चालणे हा आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे सांगितले जाते, पण जेवणानंतर तुम्ही चालता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवर नेमका काय परिणाम होतो हे माहित्येय का? अनेकदा CGM वापरून रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणारे हेल्थ कन्टेंट क्रिएटर जस्टिन रिचर्ड यांच्या म्हणण्यानुसार, “जेवणानंतर किमान ३० मिनिटे चालल्याने साखरेचे प्रमाण तितके वाढत नाही, जितके व्यक्ती बसून असताना वाढते. “चालणे हे रक्तातील साखरेच्या प्रमाणात होणारी वाढ कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे,” असे त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केले आहे.

रक्तातील साखरेच्या प्रमाणाबद्दल आपल्याला काय माहिती आहे?

मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. जिनेंद्र जैन यांनी सांगितले की, “जेवणानंतर चालणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करू शकते.”

रक्तातील साखरेचे प्रमाण याला ग्लुकोज पातळी म्हणूनही ओळखले जाते. रक्तातील साखरेचे प्रमाण प्रामुख्याने तुमच्या रक्तप्रवाहातील साखरेचे प्रमाण दर्शवते. “रक्तातील साखरेच्या प्रमाणात दिवसभर सहज चढउतार होऊ शकतो, विशेषतः जेवणानंतर. जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा तुमच्या अन्नातील कर्बोदके ग्लुकोजमध्ये रुपांतरीत होतात, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते,” असे डॉ. जैन म्हणाले.

हेही वाचा – जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

चालण्याचा तुमच्या साखरेच्या प्रमाणावर कसा परिणाम होतो? walking How does walking affect your sugar levels?

तुमचे शरीर इन्सुलिन सोडते, ज्यामुळे ग्लुकोज तुमच्या रक्तप्रवाहातून पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी किंवा स्टोरेजसाठी सहजतेने प्रवास करण्यास मदत करते,” असे डॉ. जैन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पन्नाशीतही सुंदर दिसणारी करिष्मा कपूर म्हणते, “मी माझ्या फिटनेसला फारसे महत्त्व देत नाही”; काय आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य?

चालणे कसे मदत करते?

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा तुमचे स्नायू सक्रिय होतात आणि प्रभावीपणे कार्य करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आवश्यक असू शकते. “जेवल्यानंतर चालल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक जेवणानंतर व्यक्तींनी फिरायला जाण्याची शिफारस केली जाते,” असे डॉ. जैन म्हणाले.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणारे पदार्थ खाणे टाळा आणि आरोग्यदायी आणि संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा.

मधुमेह (diabetes) किंवा मधुमेह पूर्वस्थितीमध्ये ( pre-diabetic) असलेल्या लोकांनी आपण काय खात आहोत, याबाबत अधिक सतर्क आणि सावध असणे आवश्यक असून शारीरिक हालचालींकडे लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. जैन यांनी सांगितले.

जेवणानंतर चालण्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो, म्हणून दिनचर्येत कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा.