बटाटा आपल्या आहारातील अविभाज्य भाग आहे. मग तो उकडलेला असो, तळलेला असो, परतलेला असो किंवा बटाट्याचा रसा किंवा चाट म्हणून असो बटाट्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. बटाट्याची चवच अशी आहे की त्यापासून तयार केलेला पदार्थ अत्यंत स्वादिष्ट असतो त्यामुळेच अनेक लोक बटाटा खाणे टाळू शकत नाही पण असे काही लोक आहे जे बटाटा खाणे टाळतात. विशेषत: वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक बटाटा खाणे टाळतात. पण पोषण तज्ज्ञ दीपशिखा जैन यांनी सांगितले की, “वजन कमी करतानाही आता बटाट्यांचाही आस्वाद घेता येईल फक्त बटाटा तळून खाऊ नका. बटाटा ६-७ तास शिजवा आणि थंड करा आणि नंतर त्याचे सेवन करा. त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल. तसेच, कर्बोदके स्त्रोत असलेल्या पोळी/भात/ब्रेडसह एकत्र न करता स्नॅक्स म्हणून किंवा प्रथिनेयुक्त बटाटा खा,”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in