाण्यापूर्वी भिजवल्याने पचनसंस्थेला त्रास देणारे लॅक्टिन सारख्या पोषक घटकांना तटस्थ करून, पचन सुलभ होते.
  • चव सुधारते: काही सुपरफूड कठोर किंवा कठीण असू शकतात. भिजवल्याने त्यांचा पोत मऊ होतो, ज्यामुळे ते खाण्यास अधिक आनंददायक बनतात आणि त्याची चवही सुधारते
  • स्वयंपाकाचा वेळ कमी होतो: आधीच भिजवलेल्या शेंगा आणि धान्ये पटकन जलद शिजतात, त्यामुळे स्वयंपाकघरातील तुमचा वेळ वाचतो.

हेही वाचा- Foxtail Millet : मधुमेह ते कोलेस्ट्रॉल सर्वांवर गुणकारी ‘बाजरी’! पाहा डॉक्टरांनी सांग…

भिजवून वाढवा ‘या’ सुपरफूड्सचे फायदे (Superfoods to Supercharge with Soaking)

  • क्विनोआ (Quinoa) : क्विनोआ भिजवल्याने त्याचे कडू आवरण काढून टाकते, पचनक्षमता वाढते आणि स्वयंपाकाचा वेळ कमी होतो
  • चिया बिया : चिया बिया या भिजवल्याने फुगतात आणि जेलसारख्या दिसतात. तुम्ही त्या स्मूदी आणि पुडिंगमध्ये वापरू शकता जे पोषकतत्वांचे शोषण वाढवतात.
  • बदाम: बदाम भिजवल्याने एंझाइम इनहिबिटर आणि फायटिक ऍसिड तटस्थ होतात, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखी मौल्यवान खनिजे उघडतात.
  • ओट्स: ओट्स रात्रभर भिजवल्याने त्यातील स्टार्च वेगळा होतो आणि फायटिक ऍसिड कमी होतो, परिणामी क्रिमसारखा पोत येतो आणि पचन सुधरणे फायदा होतो.
  • डाळी: डाळी भिजवल्याने स्वयंपाकाचा वेळ कमी होतो, शर्करेच विघटन करते ज्यामुळे पचनक्रिया सुलभ होते आणि फायटिक ऍसिडसारखे पोषक घटक कमी होतात.

या फायद्यांबाबत सहमती दर्शवताना यशोदा हॉस्पिटल्सचे एक वरिष्ठ सल्लागार डॉक्टर दिलीप गुडे ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, “सुपरफुड भिजवण्यामुळे त्यातील मूलत: असलेले टॅनिन आणि फायटेट्स विरघळतात, लोह, झिंक कॅल्शियम आणि प्रथिने यांचे शोषण सुधारते. हे एन्झाईम इनहिबिटरच्या विघटनाला देखील चालना देते, पोषक द्रव्यांचे सेवन वाढवते.”

हेही वाचा – महिलांनी आठवड्यातून केवळ ‘इतकी’ मिनिटे व्यायाम केल्यास मृत्यूचा धोका होतो २४ टक्के कमी; तर पुरुषांना.

  • सुपरफुड भिजवण्याच्या टिप्स:
  • बहुतेक सुका मेवा आणि बिया ६-८ तास भिजवल्याने फायदा होतो. शेंगांसाठी, ८-१२ तास पुरेसे आहेत.
  • फिल्टर केलेले पाणी वापरा आणि चव वाढवण्यासाठी चिमूटभर मीठ घालू शकता.
  • वापरण्यापूर्वी किंवा शिजवण्यापूर्वी साफ करून घ्या आणि स्वच्छ धुवा.

लक्षात ठेवा, भिजवणे प्रत्येकासाठी पदार्थासाठी आवश्यक नाही पण तुम्ही या सुपरफूड्सची आरोग्याला मिळणारे फायदे वाढवू इच्छित असाल, तर तुम्ही भिजवण्यासारखी सोपी गोष्ट करून पोषणमुल्य वाढवू शकता.

Story img Loader