Nitin Gadkari News: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची १७ नोव्हेंबरला प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे घाईगडबडीत डॉक्टरांचे पथक बोलावावे लागले. केंद्रीय मंत्री गडकरी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे एका कार्यक्रमाला पोहोचले होते. येथे त्यांनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि रक्तातील साखरेची पातळी खूपच कमी झाली. यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातून डॉक्टरांचे पथक बोलावून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अहवालानुसार नितीन गडकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

अचानक रक्तातील साखर कमी झाल्यास काय करावे?What to do when your blood sugar drops suddenly?

१) सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डायबिटीज, फोर्टिस हॉस्पिटल, दिल्लीचे अध्यक्ष डॉ. अनूप मिश्रा म्हणतात की, जर मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली आणि त्यांना तातडीने उपचार न दिल्यास त्यांचे खूप नुकसान होऊ शकते. काही प्रकरणामध्ये तर जीवही जाऊ शकतो.

Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले
Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस

२) डॉ. अनूप म्हणतात की हायपोग्लाइसेमिया किंवा कमी रक्तातील साखरेची पातळी अत्यंत घातक असू शकते आणि ते कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. जर साखरेची पातळी खूप कमी झाली तर हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

( हे ही वाचा: खराब कोलेस्ट्रॉल लघवीद्वारे सहज काढून टाकतील ‘या’ तीन भाज्या, जाणून घ्या कसे)

३) साखरेची पातळी अचानक कमी झाल्यास रुग्णाला ३ ते ५ चमचे ग्लुकोज द्यावे. २-३ चमचे मध किंवा साखर देऊ शकता. याशिवाय एक ते दोन चमचे फळांचा रसही दिला जाऊ शकतो. ५ ते ६ चॉकलेटचे तुकडे किंवा कोणताही गोड पदार्थ देखील खाऊ शकता.

४) जर १० ते १५ मिनिटांनंतरही रक्तातील साखरेची पातळी (१०० mg/dl पर्यंत) वाढत नसेल, तर लगेच जास्त ग्लुकोज आणि चॉकलेट द्यावे. या प्रकरणात रुग्णाला दुधासह ब्रेडचे दोन तुकडे दिले जाऊ शकतात.

५) जर साखरेची पातळी खूप कमी झाली असेल आणि रुग्ण बेशुद्ध झाला असेल किंवा त्याला गिळण्यास त्रास होत असेल, तर उशीर न करता ताबडतोब जवळच्या रुग्णालयात जा. अशा स्थितीत ग्लुकोज चालवण्याची गरज भासू शकते. रुग्णाला ग्लुकागनचे इंजेक्शन द्यावे.

( हे ही वाचा: Kiwi Side Effect: किडनीच्या रूग्णांवर विषासारखे परिणाम करते किवी फळं; जाणून घ्या याचे दुष्परिणाम)

६) रात्री रक्तातील साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे

डॉ. अनूप मिश्रा म्हणतात की जर मधुमेही रुग्णाला हायपोग्लायसेमिया किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याची तक्रार असेल तर त्याने त्याच्या साखरेच्या पातळीचे नियमित निरीक्षण केले पाहिजे. अशा परिस्थितीत डॉक्टर इन्सुलिन देऊ शकतात. ते म्हणतात की अनेकदा रात्री रक्तातील साखरेची पातळी कमी होते कारण जेवणातील अंतर जास्त होते. म्हणूनच जे लोक रात्रीही औषध घेतात, त्यांनी त्यांची साखरेची पातळी विशेषत: पहाटे ३ वाजता तपासली पाहिजे.

( हे ही वाचा: हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की खा, कोणताही आजार होण्याची शक्यता होईल कमी)

कमी रक्तातील साखरेची लक्षणे काय आहेत? What Are Symptoms of Low Blood Sugar?

  • घाम येणे
  • थरथरणारे हात पाय
  • धडधडणे
  • डोकेदुखी
  • अशक्त वाटणे
  • एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता

Story img Loader