दुधाचा चहा हे एक आनंददायक पेय आहे. आपल्याकडे दुधाच्या चहाचा जवळपास प्रत्येक जण चाहता आहे. या चहाप्रेमींचा दिवस चहाशिवाय सुरू होऊ शकत नाही. पण, जेव्हा तुम्ही रोज दुधाचा चहा पिता तेव्हा तुमच्या शरीराचे काय होते? याचा कधी विचार केला आहे का?

याबाबत हंग्री कोआला येथील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ इप्सिता चक्रवर्ती द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगतात, “दुधात असलेल्या कॅल्शियममुळे तुमची हाडे थोडी मजबूत होऊ शकतात. तुमचे वय वाढत असताना आणि ऑस्टिओपोरोसिस टाळायचे असल्यास हे विशेषतः उपयुक्त ठरते. चहामधील कॅफिन तुम्हाला अधिक सतर्क आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते. हे तुमच्या मेंदूच्या सामर्थ्यासाठी सौम्य धक्क्यासारखे काम करते. चहामध्ये अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात, जे तुमच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणाऱ्या लहान ढालीसारखे काम करतात.”

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

दररोज दुधाचा चहा प्यायल्याने त्यातील कॅफिनचा शरीरावर कसा परिणाम होतो?

दुधाच्या चहातील कॅफिन हे दुधारी तलवार आहे, असे चक्रवर्ती म्हणतात. “रोज सेवन केल्यावर ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकते. पण, जास्त प्रमाणात कॅफिनमुळे चिंता, अस्वस्थता आणि झोप लागणे कठीण होऊ शकते.”

दुधाच्या चहामध्ये विशिष्ट पोषक किंवा संयुगे आहेत, जे पचन किंवा चयापचय प्रभावित करू शकतात
दुधाच्या चहामधील घटक तुमच्या पचनावर परिणाम करू शकतात.

  • कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी : हे दुधाचे पोषक तत्व निरोगी हाडांसाठी आवश्यक आहेत आणि तुमचे चयापचय सुरळीत चालण्यास मदतदेखील करू शकतात.
  • अँटिऑक्सिडंट्स : ते तुमच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
  • टॅनिन : जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही, तर जास्त प्रमाणातील चहाच्या संयुगांच्या सेवनामुळे तुमच्या शरीराचा लोह शोषून घेण्याच्या क्षमतेमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.

हेही वाचा – चालण्याचा व्यायाम करताना हृदयाची धडधड वाढणे चांगले की वाईट? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

दररोज दुधाचा चहा प्यायल्याने वजन वाढण्यास किंवा इतर चयापचय समस्यांमध्ये होऊ शकतात का?

याबाबत सहमती दर्शवत चक्रवर्ती यांनी सांगितले की, दररोज दुधाच्या चहा प्यायल्यामुळे निरोगी वजन राखणे कठीण होऊ शकते.

“अनेक दुधाचे चहा साखरेने भरलेले कॅलरी बॉम्ब असतात. हे नियमितपणे प्यायल्याने त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो आणि टाइप २ मधुमेहासारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.”

दुधाच्या चहातील साखरेमुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी बिघडवू शकते, ती त्वरीत वर आणि खाली जाते. कालांतराने, हे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मधुमेहास कारणीभूत ठरू शकते.

दुधाच्या चहामध्ये साखर आणि फॅट्सचे मिश्रण आपल्या शरीरात, विशेषतः आपल्या पोटाभोवती फॅट्स साठवण्यास प्रोत्साहित करू शकते.

हेही वाचा – चालण्याचा व्यायाम करताना हृदयाची धडधड वाढणे चांगले की वाईट? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

नियमित दूध चहा पिणाऱ्यांनी काय लक्षात ठेवावे

दुधाचा चहा एक स्वादिष्ट आणि आनंददायक पेय असू शकतो, परंतु तुम्ही तो किती वेळा पिता आणि तुम्ही कोणता प्रकार निवडता हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी चक्रवर्ती खालील गोष्टींचे पालन करण्याची शिफारस करतात:

  • संयम महत्त्वाचा आहे : जास्त प्रमाणात दुधाचा चहा पिऊ नका.
    योग्य निवड करा : जेव्हा शक्य असेल तेव्हा साखरेशिवाय किंवा कमी गोड साखरेचा चहा प्या.
  • *भरपूर पाणी प्या : योग्य प्रकारे हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी पित असल्याची खात्री करा.
  • *पचनाचा त्रास होत असेल तर चहा टाळा : जर तुम्हाला पचनात काही त्रास होत असेल तर दुधाचा चहा कमी करा किंवा वेगळा प्रकार वापरून पाहा.

Story img Loader