अन्न, वस्त्र व निवारा यांप्रमाणे आता स्मार्टफोनसुद्धा आजच्या काळातील मनुष्याची एक मूलभूत गरज बनली आहे. घरात सर्वांच्याच हातात स्मार्टफोन असल्याने लहानपणापासून बाळालासुद्धा स्मार्टफोनची आवड वाटून, मग ओढ लागते. पालकसुद्धा बाळाचे कौतुक म्हणून, तर कधी कधी नाईलाजाने त्याच्या हातात मोबाईल देतात. पण हळूहळू बाळ जसे मोठं होत जाते तसतसे त्याचे स्मार्टफोन अॅडिक्शन वाढत जाते. सध्या हीच गोष्ट अनेक पालकांसाठी चिंतेचे कारण बनली आहे. मात्र, दुर्दैवी वस्तुस्थिती अशी आहे की, आपण सर्व जण आपल्या स्मार्टफोनमध्ये अडकलो आहोत. मोबाईल आता केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नसून, वेळ तपासणे, ठिकाण शोधणे, अलार्म सेट करणे, तिकिटे बुक करणे यांसाठी अशा अनेक गोष्टींसाठी मदत करतो. परंतु, या वाढलेल्या स्क्रीन-टाइमचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि मग यातून बाहेर पडणे कठीण वाटू शकते. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, जेव्हा मूल हट्ट करते किंवा रडते तेव्हा त्याला शांत करण्यासाठी पालक सर्रास फोन त्याच्या हातात देतात. मूल कधी कधी फोनवर व्हिडीओ स्क्रोल करताना किंवा गेम खेळताना दिसतात. आधी पालकांकडे त्यांचा फोन देण्यासाठी हट्ट करणारी मुलं हळूहळू मग स्वत:चा वेगळा स्मार्टफोन मागविण्याचा हट्ट करू लागतात. अनेक वेळा मुलं त्यांच्या हट्टाखातर खाणं-पिणंही सोडून देतात. मात्र, आता एका ट्रिकमुळे मुलांचे फोनचे व्यसन अवघ्या सहा मिनिटांत सुटू शकते.

डॉक्टरांनी सांगितली ट्रिक

Why do we feel so thirsty after eating a gluten rich meal ग्लूटेनयुक्त जेवण खाल्ल्यानंतर आपल्याला इतकी तहान का लागते? तज्ज्ञांनी केला खुलासा
छोले कुल्चे, लसुण नान, पनीर सारखे पदार्थ खाल्यानंतर आपल्याला इतकी तहान का लागते?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
What happens to the body when you sleep at 8 PM and wake up at 4 AM? health tips
जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल? वाचा डॉक्टर काय सांगतात
HMPV Virus Causes Symptoms Treatment in marathi
HMPV Virus Causes Treatment : एचएमपीव्ही व्हायरसचा कहर! हा आजार किती घातक, नेमकी लक्षणे काय? संसर्गावर उपाय कोणते? जाणून घ्या सर्व काही….
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य

“एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, केवळ सहा मिनिटे वाचन केल्याने तणाव ६८ टक्क्यांनी कमी होतो. वाचन वाढवल्याने तणाव कमी होतो आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. परिणामत: अशा प्रकारे मोबाईलचे व्यसनही सुटू शकते.

ससेक्स विद्यापीठातील संज्ञानात्मक न्यूरो सायकॉलॉजिस्ट डेव्हिड लुईस यांनी केलेल्या २००९ च्या अभ्यासातून असेही निदर्शनास आणले आहे, “पुस्तक वाचन हे केवळ तुमची एकाग्रताच वाढवत नाही, तर तुमच्या सर्जनशीलतेलाही चालना देते.

बंगलोर येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलचे बालरोग न्यूरोलॉजी, सल्लागार डॉ. रवी कुमार सी. पी. यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी जास्त प्रमाणात फोन वापरण्याचे नकारात्मक परिणाम कसे कमी करायचे ते सांगितले आहे. “वाचन केवळ मनालाच चालना देत नाही, तर सकारात्मक विचार आणि आकलन कौशल्येदेखील वाढवते. त्यामुळे शब्दसंग्रह वाढतो आणि ज्ञानधारणेतही सुधारणा होते; जे शिक्षणासाठी आवश्यक आहे. त्यामुळे दैनंदिन दिनचर्येमध्ये वाचन समाविष्ट करणे हा एक फायदेशीर पर्याय आहे, जो मानसिक आरोग्य सुधारण्यास प्रोत्साहन देतो.

हेही वाचा >> जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल? वाचा डॉक्टर काय सांगतात

दिवसातून किती वेळ वाचन करावे?

एखाद्याने दररोज वाचनासाठी किती वेळ घालवला पाहिजे हे विचारले असता, डॉ. कुमार म्हणाले की, प्रत्येक दिवशी वाचनासाठी किती वेळ समर्पित केला पाहिजे हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, फायदे मिळविण्यासाठी आपण दररोज किमान ३० मिनिटे ते एक तास वाचन करण्याचे लक्ष्य ठेवावे, अशी शिफारस केली जाते.

स्क्रीन टाइममध्ये वाचनाला प्राधान्य द्यावे. त्यांचा विश्वास आहे की, लोक तंत्रज्ञानाशी निरोगी नातेसंबंध जोपासू शकतात आणि एकाच वेळी त्यांची एकाग्रता आणि एकूणच संज्ञानात्मक क्षमता वाढवू शकतात, छंद जोपासू शकतात.

Story img Loader