डॉ. विभावरी निगळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवाजावर टकटक करून मिता आत आली. शुभेच्छा देऊन एखाद्या झुळूकेसारखी निघून पण गेली. माझ्या समोर बसलेली मनाली बघतच राहिली. कारण मिता होतीच तशी – सुडौल बांधा स्वच्छ एकसारखा नितळ चेहरा आणि प्रसन्न हसू. तिच्या प्रश्नांकित चेहऱ्याकडे पाहून मी म्हटलं, ‘तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर! सांग बरं किती वय आहे तिचं ?’ मनाली विचार करून म्हणाली, “असेल ४५ ते ५० च्या मध्ये” अगं ती ५४ वर्षाची आहे मी उत्तरले. नीट काळजी घेऊन आणि अँटीएजिंग ट्रीटमेंट (Antiageing Treatment) नियमित करून तिने स्वतःची जोपासना केली आहे. तर मंडळी ही आहे किमया नवनवीन Antiaging Care ची.

मागच्या लेखात आपण चेहरा आणि त्वचेवर होणारे वयाचे परिणाम बघितले. आता पाहूया त्यांना थोपविण्याच्या उपचार पद्धती.

ह्या उपचारांचा पाया आहे ३R

Resurface : म्हणजे बाह्य त्वचेवर तयार झालेल्या दोषाचे निराकरण.

Refill : म्हणजे ज्या रिकाम्या पोकळ्या तयार झाल्या आहेत त्या भरून काढणे.

Restore : म्हणजे आपला चेहरा पूर्वस्थितीच्या जवळपास आणणे.

याकरता विविध उपचार आहेत. प्रथम पाहू या औषधोपचार.

हेही वाचा : तीळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर का आहेत? तीळ शरीरातील फॅट्स कमी करण्यास कशी मदत करतात?

१. सनस्क्रीन आणि मॉईश्चराईझर – सनस्क्रीन, (सूर्यकिरणापासून बचाव) आणि मॉईश्चराईझर हे सर्व उपचारांमधील प्रमुख घटक आहेत. कारण सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे धोकादायक असतात. तर वयाप्रमाणे कोरडी शुष्क झालेली त्वचा तिच्यातील बारीक भेगांमुळे वातावरणातील प्रदूषणकारी कणांना त्वचेत शिरकाव करू देते. व त्वचेतील पाण्याचे पटापट बाष्पीभवन करते. सनस्क्रीन लावताना पुरेशा प्रमाणात लावावे आणि उन्हात दर 2-3 तासांनी परत लावावे.

मग ‘ड’ जीवनसत्वाचं काय?

अगदी योग्य प्रश्न –

चेहऱ्याला सनस्क्रीन लावा किंवा झाकून घ्या. आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा. सर्वात हानिकारक सूर्यप्रकाश हा ११:०० ते ३:०० हा असतो. ती वेळ टाळा. मॉईश्चराईझर किंचित ओलसर त्वचेवर लावा. ज्यायोगे ओलसरपणा टिकून राहतो.

२. अँटीऑक्सिडंट – हे पोटातून घेता येतात आणि हल्ली बाजारात विविध सिरम स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. जीवनसत्व ‘अ’, ‘ई’, ‘ब३ Niacinamide ‘क’, Glutathion, Flavinoids, Green Tea, Soya या नैसर्गिक स्वरूपात देखील आढळतात. ही गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध असतात. तर Niacinamide, Vitamin ‘C’, Glutathion हे सिरम स्वरूपात लावण्याकरता उपलब्ध असतात. यांच्या नियमित वापराने चेहऱ्याचा काळवंडेपणा, रापणे कमी होऊ लागते. चेहऱ्यावर येणाऱ्या वांग किंवा छोट्या डागांना प्रतिबंध होतो. त्याचप्रमाणे सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते. कारण ही औषधे कोलॅजनचे विघटन कमी करतात. त्याचबरोबर त्याच्या नवनिर्मितीला चालना देतात.

हेही वाचा : Heart Attack In Winter : हिवाळ्यात का वाढते हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

३. पेशीनियंत्रक औषधे – जीवनसत्व ‘अ’ किंवा Retinol आणि Peptides व Growth Factors हे बाह्यत्वचेच्या पेशींची वाढ सुनियंत्रित करतात. त्याचा बाह्य थर काढून टाकते. ही औषधे कोलॅजनचा चयापचय नियंत्रित करतात. त्याचबरोबर कोलॅजन व इलास्टीन तंतूंची उपज वाढवितात. त्यामुळे Ageing खुणा म्हणजे सुरकुत्याचे प्रमाण थोडे कमी होते. ही औषधे सिरम अथवा क्रीमच्या स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे त्वचा नितळ गुळगुळीत होते.

