Yoga for Constipation: कुठल्याही आजारांची सुरुवात पोटापासून होते असे म्हटले जाते. पोट साफ नसेल तर दुसऱ्या आजारांचीही लागण होते. बद्धकोष्ठता (constipation) ही पोट आणि पचनाशी संबंधित समस्या आहे. बद्धकोष्ठतेचा जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनपद्धती, चुकीच्या जेवणाच्या सवयी, सकस आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव आदी विविध कारणांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागत असतो. बद्धकोष्ठता ही आजच्या काळातील सर्वात सामान्य आरोग्य समस्या आहे.

बद्धकोष्ठता म्हणजे आतड्यांमधील हालचालींमध्ये अडचण किंवा सामान्यांपेक्षा कमी मलत्याग होणं. जेव्हा पचनतंत्र क्षीण होतं तेव्हा बद्धकोष्ठतेची स्थिती उद्भवते. पचनात अडथळा आल्यामुळे एखादी व्यक्ती जे काही खाते ते पचवू शकत नाही. ज्या लोकांच्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते, त्यांना शक्यतो बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठतेमुळे मल जड होते आणि शौचास त्रास होतो. ताणतणाव, हार्मोनल बदल, पाठीच्या कणांमध्ये दुखापत, स्नायूंची समस्या, अपचन इत्यादी समस्येंमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास हा वाढतो.

Health Benefits Of Anjeer
Health Benefits Of Anjeer : सकाळी रिकाम्या पोटी खा अंजीर; लगेच दूर होतील ‘या’ पाच समस्या
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
what happens to the body if you brisk walk 2 kms every day
जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
This is what happens to the body when you consume expired biscuits
एक्सपायरी डेट संपल्यानंतर बिस्किटे खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा
Gurupushyamrut yog
Gurupushyamrut Yoga : गुरुपुष्यामृताचा शुभ योग साधण्यासाठी उमेदवारांची धडपड, मुहुर्तावर कोण-कोण अर्ज भरणार?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला वाव तर कोणाला होईल अचानक धनलाभ; वाचा तुमचा कसा असणार मंगळवार
fasting on Karva Chauth Read expert advice
उपवासामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते? करवा चौथचा उपवास करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Rakul Preet singh Injured due to deadlift severe back spasm and pain know actress health update and doctors review
“गेले सहा दिवस मी बेडवर…”, रकुल प्रीत सिंगला झाली गंभीर दुखापत, इन्स्टाग्रामवर VIDEO शेअर करत दिली माहिती, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

बद्धकोष्ठतेच्या समस्येला तोंड देण्यासाठी लोक विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात, पण तरीही यातून काहीच उपायोग होत नाही. पण, बद्धकोष्ठतेच्या समस्येवर योग करून मात करता येते, असे योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी सांगितले असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसनी दिलंय. पुढे दिलेली आसने करून तुम्ही बद्धकोष्ठतेसोबतच पोटात गॅस, दुखणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवू शकता, असे त्यांनी सांगितले आहे. तसंच त्यांनी कोमट पाणी पिण्याचाही सल्ला दिलाय.

‘ही’ तीन आसने करा अन् बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करा

१. ताडासन

ताडासन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. सकाळी उठल्यानंतर ताडासन करणं शरीरासाठी अधिक चांगले मानले जाते. या आसनामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला चांगला ताण मिळतो. ताडासनामुळे आपले संपूर्ण शरीर लवचिक होते.

ताडासन कसे करावे?

  • सरळ उभे राहा आणि दोन्ही पायांच्या मध्ये थोडे अंतर ठेवा.
  • दोन्ही हात आपल्या शरीराजवळ सरळ ठेवा.
  • आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वर करा आणि हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा.
  • हात सरळ ठेवा आणि ताणून घ्या.
  • श्वासोच्छवास सुरू ठेवत दोन्ही हात हळूहळू वरील बाजूस न्यावेत.
  • १० सेकंद या स्थितीमध्ये राहा आणि श्वास घेत राहा.

२. तीर्यक ताडासन

बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी तीर्यक ताडासनामुळे फायदा होऊ शकतो. बद्धकोष्ठता, कंबरेजवळ जमा झालेली चरबी आणि शरीर लवचिक बनवण्यासाठी तुम्ही तीर्यक ताडासनाचा सराव करू शकता. तसेच ज्या महिलांना त्यांचा लठ्ठपणा लवकर कमी करायचा आहे त्यांनी हे आसन दररोज तीन ते चार वेळा केल्यास शरीरातील एकूण चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.

तीर्यक ताडासन कसे करावे?

  • प्रथम दंडस्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. आता आसनाच्या प्रथम अवस्थेत वाटचाल करण्यासाठी दोन्ही पाय एकमेकांसमोर समांतर जोडून घ्या. पावले जोडलेली किंवा दोन्ही पायांत हवे तेवढे अंतर आपल्या आवश्यकतेनुसार घ्या.
  • आता पाय गुडघ्यात सरळ / दोन्ही पायांत अंतर, दोन्ही हाताची कोपरे सरळ ठेवत शरीराच्या उजव्या बाजूला पाठकणा वाकवा. हे करीत असताना शरीर पुढे अथवा मागे झुकवू नका.
  • शरीराचा गुरुत्वाकर्षणाचा बिंदू ध्यानात घेऊन तोल सांभाळा. अंतिम स्थितीत डोळे न मिटता नजर समोर ठेऊन कुठल्या तरी एका काल्पनिक वर्तुळाच्या मध्यभागी नजर स्थिर ठेवा.

३. कटी चक्रासन

कटी म्हणजे कंबर. कटी चक्रासन म्हणजे कंबरेतून शरीर फिरवणे होय. या आसनामुळे कंबरेला ताण बसून ती आणखी लवचिक बनते. या आसनामुळे तुम्ही तुमची बद्धकोष्ठता कमी करू शकता आणि पचनाच्या समस्या टाळू शकता.

कटी चक्रासन कसे करावे?

  • पाय अलग ठेवून आणि हात शरीराच्या बाजूला ठेवून तीर्यक ताडासनाच्या सुरुवातीच्या स्थितीत सुरू ठेवा.
  • श्वास घ्या आणि दोन्ही हात खांद्याच्या पातळीवर वर करा. श्वास सोडत उजव्या हाताने कमरेला प्रदक्षिणा घालून आणि डावा हात उजव्या खांद्यावर ठेवून शरीर उजवीकडे वळवा.
  • काही सेकंदांसाठी किंवा जोपर्यंत तुम्ही श्वास बाहेर टाकू शकता तोपर्यंत अंतिम स्थिती धरा.
  • तुमचे हात खाली न करता श्वास सोडा आणि डाव्या हाताने कंबरेभोवती फिरत डाव्या बाजूला फिरवा आणि उजवा हात डाव्या खांद्यावर ठेवा. काही सेकंद धरा आणि सुरुवातीच्या स्थितीत परत या.
  • हे आसन पाच ते सातवेळा करा.

योगतज्ज्ञ म्हणतात, वरील सांगितलेली तीन आसने नियमित करत राहा आणि दोन ग्लास पाणी प्या, यामुळे तुम्हाला नक्कीच बद्धकोष्ठतेवर मात करता येऊ शकते.