10 Morning Habits to Boost Your Productivity: आपण दररोज सकाळची सुरुवात कशी करतो हे खूप महत्त्वाचे ठरते. कारण- त्या कृतीवर बहुतांशी आपला संपूर्ण दिवस असतो. आपला दिवस चांगला जावा, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी दिवसाची सुरुवात चांगली करणे खूप गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. कधी त्या चांगल्या असतील, तर कधी त्या वाईट. परंतु, चांगल्या सवयी लागल्यामुळे आपल्याला आपली दिनचर्या ही चांगली ठेवता येते; परंतु त्याउलट वाईट सवयींमुळे मात्र आपल्याला अनेकदा त्याचे दुष्पपरिणामच भोगावे लागतात. याचमुळे तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणे गरजेचे आहे. ‘होमिओ अमिगो’चे संस्थापक व सीईओ करण भार्गव यांनी तुमच्या सकाळच्या दिनचर्येत समाविष्ट करण्यासाठी १० सवयी सांगितले असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत जाणून घेऊ…

१. सकाळी लवकर उठा

नियमित सकाळी लवकर उठावे. लवकर उठल्यामुळे मनाला शांतता मिळते आणि संपूर्ण दिवस आनंदात जातो. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसभर काम करण्यासाठी जास्त वेळ मिळतो. लवकर उठण्याची सवय लावण्यासाठी दररोज हळूहळू झोप कमी करून १५ मिनिटे आधी उठण्याचा प्रयत्न करा.

२. पाणी प्या

उठल्यावर पाणी प्यायल्याने तुमचे शरीर पुन्हा हायड्रेट होते आणि तुमचे चयापचय सुरू होते.

३. व्यायाम करा

तुम्ही सकाळी व्यायाम करणे गरजेचे आहे. वॉक किंवा वर्कआउट किंवा योगासने केल्याने तुमचा मूड सुधारेल. त्यामुळे तुमची उर्जा पातळी वाढवेल आणि तुमच्या एकूण आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल.

४. ध्यानधारणेचा सराव करा

काही मिनिटे ध्यान केल्याने ताण कमी होतो. ध्यान आणि व्यायाम केल्याने तुमचे मन आणि शरीर दोन्ही सक्रिय राहते.

५. तुमच्या दिवसाचे नियोजन करा

ध्येये आणि कामांना प्राधान्य दिल्याने दिशा मिळते. आज तुम्हाला कोणते काम पूर्ण करायचे आहे याचा प्लॅन तयार करा आणि स्वत:साठी ध्येय निश्चित करा.

६. पौष्टिक नाश्ता करा

सकाळचा न्याहारी नेहमी आरोग्यदायी असावी. संतुलित आहार आवश्यक ऊर्जा पुरवतो आणि त्यामुळे एकाग्रतेच्या क्षमतेत सुधारणा होते.

७. स्नूझ बटण दाबू नका

अलार्म वाजल्यानंतर कित्येक जण स्नूझ बटन दाबून पुन्हा झोपतात. तसं न करता उठून व्यायाम करायला हवं.

८. स्क्रीन टाइम कमी

सकाळी उठल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा.

९. स्वतःवर प्रेम

सर्वात आधी स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या कामाबद्दल प्रेम दाखवा. त्यामुळे सकारात्मकता वाढेल.

१०. कठीण काम सर्वात आधी करा

तुमच्या कामांमध्ये सर्वांत कठीण असलेलं काम तुम्ही आधी करा. मग यामुळे बाकीची कामे तुम्हाला करायला सोपे जातील त्यामळे तुम्हाला ताण कमी जाणवेल.