Power drink for good gut health: आपल्या आरोग्यासंबंधी माहितीसाठी अनेकदा आपण गूगलवर सर्च करतो किंवा सोशल मीडियावर अवलंबून राहतो. आजकाल सोशल मीडियावर अनेक नुसखे तसेच काही फायदेशीर हेल्थ टिप्सदेखील असतात. यात काही आहार पद्धती, स्पेशल ड्रिंक्स किंवा काही घरगुती उपाय करून अमूक आजार पळवा तमूक आजारांमधून बरे व्हा, असे सल्ले दिले जातात. परंतु, यातलं नेमकं खरं काय, खरोखरंच असे सल्ले फायदेशीर असतात का? हेच आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

एका कॉटेन्ट क्रिएटरच्या मते मेथी आणि एका विशिष्ट जातीची बडीशेप यांचे मिश्रण कोमट पाण्यात घालून आणि हळद आणि दालचिनीच्या मिश्रणात मिसळल्याने रोगप्रतिकारशक्ती आणि आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते. या पॉवर ड्रिंकच्या (Power drink for good gut health) शोधात असलेल्यांनी हा लेख नक्की वाचा.

What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
sunita williams and barry wilmore
Sunita Williams : अंतराळ स्थानकात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? NASA चं धक्कादायक उत्तर
Food to Reduce Uric Acid
युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने होईल कमी; आहारात करा ‘या’ पाच पदार्थांचा समावेश
This drink promises to cleanse your colon Natural Ways Or Home Remedies For Colon Cleansing In Marathi
पोटात साचलेल्या घाणीमुळे जडतात गंभीर आजार; पोषणतज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ पेयानं अंतर्गत अवयव ठेवा स्वच्छ
Raj Thackeray on Badlapur School Case
Raj Thackeray on Badlapur School Case : बदलापूर प्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप; पोलिसांना म्हणाले, “मुळात या घटनेत…”
Shani Gochar 2025
शनी महाराज घर सोडताच ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार, येणार अच्छे दिन? २०२५ मध्ये शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते प्रचंड श्रीमंतीची संधी

याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Indianexpress.com ने आहारतज्ज्ञ सल्लागार आणि मधुमेह प्रशिक्षक कनिक्का मल्होत्रा यांच्याबरोबर चर्चा केली आणि आपल्या नियमित आहारात हे पेय घेण्याचे आरोग्याचे फायदे आणि वारंवारता जाणून घेतली.

या घटकांचे आरोग्य फायदे काय आहेत? (Health benefits of these ingredients)

“मेथी किंवा मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे नियमितपणा वाढवते आणि चांगल्या आतड्यांतील बॅक्टेरियांना आहार देते. हे पचनसंस्थेतील जळजळदेखील शांत करू शकते,” असे कनिक्का मल्होत्रा ​​यांनी सांगितले.

“बडीशेपच्या बियांमध्ये कार्मिनेटिव्ह/अँटी स्पास्मोडिक गुणधर्म असतात, जे ब्लोटिंग आणि गॅसपासून मुक्तता देतात. हे पचनास मदत करते,” असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा… Period Delaying Pills: मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेताय? शरीरावर होऊ शकतो ‘असा’ परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा

दालचिनीमध्ये दाहकविरोधी आणि सूक्ष्मजीव विरोधी गुणधर्म असतात, जे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासदेखील याची मदत होऊ शकते, जे एकूणच चयापचय संतुलन राखते आणि अप्रत्यक्षपणे आतड्याच्या आरोग्यास समर्थन देते.

हळद हा दाहकविरोधी मसाला आहे. कर्क्युमिन (Curcumin) हे हळदीतील सक्रिय संयुग( active compound) आहे, जे दाह किंवा सूज कमी करते आणि निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोमच्या वाढीसाठी (सूक्ष्मजीव) प्रोत्साहन देऊन आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते. हे आतड्याचे आरोग्य सुधारते आणि लीकी गट सिंड्रोमचा (leaky gut syndrome) धोका कमी करते.” लीकी गट सिंड्रोम म्हणजे आतड्यांचे अस्तर (Intestinal lining) कमकुवत झाल्यामुळे बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थ रक्तप्रवाहात प्रवेश करतात.

हे पेय (Power drink for good gut health) पचन सुधारण्यास, ब्लोटिंग कमी करण्यास तसेच गॅस आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.

हे पेय तुमच्या दिनक्रमात कसे समाविष्ट कराल? (Power drink for good gut health)

मल्होत्रा ​​यांनी हे पेय सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर घ्यावे, असे म्हटले आहे. जेवणानंतर घेतल्यास पचनास मदत होते. हे पेय दिवसातून एक-दोनदा घेतल्यास बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असते.

काय सावधगिरी बाळगाल? (Some precautions to keep in mind)

“गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी हे पेय घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्त पातळ करणाऱ्या औषधांचे सेवन करणाऱ्या लोकांनीदेखील हे पेय पिणे टाळावे, कारण दालचिनी आणि रक्त पातळ करणाऱ्या औषधांची परस्पर क्रिया होऊ शकते.” हे पेय आपल्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी चर्चा जरूर करावी, असंही मल्होत्रा यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा… ‘या’ साखरेच्या वापराने शरीरातील उष्णता होईल कमी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

जरी हे पेय (Power drink for good gut health) आतड्याच्या आरोग्यासाठी चांगलं असलं, तरीही चांगल्या आतड्याच्या आरोग्यासाठी फळे, भाज्या, धान्य आणि प्रथिने समृद्ध संतुलित आहार राखणे महत्त्वाचे आहे. “तुम्हाला सतत आतड्यांसंबंधी समस्या असल्यास, मूळ कारण ओळखण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कारण समजल्यानंतर त्यावर उपचार करा,” असं कनिक्का मल्होत्रा ​​म्हणाल्या.