Fatty Liver Disease Cause A Heart Attack : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम टीव्ही अभिनेता मोहसिन खान पुन्हा एका नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या चर्चेचा विषय आहे, त्याला गेल्या वर्षी आलेला हृदयविकाराचा सौम्य झटका. नुकतेच मोहसिन खान याने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला गेल्या वर्षी ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता आणि त्यामुळे त्याने टीव्ही इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFLD) आजारामुळे त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता, असे डॉक्टरांनी सांगितले.

सात दिवसांच्या कामाचे वेळापत्रक, रात्रीची अपुरी झोप व नाईट शिफ्ट अशा सर्व त्रासामुळे त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) आजाराचे निदान झाले. हल्ली तरुणांमध्येही या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतेय. त्यामागे अपुरी झोप, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, खराब आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा अशा गोष्टी कारणीभूत ठरत आहेत.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे

Read More Health News : दिवसातून एकदाच जेवण अन् मध्यरात्री ३ वाजता व्यायाम; अभिनेता शाहरुख खानचा ‘हा’ फिटनेस फंडा खरंच फायदेशीर आहे का? वाचा तज्ज्ञांचे मत

NAFLD आजार नेमका होतो कशामुळे? (Fatty liver disease may increase heart failure risk)

दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सुदीप खन्ना यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याविषयी माहिती दिली की, दिवसेंदिवस बिघडत चाललेली जीवनशैली; ज्यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराचा धोका वाढतोय. त्यासह प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, साखर असलेले पदार्थ, चरबीयुक्त आहार, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव या सर्व कारणांमुळे अनेक जण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराचे बळी ठरत आहेत.

त्याशिवाय अपुरी झोप ही एक गंभीर समस्या आहे; जी आजच्या वेगवान जगात सामान्य बनत आहे. झोपेच्या अभावामुळे शरीराच्या चयापचय प्रक्रियेत व्यत्यय येतो. त्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते. शरीरास पुरेशा झोपेची गरज असते. कारण- झोप पूर्ण न झाल्यास हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे यकृतामध्ये चरबी जमा होते. त्याशिवाय अपुरी झोप ही बाब भूक वाढवण्याशी आणि हाय कॅलरी पदार्थांच्या लालसेशी संबंधित आहे. त्यामुळे वजन वाढण्यास हातभार लागतो, असेही डॉ. सुदीप खन्ना म्हणाले.

२०२२ मध्ये जपानमध्ये प्राण्यांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, रात्री सात ते आठ तासांची झोपेची वेळ प्रत्येक एक तासाने कमी केल्यास पुरेशी झोप घेतलेल्या लोकांच्या तुलनेत यकृतामध्ये चरबी जमा होण्याचा धोका २४ टक्क्यांनी वाढतो.

NAFLD चा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

यकृतामध्ये चरबी जमा झाल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित घटकांवर परिणाम होतो. कारण- यकृत आणि हृदय हे एकमेकांशी जोडलेले आहेत. जेव्हा यकृत फॅटी असते, तेव्हा जळजळ होऊ शकते. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या जड होतात आणि रक्तप्रवाह प्रभावित होतो.

एनएएफएलडी असलेल्या रुग्णांमध्ये एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढू शकते, असे दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी डॉ. निशिथ चंद्रा यांनी सांगितले.

आहारात काय खावे आणि काय खाऊ नये?

साखरयुक्त पदार्थ, तळलेले किंवा प्रक्रिया केलेले पॅकिंग पदार्थ, ट्रान्स फॅट्स असलेले स्नॅक्स खाणे टाळावे. कारण- या पदार्थांमुळे व्हिसेरल फॅट्स व यकृतात चरबी जमा होते आणि ज्यामुळे एनएएफएलडी आजाराचा धोका वाढतो.

अशा पदार्थांऐवजी तुम्ही तृणधान्य, प्रोटीनयुक्त पदार्थ व फॅट नसलेले पदार्थ खा; जसे की, मासे, शेंगदाणे, पालेभाज्या भाज्या.

Story img Loader