अन्न, वस्त्र व निवारा यांप्रमाणे आता स्मार्टफोनसुद्धा आजच्या काळातील मनुष्याची एक मूलभूत गरज बनली आहे. घरात सर्वांच्याच हातात स्मार्टफोन असल्याने लहानपणापासून बाळालासुद्धा स्मार्टफोनची आवड वाटून, मग ओढ लागते. पालकसुद्धा बाळाचे कौतुक म्हणून, तर कधी कधी नाईलाजाने त्याच्या हातात मोबाईल देतात. पण हळूहळू बाळ जसे मोठं होत जाते तसतसे त्याचे स्मार्टफोन अॅडिक्शन वाढत जाते. सध्या हीच गोष्ट अनेक पालकांसाठी चिंतेचे कारण बनली आहे. मात्र, दुर्दैवी वस्तुस्थिती अशी आहे की, आपण सर्व जण आपल्या स्मार्टफोनमध्ये अडकलो आहोत. मोबाईल आता केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नसून, वेळ तपासणे, ठिकाण शोधणे, अलार्म सेट करणे, तिकिटे बुक करणे यांसाठी अशा अनेक गोष्टींसाठी मदत करतो. परंतु, या वाढलेल्या स्क्रीन-टाइमचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि मग यातून बाहेर पडणे कठीण वाटू शकते. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की, जेव्हा मूल हट्ट करते किंवा रडते तेव्हा त्याला शांत करण्यासाठी पालक सर्रास फोन त्याच्या हातात देतात. मूल कधी कधी फोनवर व्हिडीओ स्क्रोल करताना किंवा गेम खेळताना दिसतात. आधी पालकांकडे त्यांचा फोन देण्यासाठी हट्ट करणारी मुलं हळूहळू मग स्वत:चा वेगळा स्मार्टफोन मागविण्याचा हट्ट करू लागतात. अनेक वेळा मुलं त्यांच्या हट्टाखातर खाणं-पिणंही सोडून देतात. मात्र, आता एका ट्रिकमुळे मुलांचे फोनचे व्यसन अवघ्या सहा मिनिटांत सुटू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा