Tips To Measure Your Blood Pressure In Marathi : अनेकदा आजारी पडल्यावर डॉक्टर रक्तदाब (बीपी) चेक करतात. रक्तदाब (बीपी) चेक करण्यासाठी आपल्या हाताला बीपी कफ (Bp Cuff) हा बँड लावला जातो. पण, तुम्हाला माहिती आहे का हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याचे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी अचूक रक्तदाब (बीपी) मोजमाप आवश्यक आहे. कारण ब्लड प्रेशर तपासताना हाताची चुकीची किंवा अयोग्य स्थिती छोट्या घटकांवर परिणाम करू शकते (Tips To Measure Your Blood Pressure).
डॉक्टर सुधीर कुमार यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये हाताच्या नॉन-स्टँडर्ड आर्म पोझिशनमुळे (म्हणजे शरीराचा खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग) ब्लड प्रेशर रीडिंगचे प्रमाण वाढवू शकते, ज्यामुळे अनावश्यक चिंता किंवा चुकीचे उपचार सांगितले जाऊ शकतात. कारण अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, नॉन-स्टँडर्ड आर्म पोझिशन्समुळे (non-standard arm positions) बीपी रीडिंग लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. विशेषत: जेव्हा हाताला मांडीवर आधार दिला जातो तेव्हा सिस्टोलिक बीपी ३.९ मिमी एचजी आणि डायस्टोलिक बीपी ४.० मिमी एचजीने जास्त होता. मांडीवर हात ठेवल्यामुळे सिस्टोलिक बीपी ६.५ मिमी एचजी आणि डायस्टॉलिक बीपी ४.४ मिमी एचजीने जास्त झाला.
क्लिनिक असो किंवा घर दोन्हीकडे बीपी तपासताना अयोग्य किंवा चुकीच्या पद्धतीने हात ठेवणे ही एक सामान्य समस्या आहे. पण, यामुळे रक्तदाबावर (BP) परिणाम का होतो हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे(Tips To Measure Your Blood Pressure). कारण उच्च रक्तदाब हा जागतिक स्तरावर आरोग्याच्या वाढत्या चिंतेचा विषय बनला आहे.
पुढील काही शारीरिक यंत्रणा, ज्यामुळे रक्तदाब जास्त प्रमाणात वाढतो (Tips To Measure Your Blood Pressure) …
याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने आशियन रुग्णालयाच्या वरिष्ठ सल्लागार, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, डॉक्टर प्रतीक चौधरी यांच्याशी चर्चा केली… डॉक्टर म्हणतात की, “तुमच्या हाताची स्थिती, जिथे रक्तदाब तपासण्यासाठी बीपी कफ (Bp Cuff) बांधला जातो आणि तो फुगवून रक्तदाबाचे अचूक रीडिंग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जर तुमचा हात तुमच्या हृदयाच्या पातळीच्या वर असेल, जो सामान्यतः स्टर्नमच्या मध्यभागी असतो, तर तुमचा रक्तदाब नेहमीपेक्षा कमी असू शकतो. दुसरीकडे, जर तुमचा हात हृदयाच्या पातळीपेक्षा खाली असेल, तर तुमचा रक्तदाब जास्त असू शकतो.
तर या गोष्टी गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे उद्भवतात. जेव्हा तुमचा हात हृदयाच्या पातळीपेक्षा वर उचलला जातो, तेव्हा त्याचा रक्तदाब कमी रीडिंग दाखवतो आणि याउलट, जर तुमचा हात हृदयाच्या पातळीच्या खाली असेल तर रीडिंग जास्त असू शकते.
रक्तदाब तपासताना हात योग्य स्थितीत कसा ठेवावा, रक्तदाब योग्य पद्धतीने कसा तपासावा, यासाठी डॉक्टर प्रतीक चौधरी यांनी सांगितलेल्या स्टेप्स पुढीलप्रमाणे (Tips To Measure Your Blood Pressure) :
१. रक्तदाब तपासण्यापूर्वी किमान पाच मिनिटे बसून राहा.
२. रक्तदाब तपासण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी कॅफिन, चहा किंवा तंबाखू खाणे टाळा.
३. पाठीचा आधार घेऊन बसा, पाय जमिनीवर पसरवा आणि पाय क्रॉस ठेवू नका.
४. हात स्थिर ठेवा आणि बीपी कफ हृदयाच्या पातळीवर बांधा. (स्टर्नमच्या मध्यभागाशी संरेखित).
५. बीपी कफ तुमच्या हाताच्या ७५ ते १०० टक्क्यांच्या आसपास असावा.
६. रक्तदाब सामान्यतः दोन्ही हातांचा मोजला जातो आणि उच्च रीडिंग तुमचे रक्तदाब म्हणून घेतले जाते.
७. वारंवार मोजमाप घेतल्यास, त्यांच्यामध्ये किमान एक ते दोन मिनिटांचे अंतर असावे.
तसेच डॉक्टर प्रतीक चौधरी पुढे सांगतात की, बीपी कफ तुमच्या हाताभोवती व्यवस्थित बसला पाहिजे. तुम्ही कफ आणि आपल्या हातामध्ये एक किंवा दोन बोटे घालून ते घट्ट बसलं आहे की नाही हे तपासून पाहू शकता, कारण यामुळे वारंवार चुकीचे रक्तदाब मोजमाप अथवा चुकीचे निदान होऊ शकते किंवा औषधे जास्त लिहून देऊ दिली जाऊ शकतात. चुकीच्या मोजमापामुळे बीपी रीडिंग कमी असल्यास, आवश्यक उपचारांना विलंब होऊ शकतो किंवा जीवनशैलीत बदल होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून किंवा बीपी कफचे योग्य प्रशिक्षण घेतलेल्या वैद्यकीय व्यावसायिकाला भेट देऊन रुग्ण या समस्या टाळू शकतात. या सावधगिरींचे पालन केल्याने अचूक बीपी रीडिंग करण्यात मदत होईल (Tips To Measure Your Blood Pressure) .