Benefits Of Drinking Tulsi Water: प्राचीन काळापासून एक पवित्र वनस्पती म्हणून दारी राहणाऱ्या तुळशीला (Ocimum tenuiflorum) विशेष मान आहे. तुळशीचे औषधी गुणधर्म सुद्धा अनेक आहेत, अगदी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते श्वसनाच्या समस्या सोडवण्यापर्यंत अनेक प्रश्नावर तुळशीचे सेवन हे रामबाण उपाय ठरते. विशेषतः पावसाळ्यात तर अनेकजण तुळशीच्या काढ्याला अमृतासमान मानतात. खरोखरच या तुळशीच्या पानांचे फायदे आहेत का? हे फायदे मिळवण्यासाठी तुळशीचा वापर कसा करायचा? कुणी करायचा? याविषयी आज आपण तज्ज्ञांचे मत जाणून घेणार आहोत. अलीकडे सोशल मीडियावर सुद्धा तुळशीचा चहा, तुळशीचा काढा थोडक्यात तुळशीची पाने घातलेलं पाणी पिण्याचे फायदे अनेकजण सांगत असतात, त्यातील तथ्य आज आपण पडताळून पाहूया..

तुळशीचे पाणी म्हणजे काय? कसं बनवायचं?

सल्लागार, आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह प्रशिक्षक, कनिक्का मल्होत्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, तुळशीची पाने पाण्यात टाकून पिणं म्हणजे तुळशीचं पाणी पिणं, हे इतकं साधं सोपं पेय आहे. तुम्हाला पाण्यात पाने १० ते १५ मिनिटे भिजू द्यायची आहेत. वाटल्यास तुम्ही मंद आचेवर काही वेळ हे पाणी पानांसहित उकळू शकता. जास्त वेळ उष्णतेच्या संपर्कात आणू नये अन्यथा फायदे कमी होतात. याशिवाय आपण अगोदरच उकळून घेतलेल्या पाण्यात तुळशीची ताजी पाने किंवा वाळवलेल्या तुळशीच्या पानांची पावडर करून मिसळू शकता. हे एक नैसर्गिक डिटॉक्स पेय आहे, जे तुमच्या शरीराला स्वच्छ करू शकते.

Healthy Lifestyle Tips
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घ्या ‘या’ ४ गोष्टींची काळजी; अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Why papaya is the perfect fruit in winter season as per Ayurveda papaya juice benefit in winter
हिवाळ्यात ‘पपईचा ज्यूस’ प्रत्येकानं प्यायलाच हवा; फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
water intake
पाणी कसे व किती प्यावे?
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच

अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि इतर फायदेशीर पोषकसत्व असणाऱ्या या तुळशीचे पाणी आरोग्याच्या विविध समस्यांवर रामबाण उपाय मानले जाते. याबाबत मल्होत्रा यांनी ​​पुढे सांगितले की, “जगभरात शरीरासाठी पोषण, मानसिक शांती व दीर्घायुष्य यासाठी आयुर्वेदाला नव्याने ओळख मिळत आहे.”

तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे

रोगप्रतिकारक शक्तीसाठी बूस्टर

तुळशीला ॲडप्टोजेन मानले जाते, याचा अर्थ तुळस शरीराला तणावाशी जुळवून घेण्यास आणि संतुलन राखण्यास मदत करते. तुळशीमध्ये इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म देखील असतात, याचा अर्थ ते शरीराची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया वाढवू शकते. हे गुणधर्म संक्रमण आणि आजारांपासून लढण्यास मदत करू शकतात.

तणावावर नियंत्रण

तुळशीचे पाणी शरीराला शांत करू शकते, अंतर्गत हालचालींची लय संतुलित राहते. त्यामुळे ज्यांची जीवनशैली फार तणावग्रस्त आहे त्यांनी दिवसातून एकदा हे तुळशीचे पाणी प्यायल्यास फायदा होऊ शकतो.

पचनाला मदत

तुळशीमध्ये कार्मिनेटिव गुणधर्म असतात जे गॅस आणि सूज कमी करण्यास मदत करू शकतात. काही अभ्यासांमध्ये असेही सुचवले आहे यामुळे आतड्याचे कार्य सुधारू शकते, पचनास मदत होते.

श्वसनासाठी मदत

वर्षानुवर्षे तुळशीच्या पानांचा वापर खोकला, सर्दी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी केला जात आहे. तुळशीमध्ये कफनाशक गुणधर्म असतात, कफ बाहेर टाकण्यास आणि रक्त साचून गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. तुळशीचे दाहक-विरोधी गुणधर्म घसा खवखवणे किंवा जळजळणाऱ्या श्वसननलिकेस शांत करू शकतात.

अँटिऑक्सिडंटचा पॉवरहाऊस

तुळशीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्ससारखे विविध अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानाशी लढण्यास मदत करतात, तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक अँटिऑक्सिडंट्सचा पुरवठा वाढू शकतो ज्यामुळे अनेक आजरांपासून संरक्षण मिळू शकते. याविषयी अजून सविस्तर संशोधन होण्याची गरज आहे.

तुळशीच्या पाण्याचे सेवन कोणी टाळावे?

मल्होत्रा ​​सांगतात की, “तुळशीमध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असू शकतात. तुम्हाला रक्तस्रावाचा विकार असल्यास किंवा वॉरफेरिन सारखी रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास, तुळशीचे पाणी प्यायल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सेवन करण्याआधी आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.”

हे ही वाचा<< काखेजवळील फॅट्स, दंडाखालील चरबी कमी करण्याचे सोपे व्यायाम वाचा; डॉ. मेहतांचा सल्ला वापरून स्लिव्हलेस घाला बिनधास्त

याशिवाय, गर्भारपणात किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी सुद्धा शक्यतो तुळशीच्या पाण्याचे सेवन टाळावे. यामुळे गर्भाशय आकुंचित होऊन गुंतागुंत वाढू शकते. तसेच काही व्यक्तींना तुळशीची किंवा लॅमियासी (मिंट) गटातील वनस्पतींची ऍलर्जी असू शकते. तुळशीचे पाणी प्याल्यावर जर तुम्हाला पुरळ, खाज सुटणे किंवा सूज येणे यासारख्या कोणत्याही ऍलर्जीचा त्रास होत असेल तर तुळशीचे पाणी पिणे बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.”

Story img Loader