Diabetes Health tips: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सुरू केलेली औषधे घेण्याचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. पण, जेव्हा आपल्याला औषधे घेतल्यावर काही दिवसांनी बरे वाटते तेव्हा आपण ते औषध घेणे बंद करतो. मात्र, आपल्याला सुरू असलेली औषधे अचानक बंद केल्यानं शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का? खास करून डायबिटीज असलेले रुग्ण डायबिटीजची औषधे जेव्हा अचानक बंद करतात, तेव्हा शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊयात. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना खार येथील हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसी, सल्लागार, मधुमेहशास्त्र, पी. डी. डॉ. मनोज चावला यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
डायबिटीज आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात डायबिटीजचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना डायबिटीज आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, भारतात सुमारे १०१ दशलक्ष लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. डायबिटीज रुग्णांना खूप काळजी घ्यावी लागते. जीवनशैलीत बदल करणे औषधांद्वारे सतत काळजी घेणे. मात्र, औषधांमध्ये हलगर्जीपणा केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डायबिटीज रुग्णांना रोजच्या रोज औषधे घेणे गरजेचे आहे, असे डॉ. मनोज चावला सांगतात.
डॉ. राजीव गुप्ता, डायरेक्टर, इंटरनल मेडिसिन, सीके बिर्ला हॉस्पिटल (आर), दिल्ली यांनी सांगितले की, मधुमेहावर कोणताही कायमस्वरूपी इलाज नाही. हे केवळ सुरुवातीला काही प्रकरणांमध्येच शक्य आहे, ते सुद्धा जीवनशैलीत
बदल, वजन कमी करणे, काळजी आणि निर्धारित औषधोपचार करून डायबिटीजसारख्या परिस्थितींमध्ये अचानक औषधोपचार थांबल्यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो आणि डायबेटिक केटोॲसिडोसिससारख्या तीव्र गुंतागूंत होण्याची शक्यता असते, जी रक्तातील ॲसिड तयार होण्याद्वारे दर्शविलेली जीवघेणी स्थिती असू शकते. त्वरित उपचार न केल्यास की कोमात जाऊ शकतोअसे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले. “औषधे बंद केल्याने अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे यांसारख्या समस्या होऊ शकतात. वजन कमी होणे, निर्जलीकरण, थकवा आणि औषधांची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता आहे, असंही डॉक्टर सांगतात.
शिवाय हृदयविकाराच्या झटक्यासारख्या तीव्र वैद्यकीय घटनांचा धोका लक्षणीय वाढतो. “या संभाव्य धोकादायक परिणामांना रोखण्यासाठी सातत्यपूर्ण उपचारासह डायबिटीजचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या औषधाच्या पद्धतीमध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच वेळेवर तपासणी करणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. चावला सांगतात.
हेही वाचा >> तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…
व्यायाम करा
व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते, यामुळे आपली चयापचय क्रियादेखील चांगली राहते. व्यायामामुळे आपल्या पेशींची इन्सुलिन संवेदनशीलतादेखील वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठीही व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. दररोज ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे.
वजन कमी
जास्त वजन हे मधुमेहाचे एक प्रमुख कारण आहे. तुमचे वजन जास्त असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासाठी आहाराचे नियोजन करू शकता. यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे वजनही कमी होईल.
© IE Online Media Services (P) Ltd