नागपूर ते इंदूर विमानाला ऑपरेशनल कारणांमुळे उशीर झाल्याची घटना घडली. विमान उड्डाणाला तीन तास उशीर झाल्यानंतर अनेक प्रवाशांना नुकतीच एक्सपायरी डेट संपलेली बिस्किटे देण्यात आल्याचा आरोप अनेक अहवालांद्वारे केला आहे. या पार्श्वभूमीवर एक्सपायरी डेट संपलेली बिस्किटे खाणे चिंतेचे कारण का ठरू शकते हे समजून घ्या…
दिल्ली, सीके बिर्ला हॉस्पिटल (आर), इंटरल मेडिसन, लीड कन्सल्टंट डॉ. नरेंद्र सिंघला यांनी याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की,” एक्सपायरी डेट संपलेली बिस्किटे, जी दूषित आणि खराब (contamination and spoilage) झाल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते.
हेही वाचा – ड जीवनसत्त्व मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याची योग्य वेळ कोणती? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
“ अल्पकालीन (Short Term) परिणामांमध्ये हानिकारक जीवाणू, विषाणू किंवा Mould ( हा बुरशीचा एक प्रकार आहे) मुळे अन्न विषबाधा होऊ शकते आणि मळमळ, उलट्या, अतिसार आणि पोटात पेटके यांसारख्या विषबाधेची लक्षणे दिसू लागतात. काही व्यक्तींना अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, खाज सुटणे किंवा सूज यांसारख्या ऍलर्जिक प्रतिक्रियांचा अनुभव येऊ शकतो,” असे डॉ. सिंघला यांनी स्पष्ट केले.
डॉ. सिंघला यांच्या मते, “दीर्घकालीन (Long term) परिणामांबाबतीत जठरांसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) किंवा इन्फ्लमेटरी बॉऊस सिंड्रोम (IBD), तसेच साल्मोनेला (Salmonella) किंवा ई. कोलाई (E. coli. ) सारख्या आरोग्य समस्या होऊ शकतात.”
डॉ. सिंघला म्हणाले की, “एक्सपायरी डेट संपलेल्या बिस्किटांच्या सेवनामुळे त्यातून मिळणारे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते, ज्यामुळे जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता उद्भवू शकते.”
“बिस्किटाचा प्रकार ते कशा पद्धतीने साठवले आहे आणि वैयक्तिक आरोग्य यांसारखे घटक आरोग्यावर होणाऱ्या प्रभावाच्या तीव्रतेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे एक्सपायरी डेट संपलेली बिस्किटे खाणे टाळा आणि चुकून खाल्ले असल्यास लक्षणांवर लक्ष ठेवणे चांगले आहे.” असेही डॉ. सिंघला म्हणाले.
सतत पचन समस्या जाणवत असलेल्या कोणत्याही व्यक्तीने योग्य मूल्यांकन आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा किंवा गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.
काय काळजी घ्यावी?
“नेहमी पॅकेजमधील अन्नपदार्थ खाण्यापूर्वी त्यावरील लेबलकडे लक्ष द्या आणि ताजी उत्पादने निवडा. हे एक्सपायरी डेट संपण्यापूर्वी सेवन केले पाहिजे. तसेच असे पर्याय निवडा, ज्यामध्ये अतिरिक्त शर्करा, सॅच्युरेटेड फॅट्स आणि सोडियम कमी आहेत”, असे डॉ. सिंघला म्हणाले.
याबाबत आर्टेमिस हॉस्पिटल्स, डर्मटॉलॉजिस्ट आणि सीनिअर कन्सल्टंट डॉ. पूजा अग्रवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेला सांगितले की, “best before” तारखा सहसा उत्पादनाच्या गुणवत्तेशी संबंधित असतात. जसे की चव आणि पोत आणि बहुतेक वेळा ही तारीख नाशवंत नसलेल्या उत्पादनांवर आढळतात. उदाहरणार्थ कॅनमधील कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्स यांसारख्या वस्तूंसाठी.
हेही वाचा –तुम्ही दिवसभरातील शेवटचे जेवण कोणत्या वेळी केले पाहिजे? तज्ज्ञांनी केला खुलासा
तसेच “use by” आणि “expiry” तारखा अधिक लक्ष देऊन पाहणे महत्त्वाचे आहे, कारण ते सुरक्षिततेशी संबंधित आहेत. विशेषत: दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि फार्मास्युटिकल्स (औषधे) सारख्या नाशवंत वस्तूंसाठी.
“आरोग्य धोके टाळण्यासाठी या वस्तूंचे सेवन किंवा त्यांच्या सूचित तारखा संपल्यानंतर वापरू नये,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd