बऱ्याच लोकांना नाश्त्यासाठी अंडी खायला आवडतात. भारतात अंडा करी, ऑम्लेट, मऊशार उकडलेले अंडे, सँडविच, भुर्जी म्हणून खाल्ले जाते. त्याचबरोबर फ्राईड राईस, रॅप्स, टोस्ट पॅनकेक्स, मफिन्स इतर मिष्टान्नामध्येही अंड्याचा वापर केला जातो. पण, काही लोकांना कच्चे अंडे खायला आवडते. आरोग्यप्रेमी किंवा अगदी जिममध्ये जाणारे लोक, जे आपली शरीरयष्टी तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. ते रोजच्या आहारात प्रथिने मिळविण्यासाठी कच्ची अंडी खातात, असे जेनोव्हा शाल्भ्य हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

पण, कच्चे अंडे खाणे खरेच हेल्दी आहे का? याचे उत्तर शोधण्याआधी अंड्यातील पौष्टिकतेबद्दल जाणून घेऊ या.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
How To Make Egg Fry
How To Make Egg Fry: भुर्जी पेक्षाही टेस्टी! १५ ते २० मिनिटांत बनवा ‘अंडा फ्राय’; लहान मुलंही आवडीने खातील ‘ही’ रेसिपी
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

अंड्यामध्ये कोणते पोषक घटक असतात?

पटेल यांनी सांगितले, “अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी ५, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ९, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स व सेलेनियमसारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, डीएचए व ईपीए यांसारखे निरोगी स्निग्धांश (फॅट्स)देखील असतात. अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये सर्वांत जास्त स्निग्धांश (फॅट्स) असतात. म्हणूनच काही लोक अंड्यातील पिवळ बलक खाणे टाळतात आणि जास्तीत जास्त प्रथिनांसाठी अंड्याचा पांढरा भाग खातात.”

कच्चे अंडे खावे की नाही?

पेशींच्या वाढीस चालना देणे, मेंदू व मज्जासंस्थेला समर्थन देणे, हार्मोनल उत्पादनास चालना देणे व स्निग्धांश (फॅट्स) विरघळणारी पोषक द्रव्ये शोषण्यासाठी मदत करणे यांसारख्या विविध कार्यांसाठी स्निग्धांश (फॅट्स) शरीरासाठी आवश्यक आहे हे लक्षात घ्या. “अंड्यांमधील खराब स्निग्धांशाचे (फॅट्स) प्रमाण तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. काहींचा असा विश्वास आहे. अंडी खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात. पण त्यासाठी कच्चे अंडे खाऊ नये. कारण- त्यामुळे आरोग्याच्या आणखी समस्या निर्माण होऊ शकतात”, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

कच्चे अंडे खाऊ नये पण का?

कच्चे अंडे आरोग्यासाठी चांगले आहे हा एक गैरसमज आहे. “salmonella risk (जठररोगविषयक आजार) टाळण्यासा लोकांना कच्चे अंडे न खाण्याचा सल्ला दिला जातो. काही लोक तज्ज्ञांचा सल्ला न घेताच सकाळी रिकाम्या पोटी कच्चे अंडे खातात आणि त्यामुळे पोटदुखी, पोटात कळ येणे, अतिसार, बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे आणि काही प्रकरणांमध्ये विषबाधा यांसारख्या पचनासंबंधी समस्या निर्माण होतात”, असे पटेल यांनी सांगितले.

कच्चे अंडे खाल्याने आरोग्याला काय धोका निर्माण होतो?

पटेल यांच्या मतावर सहमती दर्शविताना दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागामध्ये सल्लागार डॉ. विकास जिंदाल यांनी सांगितले की, कच्चे अंडे खाल्ल्याने अन्नातून होणारा संसर्गाचा (Risk of Foodborne Infection) धोका वाढतो विशेषत: साल्मोनेला बॅक्टेरिया (Salmonella Bacteria) ज्यामुळे अत्यंत गंभीर गॅस्ट्रोइंटेस्टायनलची समस्या होऊ शकते.

कच्च्या अंड्यांना उग्र वास असतो आणि त्यामुळे काही लोकांना अस्वस्थता जाणवू शकते, असा इशारा पटेल यांनी दिला. “कच्च्या अंड्यांची चव लोकांना न आवडणारी असते आणि पोत विचित्र असतो. त्यामुळे काही लोकांना उलट्या होणे किंवा मळमळल्यासारखे वाटू शकते. कच्चे अंडे हे शिजवलेल्या अंड्यांच्या तुलनेत पचायला जड असते आणि त्यामुळे जळजळ होणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास व अंगावर उठणार्‍या पित्ताच्या गाठी यांसारख्या समस्या होऊ शकतात,” असे पटेल यांनी नमूद केले.

कच्चे अंडे खाल्यास होऊ शकते शरीरामध्ये बायोटीनची कमतरता

कच्च्या अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये एव्हिडिन (avidin) नावाचे प्रथिन असते, जे बायोटिनला (व्हिटॅमिन बी ७) घट्ट बांधून ठेवते आणि त्यामुळे शरीराद्वारे व्हिटॅमिन बी ७ शोषून घेणे कठीण होते. परिणामी जास्त प्रमाणात कच्चे अंडे खाल्ल्यास शरीरामध्ये बायोटिनची कमतरता होऊ शकते.

शिजवलेले अंडे का खावे?

“बायोटिन हे शिजवलेल्या अंड्यांमध्ये आढळणारे एक आवश्यक पोषक तत्त्व आहे. अंडे कच्चे असताना तुमच्या शरीराद्वारे शोषले जाऊ शकत नाही. कारण- त्यात एव्हिडिन असते. जेव्हा अंडी शिजवले जातात तेव्हा एव्हिडिन काढून टाकले जाते; ज्यामुळे तुमच्या शरीराला बायोटिन शोषण्यास मदत होते,” असे पटेल यांनी सांगितले.

रोज एक कच्चे अंडे खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

दररोज एक कच्चे अंडे खाल्ल्याने तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर लक्षणीय ताण येऊ शकतो कारण- त्याला साल्मोनेलासारख्या बॅक्टेरियाचा प्रभावीपणे सामना करावा लागतो.

या लोकांनी अंडी खाऊ नये

“ॲलर्जी असलेल्या लोकांनी कोणत्याही स्वरूपात अंडी खाणे टाळावे. विशिष्ट ॲलर्जीच्या चाचण्या केल्यास तुम्हाला अंड्यांपासून ॲलर्जी आहे की नाही हे ओळखण्यास मदत होईल.

काय काळजी घ्यावी?

असे धोके टाळण्यासाठी प्रक्रिया केलेली अंडी (Pasteurised eggs) वापरणे आवश्यक आहे; ज्यावर धोकादायक बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी उष्णतेद्वारे प्रक्रिया केली जाते. अनेक आरोग्य तज्ज्ञ, संभाव्य फायदे असूनही शिजविलेले अंडे खाण्याचा सल्ला देतात. कारण- ते आवश्यक पोषक घटक देताच; पण ते आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित असते. आपल्या आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.