प्रत्येक जण आपले वाढते वय लपवण्याकरिता आणि तरुण दिसण्यासाठी अनेक उपाय आणि सुपरफूड शोधत असतात. विदेशी बेरीपासून ट्रेंडी सप्लिमेंट्सपर्यंत, तरुणाईची गुरुकिल्ली असल्या करण्याचा दावा करणारे अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक फळ म्हणजे आंबा, ज्याचे सेवन केल्याने तुम्ही तरुण दिसू शकता असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे.

आरोग्य प्रशिक्षक आणि कंटेंट क्रिएटर दिग्विजय सिंग तरुण दिसण्यासाठी आंबा खाण्याचा सल्ला देतात. ते सांगतात की, “मध्यम आकाराचा आंबा तुमच्या रोजच्या व्हिटॅमिन सीच्या ५० ते ६० टक्के गरजा पूर्ण करेल. व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादनास चालना देईल, ज्यामुळे तुमची त्वचा अधिक लवचिक राहते आणि सुरकुत्या टाळण्यास मदत होईल.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

पण, या दाव्यात काही तथ्य आहे का?

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल्स, बंगलोरच्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ डॉ. ट्विन्सी ॲन सुनील म्हणतात, “वृद्धत्व कमी करण्याच्या आणि तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या संशोधनात आंब्यांसह विविध नैसर्गिक फळे आणि खाद्यपदार्थांवर महत्त्वपूर्ण संशोधन झाले आहे. आंबा, ज्याला बऱ्याचदा ‘फळांचा राजा’ म्हणून संबोधले जाते, तो चवदार असतोच, पण त्यामध्ये अनेक प्रभावी पौष्टिक घटकदेखील असतात. आंब्यामध्ये अनेक बायोएक्टिव्ह संयुगे समृद्ध असतात, ज्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म दिसून येतात.

हेही वाचा – कोरफड रस का प्यावा? कसे करावे सेवन? तज्ज्ञांनी केला खुलासा

आंब्यामध्ये हे मुख्य संयुगे समाविष्ट आहेत:

अँटिऑक्सिडंट्स: आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यांसारखे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन सी त्वचा सैल पडू नये यासाठी आणि सुरकुत्या यांसारख्या वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोलेजनला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते. व्हिटॅमिन ए त्वचेच्या पेशींचे पुनरुत्पादन करण्यास, तारुण्याचा रंग राखण्यास मदत करते.

मँगीफेरिन : पॉलिफेनॉल जे प्रामुख्याने आंब्यामध्ये आढळते, जे त्याच्या अँटिऑक्सिडंट, दाहक विरोधी आणि संभाव्यतः कर्करोगविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते.

कॅरोटीनॉइड्स : फळामध्ये बीटा-कॅरोटीन आणि झेक्सॅन्थिनसह मोठ्या प्रमाणात कॅरोटीनॉइड्स असतात. आंब्यामध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे त्वचेचे नूतनीकरण करण्यास मदत करते आणि अतिनील प्रकाशामुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण देते.

फेनोलिक संयुगे : आंब्यामध्ये गॅलिक ॲसिड, क्वेर्सेटिन आणि इलाजिक ॲसिडसह हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. हे संयुगे मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात.

हेही वाचा – दही खरोखरच थंड आहे की ते शरीरामध्ये उष्णता वाढवते? दह्याचा शरीरावर कसा होता परिणाम? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

मल्टीफिटचे प्रशिक्षक आणि पोषणतज्ज्ञ भरत नायडू माहिती देतात, “व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन यांसारखे अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सला तटस्थ (Neutralize) करतात. हे मुक्त पेशींना नुकसान पोहचवण्यास आणि वाढत्या वृद्धत्वासाठी जबाबदार असतात. दरम्यान, मँगिफेरिन आणि क्वेर्सेटिनसारखे पॉलीफेनॉल दाहक विरोधी गुणधर्मामुळे वृद्धत्वाबरोबर सतत होणारी जळजळ शांत होते. याव्यतिरिक्त, आंब्यातील काही संयुगे डीएनए दुरुस्तीच्या यंत्रणेला चालना देतात.

वृद्धत्वविरोधी प्रभावांसाठी ओळखले जाणाऱ्या इतर फळे किंवा खाद्यपदार्थ यांच्याशी आंब्याची तुलना

वृध्दत्वविरोधी गुणधर्मांच्या बाबतीत बेरी किंवा डाळिंबांसारखे फळांच्या तुलनेत आंबा हा मुख्य आकर्षण ठरत नाही. नायडू म्हणतात, “बेरी किंवा डाळिंबांसारख्या गोड आणि रसाळ फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतात.”

“एंथोसायनिन समृद्ध ब्लूबेरी मेंदूसाठी आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी विशेषतः आश्चर्यकारक आहेत. ब्लुबेरी मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक शक्तिशाली असू शकतात,” असे डॉ. सुनील ठासून सांगतात.

“ग्रीन टीमध्ये कॅटेचिन असतात, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात. आंबा हे अँटिऑक्सिडंट्सचे वेगळे स्पेक्ट्रम देतात, ज्यामुळे ते उत्कृष्ट ठरण्याऐवजी पूरक पर्याय ठरतात. निरोगी फॅट्सने समृद्ध, ॲव्होकॅडो त्वचेचे आरोग्य आणि शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात” असेही डॉ. सुनील यांनी सांगितले

आंबा त्वचेसाठी फायदेशीर असून त्यात प्रामुख्याने अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. डाळिंब त्यांच्या उच्च पॉलिफेनॉल घटकांमुळे, विशेषत: प्युनिकलॅजिन्स आणि इलाजिक ॲसिडमुळे (punicalagins and ellagic acid) त्यांच्या वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात.

डॉ. सुनील स्पष्ट करतात, “हे संयुगे सेल्युलर आरोग्यास प्रोत्साहन देतात आणि जळजळ कमी करतात. मँगिफेरिन, कॅरोटीनॉइड्स आणि जीवनसत्त्वे यांचे अनोखे मिश्रण असलेला आंबा वृद्धत्वविरोधी फायद्यांचा पूरक पर्याय ठरतो.