Three Gut Health Scams : आपले आरोग्य सुधारण्यासाठी इंटरनेटवर बरेच हॅक सांगितले जातात. त्यात खासकरून आतड्याच्या आरोग्याला अधोरेखित केले जाते. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सांगितले जाणारे बरेच हॅक पाहून आपणसुद्धा असे करून बघायचे का, असा प्रश्न एकदा तरी आपल्या मनात येतोच. तर आज सोशल मीडियाच्या डिजिटल क्रिएटर अंकिता श्रीवास्तवने आतड्याचे आरोग्य चांगले (Gut Health Scams) राहण्याच्या निमित्ताने आरोग्य प्रशिक्षक व कन्टेंट क्रिएटर यांच्याकडून न्यूट्रिशन इंडस्ट्रीत होणारे तीन लोकप्रिय ‘घोटाळे’ सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

तर, या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी (Gut Health Scams), इंडियन एक्स्प्रेसने चेन्नईच्या प्राग्मॅटिक न्यूट्रिशन येथील मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी यांच्याशी संपर्क साधला.

१. आतडे बरे करण्यासाठी प्रोबायोटिक्स घेणे (Taking Probiotics to Heal the Gut) –

प्रोबायोटिक्सचा प्रचार (promoted) आतड्याच्या आरोग्यासाठी केला जातो. पण, प्रोबायोटिक्स घेणे प्रत्येकासाठी योग्य नसते. खरं तर, प्रोबायोटिक्सचा ताण आल्याने तुमची लक्षणे बिघडू शकतात. त्यामुळे प्रोबायोटिक्स घेताना तज्ज्ञांच्या मते दोन प्रमुख घटक तुम्ही पाहिले पाहिजेत.

प्रोबायोटिकमध्ये साखर किंवा कृत्रिम स्वीटनर जोडले आहे का? यापैकी एकही गोष्ट त्यात असेल, तर त्यामुळे तुमच्या आतड्यातील मायक्रोबायोटा विस्कळित होईल.

प्रोबायोटिक ॲसिड प्रतिरोधक आहे का? जर ते आम्ल प्रतिरोधक नसेल, तर ते पोटातून जात नाही आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाही. मोठ्या आतड्यात बहुतेक सूक्ष्म जीव राहतात. त्याऐवजी प्रोबायोटिक्ससारखे ग्रीक योगर्ट किंवा केफिरसारखे पारंपरिक आंबवलेले पदार्थ खा.

२. १५ दिवसांचे डिटॉक्स किंवा क्लीन्स / गट हिलिंग प्रोटोकॉल (15 Days Detox or Cleanse/Gut healing protocol) –

या गोष्टी तुम्हाला उत्साही किंवा प्रभावी उपाय देणाऱ्या वाटू शकतात. पण, मीनू बालाजी यांनी निदर्शनास आणले की, ते मूळ कारणाकडे लक्ष देत नाहीत. १५ दिवसांचे डिटॉक्स केल्यानंतर ऊर्जेच्या बाबतीत सुधारणा वाटू शकते आणि तुम्हाला हलकेसुद्धा वाटू शकते. तरीही यामुळे तुम्हाला चक्कर येणे, कमी उत्साही किंवा तुमचे स्नायू कमी होऊ शकतात आदी समस्या जाणवू शकतात. चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला स्नायू टिकवून ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे मानवी शरीरातील अवयव जसे की यकृत, मूत्रपिंड हे डिटॉक्स करण्यासाठी सुसज्ज आहेत आणि आपल्याला निरोगी ठेवतात, असेही त्या म्हणाल्या.

३. वनस्पती-आधारित आहारामुळे आतड्याचे आरोग्य नेहमीच सुधारू शकत नाही (Plant-based diets may not always improve gut health) –

अधिक वनस्पती-आधारित पदार्थ खाणे हे आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पण, जर तुम्हाला ॲसिडिटी, अपचन किंवा पोट फुगणे यांसारख्या पचनाच्या समस्या असतील, तर जास्त प्रमाणात फायबर खाल्ल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. मीनू बालाजी यांनी निदर्शनास आणून दिले की, काही वनस्पती-आधारित पदार्थ पचायला जड असतात. त्याशिवाय, जर शाकाहारी आहार योग्यरीत्या संतुलित केला नाही, तर अनेक पौष्टिक कमतरता जाणवू शकते. म्हणून आतड्याचेआरोग्य सुधारण्यासाठी पूर्णपणे शाकाहारी राहणे प्रत्येकाला नेहमीच मदत करू शकत नाही.

Story img Loader