बऱ्याच भारतीय घरांमध्ये रात्रीचे जेवण उशिरा होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. सहसा रात्री ९ किंवा ९:३० पर्यंत कुटुंबातील सर्व जण एकत्र जेवतात. अधिकाधिक संशोधनातून असे निष्कर्ष समोर आले आहेत की, सायंकाळी ६ च्या दरम्यान रात्रीचे जेवण करणे तुमच्या आरोग्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी चांगले असू शकते.
न्यूट्रिएंट्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या २०२१ च्या अभ्यासानुसार, “रात्रीचे जेवण उशिरा केल्याने उंदीर आणि मानव दोघांमध्ये शरीरातील साखर आणि इन्सुलिन हाताळण्याच्या क्षमतेला हानी पोहोचते. याशिवाय अर्ली टाईम-रिस्ट्रिक्टेड इटिंग (ETRE) नुसार, लवकर सायंकाळी लवकर जेवण करणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन जेवणादरम्यानचा कालवधी वाढतो. रक्तातील ग्लुकोज, इन्सुलिन संवेदनशीलता, रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइड्स यावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. विशेषतः जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ लोकांसाठी हे फायदेशीर ठरते.
तुम्ही ९ ऐवजी रोज ६ वाजता जेवण केल्यास तुमच्या शरीरात काय बदल होतात आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येसाठी ते का विचारात घेण्यासारखे आहेत, याबाबत बंगळुरूच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे.
हेही वाचा – मासिक पाळीदरम्यान महिलांनी उपवास करावा का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
संध्याकाळी ६ वाजता जेवण केल्यास तात्काळ शरीरात काय बदल होतो?
डॉ. श्रीनिवासन सांगतात, “तुमचे रात्रीचे जेवण रात्री ९/९:३० ऐवजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत केल्याने तुमच्या शरीरात बदल घडून येतात. संध्याकाळी तुम्हाला लगेच ऊर्जा वाढल्याचे लक्षात येईल. तुमचे शरीर झोपण्यापूर्वी जड अन्न पचण्यामध्ये व्यस्त नसते. या बदलामुळे रात्रीच्या वेळी छातीत जळजळ आणि अपचन यांसारख्या सामान्य पचनसंस्थेतील अस्वस्थतादेखील कमी होऊ शकते, कारण झोपण्यापूर्वी तुमचे पोट रिकामे होण्यासाठी जास्त वेळ मिळतो.”
शिवाय त्यांनी ‘जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझम’मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनाचा हवाला दिला जे सूचित करते की, “लवकर जेवण केल्याने रात्रीच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर होते, संभाव्यत: झोपेची गुणवत्ता आणि सकाळची सतर्कता सुधारते.”
चयापचय आणि पचन वर परिणाम
डॉ. श्रीनिवासन यांच्या मते, “सांयकाळी ६ वाजता जेवणे तुमच्या शरीराच्या नैसर्गिक झोपेचे चक्राशी (सर्केडियन लय) जुळते. झोपेचे चक्र हे चयापचयसह विविध शारीरिक प्रक्रिया नियंत्रित करणारे शरीराचे घड्याळ आहे. रात्रीचे जेवण उशिरा केल्यास झोपेच्या चक्रामध्ये व्यत्यय येतो, संभाव्यतः पचनक्रिया बिघडते आणि वजन वाढण्यास हातभार लावते.”
ते पुढे सांगतात, ‘करंट बायोलॉजी’मधील संशोधन दाखवते की, अर्ली टाईम-रिस्ट्रिक्टेड फिडिंग (eTRF) नुसार, रात्रीचे जेवण ६ वाजता केल्यास उपवासानंतर रक्तातील साखर आणि इन्सुलिन संवेदनशीलता यांसारख्या चयापचय कार्यात सुधारणा होते.”
हेही वाचा – ईशान किशनला प्रवास केल्यानंतर थकवा का जाणवतो; Travel Fatigue ची लक्षणे आणि त्यावरील उपाय काय हे जाणून घ्या
झोपेच्या पद्धती आणि एकूणच झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो
डॉ. श्रीनिवासन सांगतात, संध्याकाळी ६ वाजता जेवल्याने झोपेच्या वेळेत जास्त अंतर होते, ज्यामुळे शरीराचे तापमान आणि रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होतात; ज्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि झोपेतील अडथळा कमी होतो किंवा विश्रांतीचा कालावधी वाढल्याने तुम्हाला अधिक शांतपणे झोपण्यास मदत करू शकतो.
ते सांगतात, “इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमधील अभ्यासात असे आढळून आले की, “ज्या सहभागींनी लवकर जेवण्यास सुरुवात केली, त्यांच्या झोपेचा कालावधी आणि गुणवत्ता सुधारली आणि दुसऱ्या दिवशी ऊर्जेची पातळी वाढली. हे निष्कर्ष एक साधी पण प्रभावी झोपेची रणनीती म्हणून लवकर जेवण्याची फायदे दर्शवतात.”
हेही वाचा – “आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!” मान्सूनमध्ये ‘या’ सात पदार्थांचे सेवन करून संसर्ग टाळा
लवकर जेवण्याचे संभाव्य दीर्घकालीन आरोग्य फायदे आणि तोटे
संध्याकाळी ६ वाजता रात्रीचे जेवण सातत्याने केल्यास अनेक दीर्घकालीन आरोग्य फायदे मिळू शकतात. हे तुमच्या झोपेच्या चक्रासह जुळत असल्यामुळे वजन नियंत्रित करण्यात मदत करते.
डॉ. श्रीनिवासन पुष्टी करतात, “लवकर जेवण केल्यास चयापचय आरोग्य सुधारल्याने, जळजळ कमी झाल्याने, हार्मोन्सचे चांगले नियमन यामुळे हृदयरोग, टाइप २ मधुमेह आणि काही कर्करोग यांसारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.”
लवकर जेवण करण्याचे परिणाम प्रत्येकासाठी भिन्न असू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. काहींना सुरुवातीला संध्याकाळच्या वेळी भूक लागते किंवा काहीतरी खाण्याची इच्छा वाढू शकते. तुमच्या शरीराचे ऐकणे आणि हळूहळू लवकर जेवणे आवश्यक आहे.