Diabetes And Infertility: अनियंत्रित मधुमेहामुळे जीवनशैलीत अनेक अडथळे येऊ शकतात. यातीलच एक म्हणजे पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या प्रजनन क्षमतेवर होणारा नकारात्मक परिणाम. यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी मधुमेहाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. मधुमेहामुळे स्त्री व पुरुष दोघांच्या शरीरातील हार्मोन्सच्या हालचालींमध्ये व्यत्यय येऊन शुक्राणू, एग्ज आणि भ्रूणांच्या गुणवत्तेवर सुद्धा प्रभाव पडू शकतो. मधुमेहाचा गंभीर परिणाम डीएनए संरचनेवर सुद्धा होऊ शकतो. अशा स्थितीत प्रजनन क्षमता सुदृढ ठेवण्यासाठी व गर्भधारणेतील अडथळे दूर करण्यासाठी मधुमेहावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवता येईल हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.

मधुमेहाचा स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो?

एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत, पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल्समधील सल्लागार IVF आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. आरती रापोल यांनी सांगितले की, “गर्भधारणेला धोका ठरू शकणारा मधुमेह हा प्रकार १ आणि प्रकार २ च्या स्वरूपात असतो. जर एखाद्याला टाइप १ मधुमेह असेल, तर शरीर साखरेच्या चयापचयासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही, परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते. टाईप २ मधुमेह असलेल्यांच्या शरीरात इन्सुलिन तयार होते पण शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही. साखरेच्या चयापचयासाठी अधिक इन्सुलिन आवश्यक असते. याव्यतिरिक्त, गर्भावस्थेतील मधुमेह मेल्तिस म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा असतो जो गर्भधारणेदरम्यान विकसित होतो परंतु सामान्यतः बाळंतपणानंतर दूर होतो.

loksatta kutuhal artificial intelligence for wildfire prediction
कुतूहल : वणव्यांच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
article about weakness problem in wome causes of weakness in women
स्त्री आरोग्य : बायांनो, तुम्हाला विकनेस जाणवतो?
Priyanka Chopra immunity boosting drink jugaad
Immunity boosting drink : गरम पाण्यात फक्त ‘या’ तीन गोष्टी करा मिक्स; रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रियांका चोप्राचा जुगाड; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
india s defense export in marathi
विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय?

डॉ. आरती सांगतात की, “सुरुवातीच्या टप्प्यात रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान गुंतागुंत आणि अडचणी येण्याचा धोका जास्त असतो. गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात, रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने बाळाचे वजन कमी होऊ शकते आणि अचानक अंतर्गर्भीय मृत्यू देखील होऊ शकतो. याव्यतिरिक्त, गर्भधारणेच्या कालावधीत मधुमेह असलेल्या स्त्रियांना नंतरही मधुमेह कायम राहण्याची शक्यता असते व दुसऱ्या गर्भधारणेमध्ये मधुमेह पुन्हा होण्याचा धोका जास्त असतो. परिणामी गरोदरपणाच्या उत्तरार्धात उच्च रक्तदाब होण्याचा धोका असतो.”

पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर मधुमेहाचा प्रभाव

डॉ आरती यांच्या माहितीनुसार, मधुमेहांच्या रुग्णांना मूल होण्यात अडचणी येऊ शकतात कारण मधुमेह पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर विविध स्वरूपात परिणाम करू शकतो, जसे की शुक्राणूंची संख्या व गुणवत्ता कमी होणे, ताठरता आणि वीर्यस्खलन, इत्यादी.

मधुमेह व वंध्यत्व असल्यास उपाय काय?

डॉ आरती रापोल यांनी सुचवल्याप्रमाणे, “जर तुम्हाला मधुमेहामुळे गर्भधारणेसाठी अडचणी येत असतील तर आपण इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) हा एक पर्याय विचारात घेऊ शकता. IVF तज्ज्ञ तुम्हाला योग्य उपचार योजनेद्वारे मार्गदर्शन करतील. स्त्री वंध्यत्वासाठी, इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन किंवा इंट्रायूटरिन रेसेमिनेशन निदानाच्या आधारे उपचार करता येऊ शकतात. तर इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) कमी शुक्राणूंची संख्या व संबंधित समस्यांवर उपचार ठरू शकते.

हे ही वाचा<< उशीमुळे पडू शकता आजारी, ‘हे’ त्रास वाढण्याचा असतो धोका! योग्य उशी कशी निवडावी व स्वच्छ कशी करावी? 

तर याशिवाय आपण मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा काम करायला हवे. पौष्टिक आहार, धूम्रपान सोडणे, तणावमुक्त राहणे आणि नियमित शारीरिक हालचाली करणे हे महत्त्वाचे घटक आहेत. गरज भासल्यास आपण तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा आवर्जून घ्यावा.