Surbhi Chandna : टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना तिच्या उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहचली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या फिटनेसविषयी सांगितले आहे. ठराविक पदार्थ नाही, पण तिला चांगले जेवण करायला आवडते. सुरभीने सांगितले की, टीव्ही मालिका ‘कुबूल है’ चे शूटिंग करताना तिने जीएम (GM ) डाएट घेण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला जनरल मोटर्स आहारसुद्धा म्हणतात. सुरभीने पिंकविलाशी बोलताना सांगितले, “मला वाटते की मी कुबूल है (२०१२-१६) या दिवसांमध्ये जीएम डाएट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात एके दिवशी फळे खाणे, दुसऱ्या दिवशी भाज्या खाणे इत्यादी प्रकार असतो. ते कोण करते? मला माफ करा, पण जे लोक फॉलो करतात त्यांना हॅट्स ऑफ. मला वाटते की हे लोक खरोखर वेडे आहेत.”
त्यानंतर सुरभीने डाएटमध्ये बदल केला. ती सांगते, “तुम्ही तेच केले पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला आनंद होऊ शकतो. मला जे पदार्थ खाताना आनंद मिळतो ते मी खाते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीएम डाएटविषयी आज आपण जाणून घेऊ या.

सात दिवसांचा हा जीएम डाएट लगेच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा सांगते, “हा डाएट एफडीए (FDA) आणि युएसडीए (USDA) यांच्या मदतीने तयार केला आहे. आहारामध्ये दररोज विशिष्ट पदार्थांच्या प्रकारांचा समावेश असतो. फळे, भाज्या आणि प्रोटिन यावर लक्ष केंद्रित केल्याने शरीरातील फॅट्स आणि कर्बोदके कमी करण्यास मदत होते.

जीएम डाएटचा आरोग्यावर कसा प्रभाव पडतो?

जीएम डाएट हा कमी कॅलरीयुक्त असतो. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकाराचे सेवन केले जाते.

पहिला दिवस : फक्त फळे (केळी सोडून)
दुसरा दिवस : फक्त भाज्या (कच्च्या किंवा शिजवलेल्या)
तिसरा दिवस : फळे आणि भाज्या यांचे मिश्रण
चौथा दिवस : केळी आणि दूध
पाचवा दिवस : टोमॅटो आणि दुबळे मांस (किंवा पर्याय)
सहावा दिवस : भाज्या आणि मांस (lean meat)
सातवा दिवस : ब्राऊन राइस, फळांचा रस आणि भाज्या

या डाएटसह दररोज ८-१२ ग्लास नियमित पाणी प्यावे.

मल्होत्रा सांगतात की, ज्या लोकांनी हा डाएट घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी आठवड्याभरात आठ किलोपर्यंत वजन कमी केले आहे. प्रामुख्याने कॅलरीचे सेवन कमी केल्यामुळे आणि जास्त पाणी प्यायल्यामुळे हे शक्य आहे. त्या द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “हा डाएट खूप जास्त फळे आणि भाज्या खाण्यास प्रोत्साहन देतो, ज्यात फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात आणि विशेष म्हणजे कॅलरी कमी असतात.”
जीएम डाएटमुळे प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा साखरयुक्त पदार्थ खाणे आपण टाळतो आणि एकूण साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
खूप जास्त कॅलरी कमी झाल्यामुळे भूक लागू शकते. अनेक जण हा डाएट दीर्घकाळासाठी करू शकत नाही, असे मल्होत्रा सांगतात.

मल्होत्रा सांगतात की, जीएम डाएटमध्ये प्रोटिन्स, चांगले फॅट्स आणि व्हिटमिन्स बी १२, व्हिटॉमिन डी, लोह आणि कॅल्शियम यासारख्या आवश्यक पोषक घटकांचा अभाव आहे. जर तुम्ही हा डाएट फॉलो केला तर याची कमतरता जाणवू शकते.

या गोष्टींची काळजी घ्या

  • आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांनी किंवा ज्यांना संतुलित आहाराची आवश्यकता आहे त्यांनी हा डाएट घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा मार्गदर्शन करावे.
  • मल्होत्रा सांगतात की, याचे काही फायदे सांगितले आहेत, पण हा डाएट डिटॉक्सिफिकेशनसाठी फायदेशीर आहे, तसेच हा डाएट कॅलरीयुक्त नाही इत्यादी अनेक दाव्यांना वैज्ञानिक समर्थन नाही.
  • दीर्घकालीन वजन नियंत्रणासाठी हा तात्पुरता डाएट फायदेशीर नाही तर जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. यात नियमित शारीरिक व्यायाम आणि संतुलित आहाराचा समावेश करणे गरजेचे आहे.