Most Beneficial Types of Tea: भारतातच नव्हे तर जगभरात अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. खरं तर, काहींना चहा प्यायल्याशिवाय अंथरुणातून उठणेही कठीण जाते. वजनाच्या बाबतीत जागरुक लोकांना ग्रीन टी घ्यायला आवडते आणि दूधप्रेमी मसाला चहाला पसंती देतात. तुमचा दिवस सुरू करण्यासाठी चहा हे सर्वोत्तम पेय नाही असे लोक म्हणू शकतात, परंतु आज आपण चहाचे अनेक फायदे जाणून घेणार आहोत. हेल्थ शॉट्सशी बोलताना पोषणतज्ज्ञ प्रियंका शर्मा, क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, नोएडा यांनी चहाचे सर्वोत्तम फायदे देणारे आठ प्रकार सांगितले आहेत.

चहाचे ८ सर्वात फायदेशीर प्रकार (Most Beneficial Types of Tea)

दार्जिलिंग चहा

दार्जिलिंग चहा हा सहसा कोरा पुण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग सुधारण्यास मदत होऊ शकतो, तसेच तणाव देखील कमी होण्यास मदत होते.

How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच

ग्रीन टी

ग्रीन टीला सुपरफूड म्हटले जाते आणि ते सर्वात आरोग्यदायी पेयांपैकी एक मानले जाते. ग्रीन टीचे अनेक आरोग्य फायदे आहेत जसे की ते वजन कमी करण्यास मदत करते, हृदयाचे आरोग्य आणि रक्त प्रवाह सुधारते.

कहवा

काश्मीरचा, कहवा तुम्हाला उबदार ठेवण्यास मदत करतो. तज्ज्ञ म्हणतात की हा फक्त ग्रीन टीचा एक प्रकार आहे, परंतु त्यात केशर, वेलची, आले आणि दालचिनी सारखे निरोगी नैसर्गिक घटक देखील आहेत. हे चयापचय आणि पचन सुधारण्यास मदत करते.

निलगिरी चहा

या चहाची चव थोडी गोड असते. हे अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे आणि कोलेस्ट्रॉल आणि संपूर्ण प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करू शकते.

आसाम चहा

हा एक काळा चहा आहे ज्यामध्ये तिखट चव, तीव्र सुगंध असतो. आसाममध्ये पिकणारा हा चहा उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो, असे तज्ज्ञ म्हणतात.

ऊलोंग चहा

कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीच्या पानांपासून बनवलेला ऊलोंग चहा वजन नियंत्रणात ठेवण्यास, तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतो. निद्रानाश असलेले लोक ऊलोंग चहा पिऊ शकतात कारण यामुळे रात्री चांगली झोप येण्यास मदत होते.

लेमनग्रास चहा

एक कप लेमनग्रास चहा खूप ताजेतवाने आहे. या चहामध्ये अँटिऑक्सिडंट असतात, आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब सुधारण्यास मदत होते.

मसाला चहा

पाणी व दूध मिसळून बनवलेला हा मसाला चहा भारतात बहुतांश राज्यात प्यायला जातो. तुम्ही घरी असाल किंवा रस्त्यावरील टपरीवर हा चहाचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. त्यात मसाल्यांचे मिश्रण असते जे त्याची चव वाढवते. हा मसाला हे अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असून पाचन आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतो .

चहा नेमका कधी प्यावा? (Perfect Time To Drink Tea)

• चहामध्ये मुबलक प्रमाणात असणारे टॅनिन्स हे शरीरातील लोहाचे शोषण रोखू शकतात आणि लोहाची कमतरता निर्माण करतात.
• चहाच्या पानांमध्ये कॅफिन असते आणि जर ते जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर ते तणाव आणि चिंताग्रस्त करू शकते. मासिक पाळी दरम्यान कॅफिनमुळे त्रास वाढू शकतो.
• रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आम्लपित्त आणि मळमळ होऊ शकते.

हे ही वाचा<< दह्यात मध मिसळल्याने मिळतात अमृतासमान फायदे? वजन वाढलं असेल तर तज्ज्ञांची ‘ही’ सेवनाची पद्धत येईल कामी

दिवसातून दोनदा चहा पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. ब्रेकफास्टनंतर अर्ध्या तासाने चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ आहे. तसेच तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्सचाही एक भाग बनवू शकता. शक्यतो झोपेच्या वेळेच्या चार ते पाच तास आधी चहाचे सेवन करणे टाळावे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Story img Loader