दिवसाची सुरुवात एक ग्लास आवळा पाण्याने करण्याची जुनी प्रथा अलीकडच्या वर्षांत नव्याने चर्चेत आली आहे, कारण लोक आरोग्य आणि निरोगीपणासाठी पुन्हा नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत.

आवळा, ज्याला भारतीय गूसबेरी म्हणूनही ओळखले जाते; जो शतकानुशतके आयुर्वेदिक औषधांमध्ये एक प्रमुख पदार्थ आहे, त्याचा शक्तिशाली पौष्टिक गुणधर्म आणि असंख्य आरोग्य फायद्यांसाठी त्याला ओळखले जाते. पण, जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर आवळा पाणी पिता तेव्हा तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो?

Aaji hairs makeover video viral on social media
आजीचा जगात भारी लूक! नातीच्या लग्नासाठी केली खास तयारी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
Does Onion Juice really work for Stomach Aches
पोटदुखीपासून आराम मिळण्यासाठी खरंच कांद्याचा रस फायद्याचा आहे का? कुशा कपिलाने सांगितला वैयक्तिक अनुभव; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात?
How Wankhede Stadium Built| History and Significance of Wankhede Stadium Mumbai
Wankhede Stadium Mumbai: मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं वानखेडे स्टेडियम, मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियमच्या जन्माची रंजक कहाणी
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
The Indian village that witnesses the first rays of the Sun 1st Sunrise In India
भारतातील ‘या’ गावात दुपारी ४ वाजताच होतो सूर्यास्त अन् पहाटे ३ वाजता उगवतो सूर्य, ट्रेकिंगसाठी अद्भुत ठिकाण
Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच

रोज आवळा पाणी पिण्याचे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम (Long-term impact of drinking amla water every day in the morning on overall health)

याबाबत कनिक्का मल्होत्रा, सल्लागार आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगतात, “रोज सकाळी आवळा पाणी पिण्याने अनेक दीर्घकालीन आरोग्य फायदे होऊ शकतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे भरपूर प्रमाण असल्याने रोगप्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या वाढते व शरीराला आणि आजाराबरोबर लढण्यास मदत करते.

त्यांनी पुढे त्यांनी सांगितले की “ आवळा पाण्याच्या नियमित सेवन केल्यास त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे जे मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात परिणामी आरोग्यदायी, चमकदार त्वचा मिळते, याव्यतिरिक्त, आवळा पाणी चयापचय सुधारून आणि पोषक तत्वांचे चांगले शोषण करण्यास मदत करते जे दिवसभर नैसर्गिक आणि शाश्वत ऊर्जा वाढवू शकते.”

हेही वाचा – “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल

रोज रिकाम्या पोटी आवळा पाणी पिण्याचे मुख्य आरोग्य फायदे (Key health benefits of drinking amla water on an empty stomach every day)

मल्होत्रा ​​तुमच्या दैनंदिन सकाळच्या दिनचर्येत आवळा पाणी समावेश करण्याचे संभाव्य फायदे सांगतात:

व्हिटॅमिन सी (Rich in Vitamin C) : आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे भरपूर प्रमाण असते. व्हिटॅमिन सी हे एक महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडेंट आहे, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि शरीरातील मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करते. रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्याने इतर खाद्यपदार्थांच्या तुलनेत कमी स्पर्धा असल्यामुळे थोडे चांगले शोषण होऊ शकते.

रक्तातील साखरेचे व्यवस्थापन (Blood Sugar Management) : काही अभ्यास सुचवतात की, “आवळा रक्तातील साखरेच्या पातळीवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. रिकाम्या पोटी आवळा पाणी पिणे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु अधिक संशोधन आवश्यक आहे.

त्वचेचे आरोग्य (Skin Health) : आवळ्यातील व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादनात योगदान देते, त्वचेची लवचिकता वाढवते आणि संभाव्य सुरकुत्या कमी करते. आवळ्याचे पाणी उजळ रंगात योगदान देऊ शकते, परंतु त्याचा थेट परिणाम अधिक तपासणे आवश्यक आहे.

हेही वाचा – एका सिगारेटमुळे पुरुष गमावतात आयुष्यातील १७ मिनिटे आणि महिला २२ मिनिटे; संशोधनातून धक्कादायक खुलासा….

आवळा पाणी रोज सेवन करण्याशी संबंधित संभाव्य दुष्परिणाम किंवा जोखीम (Potential side effects or risks associated with consuming amla water daily)

मल्होत्रा ​​सांगतात की, “आवळा पाणी दररोज सेवन करताना काही संभाव्य दुष्परिणाम आणि जोखीम विचारात घेणे आवश्यक आहे.”

आंबटपणा (Acidity) : आवळ्यातील उच्च व्हिटॅमिन सी घटक आम्लतामध्ये बदलते. रोज त्याचे सेवन करणे विशेषत: रिकाम्या पोटी, काही लोकांना छातीत जळजळ होणे, अपचन किंवा आधीपासून त्रास देणारे ॲसिड रिफ्लक्स बिघडू शकते. आवळा पाणी पातळ करून हलक्या जेवणानंतर सेवन केल्याने हे कमी होण्यास मदत होते.

निर्जलीकरण (Dehydration) : आवळ्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा प्रभाव असतो, याचा अर्थ लघवी वाढते. अधूनमधून विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते, परंतु जर दररोज नियमित पाणी पिण्याचे प्रमाण संतुलित न राहिल्यास निर्लजलीकरण होऊ शकते. दिवसभर भरपूर पाणी पिण्याची खात्री करा.

रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Levels) : आवळा रक्तातील साखरेच्या पातळीचे व्यवस्थापन करण्याचे आश्वासन देते, पण जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही व्यक्तींमध्ये हायपोग्लाइसेमिया (रक्तातील साखरची पातळी कमी होणे) होऊ शकते. हे विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा रक्तातील साखरचे प्रमाण कमी करणारी औषधे घेत असलेल्यांसाठी महत्त्वाचे आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आवळा पाणी समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्या.

दातांची धूप (Tooth erosion) : आवळ्याच्या पाण्यात आम्ल गुणधर्म असतात जे कालांतराने दातांना मुलामा चढवू शकते. आवळा पाणी प्यायल्यानंतर आपले तोंड साध्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि तोंडाची स्वच्छता चांगल्या पद्धतीने राखल्यास हा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा – छोले कुल्चे, लसुण नान, पनीर सारखे पदार्थ खाल्यानंतर आपल्याला इतकी तहान का लागते?

मल्होत्रा ​​ठामपणे सांगतात, “आवळा पाणी पचनास मदत करते, पण तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे आणि गरजांकडे लक्ष द्या. आवळा पाणीमध्ये पाणी टाकून त्याचा प्रभाव सौम्य करा किंवा छातीत जळजळ होत असल्यास ते पिणे टाळा. विशेषत: जर तुमची गंभीर आरोग्य स्थिती असेल किंवा औषधे घेत असाल तर रोज आहारात आवळा पाणी समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य पचन आणि चयापचय यासाठी पौष्टिक आणि वैयक्तिकृत आहार आणि व्यायाम निवडण्याचा विचार करा.

टीप : हा लेख सार्वजनिक डोमेन आणि/किंवा तज्ज्ञाच्या माहितीवर आधारित आहे. कोणतीही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.

Story img Loader