बटाटा आपल्या आहारातील अविभाज्य भाग आहे. मग तो उकडलेला असो, तळलेला असो, परतलेला असो किंवा बटाट्याचा रसा किंवा चाट म्हणून असो बटाट्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. बटाट्याची चवच अशी आहे की त्यापासून तयार केलेला पदार्थ अत्यंत स्वादिष्ट असतो त्यामुळेच अनेक लोक बटाटा खाणे टाळू शकत नाही पण असे काही लोक आहे जे बटाटा खाणे टाळतात. विशेषत: वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक बटाटा खाणे टाळतात. पण पोषण तज्ज्ञ दीपशिखा जैन यांनी सांगितले की, “वजन कमी करतानाही आता बटाट्यांचाही आस्वाद घेता येईल फक्त बटाटा तळून खाऊ नका. बटाटा ६-७ तास शिजवा आणि थंड करा आणि नंतर त्याचे सेवन करा. त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल. तसेच, कर्बोदके स्त्रोत असलेल्या पोळी/भात/ब्रेडसह एकत्र न करता स्नॅक्स म्हणून किंवा प्रथिनेयुक्त बटाटा खा,”

View this post on Instagram

A post shared by Deepsikha Jain (@fries.to.fit)

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Cucumber, flower, brinjal, carrot,
पुणे : काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजर स्वस्त

हेही वाचा – दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करावे का? जाणून घ्या त्याचे अनेक फायदे आणि काही तोटे

खरचं बटाटा खाण्याचा हा योग्य मार्ग आहे का?

याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मुंबईच्या झिनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितले की,”बटाट्यामध्ये साधे कार्बोहायड्रेट असतात, ज्यामुळे वजन लक्षणीय वाढते. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, जास्त बटाटे खाल्याने तुमच्या आरोग्यालाही धोका पोहचू शकतो. बटाटे अनेकदा अनेक मसाले, लोणी, तूप, औषधी वनस्पती, मलई आणि तेलामध्ये शिजवले जातात जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. यामुळे बटाट्यातील कॅलरी घटक देखील वाढू शकते. बटाटा ही एक “स्टार्चयुक्त भाजी” आहे जी कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनेंनी समृद्ध आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे.

“कर्बोदकांसारख्या पोषक घटकांचे साखरेत रूपांतर सहज होते आणि शरीरात फॅट्सच्या स्वरुपात साठवले जाते. ज्यांची पचनसंस्था नाजुक आहे अशा लोकांमध्ये पचन क्रिया मंद होऊ शकते. जर तुम्ही सातत्याने बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खात असाल तर सावध रहा. उकडलेले किंवा शिजवलेले बटाटे देखील जास्त प्रमाणात खाल्ले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते.” असे पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा – रोजच्या आहारात सलग दोन आठवडे हळद वापरल्यास शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा….

पटेल यांनी चांगल्या आरोग्यासाठी संयमाने खाण्यावर भर दिला. “तुम्ही बटाटे कमी तेल आणि मसाले वापरून तयार करण्याचा प्रयत्न करू शकता,” असे ते म्हणाले.

पटेल यांनी असेही सांगितले की,”पोटाच्या समस्यांवर बटाटे मदत करू शकतात जसे की अतिसार, परंतु ते प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर अवलंबून असते. त्यांनी लोकांना सल्ला दिला की, “ऑनलाइन सांगितल्या जाणाऱ्या हॅक्सवर आणि व्हिडिओवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये नवीन बदल करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहारतज्ज्ञांशी बोला.”

Story img Loader