विविध उपचार पद्धती

१) केमिकल पिल (Chemical Peel) : ही प्रक्रिया सर्वाधिक उपयोगात आणली जाते. यात आपल्या गडद रंगछटेसाठी फक्त बाह्यत्वचेच्या वरच्या थरांवर काम केले जाते. याकरता ग्लायकोलिक (Glycolic), सॅलीसिलिक (Salicylic) टी.सी.ए (T.C.A.) अशी विविध आम्ले व Retinol हे द्रव्य वापरण्यात येते. ही प्रक्रिया दर १५ दिवसांनी नियमित केल्यानंतर काही महिन्यांनी बाह्यत्वचा नितळ होते. रंगपेशी समप्रमाणात पसरतात. त्यामुळे डाग (Blemishes) व काळवंडेपणा (Pigmentation) कमी होतात व त्वचेची लवचिकता (Flexibility) वाढते.

२) लेझर व किरणोपचार – ज्यामध्ये विविध किरणांचा वापर करून जुन्या कोलॅजनला नष्ट केले जाते. ज्यायोगे कोलॅजनची नवनिर्मिती होते. CO² लेझर, ग्लास अर्बीयम, IPL व Monopolar RF अशी ही उपकरणे असतात. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या, खड्डे, असमतल कमी होतो व लवचिकता येते. हाच परिणाम dermaroller ह्या हाताने वापरण्यात येणार्‍या उपकरणाने साधता येतो.

३) Botox – हे एक मज्जातंतूंना सैलावणारे इंजेक्शन असते. ज्यायोगे कपाळावरच्या आठ्या आणि डोळयांच्या व नाकावरच्या सुरकुत्या जातात. चेहऱ्यावरचा त्रासिक भाव कमी होतो.

४) Fillers – हे Refill चे काम करतात. ही प्रथिने बाह्य गोष्टींपासून तयार करतात. Hyluruonic Acid हे प्रमुख आहे. याची पाणी शोषून घेऊन, धरून ठेवण्याची क्षमता भरपूर असल्याने खोल सुरकुत्या ताबडतोब भरल्या जातात. चेहऱ्याला गोलाई प्राप्त होते. हेच काम स्वतःच्याच शरीरातील चरबी किंवा Fibrin हे तंतू वापरून देखील करता येते.

हेही वाचा : मिठाचा ‘हा’ उपाय डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास कसा करतो कमी? तज्ज्ञांनी सांगितली, सेवनाची योग्य पद्धत व प्रमाण

५) Threads – विविध प्रकारचे धागे अंतरत्वचेमध्ये सोडून त्वचेला खेचले जाते. त्यामुळे चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होतात. हे धागे अंतरत्वचेतील पेशींना कोलॅजन तयार करण्यासाठी उदयुक्त करतात. त्यामुळे दीर्घकाळ सुरकुत्या कमी होतात.

६) PRP (Platelate Rich Plasma) – स्वतःच्या रक्तामधल्या प्लेटलेट्स या रक्तपेशी वेगळ्या करून त्या त्वचेत Inject करतात. ह्या पेशीमध्ये अनेक Growth Factors असतात, जे अंतरत्वचेतील पेशीना कॉलेजन व इलास्टीन तयार करण्यास उद्दिपीत करतात.

या सर्व उपचारानी आपण ageing थोपवू शकतो, थोडया फार प्रमाणात पालटवू शकतो. त्याकरता हे उपचार नियमित करावे लागतात. ते बंद केल्यानंतर नैसर्गिक aging पुन्हा दृष्टोत्पत्तीस येऊ लागते. सौंदर्यशास्त्र म्हणजे फक्त उपचार नव्हेत तर Healthy Ageing ला मदत करणारे शास्त्र आहे. त्याकरता योग्य व नियमित आहार, निद्रा, व्यायाम व तणाव कमी करण्याबरोबर योग्य प्रकारे त्वचेची काळजी तरुणपणापासून घेतली तर हा बँक बॅलन्स वार्धक्यासाठी फायदेशीर ठरतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treatment for the effects of aging on the face hldc css