मुसळधार पावसात पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्याने पिण्याचे पाणी दूषित होते. पिण्यायोग्य पाण्यात सांडपाणी मिसळल्यामुळे त्यात अनेक सूक्ष्म जंतू तयार होतात. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ, रस किंवा उघड्यावर विकल्या जाणाऱ्या फळांपासून दूर राहावे. घाणीवर बसणाऱ्या माश्यांमुळे खाद्यपदार्थ दूषित होतात, जे खाल्ल्याने ती व्यक्ती आजारी पडू शकते. दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. त्यावर त्वरित उपचार न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. या दिवसात विशेषत: टायफॉ़इड व हेपॅटायटिस संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावर नवी दिल्लीतील साकेतमधील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन डायरेक्टर डॉ. रोमेल टिकू यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

पावसाळ्यात फळे, भाज्या नीट स्वच्छ धुऊन घ्या आणि सुरक्षिततेसाठी त्या वाफवून घ्या. जर कुटुंबात कोणी आजारी असेल आणि लहान मुले, गर्भवती महिला वा वयस्कर व्यक्तींना त्यांच्यापासून दूर ठेवा, तसेच प्रत्येकाने पाणी उकळून प्यावे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं
youth dies due to hot milk pot fell Shocking video viral
दारूची नशा बेतली जीवावर! मद्यधुंद तरुणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन्…; वेदनादायी VIDEO
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात

टायफॉइडची लक्षणे आणि उपचारपद्धती

हा एक गंभीर संसर्गजन्य रोग आहे; जो साल्मोनेला एन्टरिका सेरोटाइप टायफी नावाच्या जीवाणू (बॅक्टेरिया)मुळे होतो. हा संसर्ग जवळपास एक ते चार आठवडे असतो. जास्त ताप, भूक न लागणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा अतिसार ही टायफॉइडची लक्षणे आहेत. ही लक्षणे ४८ ते ७२ तासांपेक्षा जास्त राहिल्यास त्या व्यक्तीची आवश्यक चाचणी करून घ्या. टायफॉइडसाठी विशिष्ट औषधे आहेत; ज्यांच्या सेवनामुळे तुम्ही १५ दिवसांत बरे होऊ शकता.

पण, टायफॉइडचे निदान वेळीच न झाल्यास आणि त्यावर योग्य औषधे न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. अशा वेळी रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. तुम्ही वेळीच चाचणी न केल्यास ताप कमी होईल; पण तो रुग्ण पूर्णपणे बरा होणार नाही. टायफॉइडमुळे यकृतावरही गंभीर परिणाम होतात.

टायफॉइडवर उपचार

टायफॉइडविरोधात आता लस उपलब्ध आहे; ज्यामुळे तुमचे किमान तीन वर्षांपर्यंत संरक्षण होते. पण, यात हातांची स्वच्छता होणे आवश्यक आहे. दुकानदाराकडून चलनी नोटांची देवाणघेवाण, वॉशरूमचा वापर याऩतर, तसेच जेवण्यापूर्वी किंवा आपल्या चेहऱ्याला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवा. तसेच पाणी पितानाही काळजी घ्या.

हेपॅटायटिस आजारापासून सावध राहा

पावसाळ्यात हेपॅटायटिसची अनेक प्रकरणे नोंदवली जात आहेत. लहान मुलांना हेपॅटायटिस एची मोठ्या प्रमाणात लागण होते. तर काही प्रौढांनाही याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. तर हेपॅटायटिस ‘ई’चा संसर्ग सर्व वयोगटांतील लोकांना होतो. हेपॅटायटिसला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंमध्ये हेपॅटायटिस अ, ब, क व ई आणि डेल्टा फॅक्टर यांचा समावेश आहे. त्यातील हेपॅटायटिस एचा संसर्ग अस्वच्छता आणि दूषित पाण्यातून काढलेले कोणतेही मासे खाल्ल्यानंतर होतो.

ताप, ओटीपोटात दुखणे, गडद लघवी, भूक न लागणे व सततची मळमळ ही हेपॅटायटिसची सामान्य लक्षणे आहेत. काही वेळा यात काविळीची सौम्य लक्षणेही दिसून येतात. यावेळी प्रथम यकृताची चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो आणि नंतर रक्त तपासणी करण्यास सांगितले जाते. या आजारात यकृताचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. हेपॅटायटिसवरही वेळीच उपचार न केल्यास रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते. त्यात काही रुग्णांच्या तोंडातून रक्तस्राव होऊ शकतो किंवा त्वचेवर काळे डाग पडतात. क्वचित प्रसंगी रुग्ण कोमात जाण्याचाही धोका असतो.

‘या’ आजारांपासून दूर राहण्यासाठी उपाय

अशावेळी रुग्णांना सहसा लो फॅट, हाय कार्बोहायड्रेट डाइट किंवा भरपूर लिक्विड आणि प्रोटीन युक्त आहार आवश्यक आहे. यावेळी रुग्णाला बरं होण्यासाठी सुमारे एक महिना लागू शकतो. परंतु तुम्हाला यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी सुमारे ३ ते ६ महिने लागू शकतो. पण बरे झाल्यानंतर रुग्णाला अल्कोहोलपासून दूर राहावे लागेल कारण तुमचे यकृत आजारामुळे आधीच कमकुवत असते.

हिपॅटायटीस अ साठी एक लस आहे परंतु हिपॅटायटीस ई साठी अद्याप लस उपलब्ध नाही. इतर प्रतिबंधात्मक उपायांमध्ये स्वच्छता राखणे, हात धुणे, योग्य स्वच्छता आणि कचऱ्याची नीट विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

कोणत्या चाचण्या कराव्यात

हिपॅटायटीस अ साठी, रक्त तपासणीमध्ये अँटी-एचएव्ही IgM नावाच्या अँटीबॉडीज आढळतात, ज्याची उच्च पातळी संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आढळते आणि सुमारे चार ते सहा महिने टिकते. हिपॅटायटीस ई मध्ये अँटीबॉडीज आणि व्हायरस प्रकार ओळखण्यासाठी रक्त आणि स्टूल चाचणी देखील समाविष्ट आहे.