मुक्ता चैतन्य

गुगल पे, फोन पे, पे टीएम फ्रॉड्स, QR कोड फ्रॉड्स अनेकांच्या बाबतीत होतात. का अडकतात यात लोक? कधी विचार केला आहे का? अचानक एक दिवस मेसेज येतो, तुम्हाला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झालं आहे. ते पैसे तुमच्या खात्यात जमा करायचे आहेत, त्यासाठी एक QR कोड किंवा लिंक पाठवत आहोत. त्यावर क्लिक करा किंवा QR कोड स्कॅन करा. की तुमच्या खात्यात दहा हजार जमा. लोकांना मोह होतो किंवा खरं वाटतं आणि फोनवर आलेल्या QR कोडला स्कॅन केलं जातं किंवा लिंकवर क्लिक केलं जातं. आता पैसे जमा होण्याऐवजी खात्यातून गायब होतात.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

कधीकधी एखादा फोन येतो. फोन करणाऱ्याला आपल्या कुठल्यातरी नातेवाईकांचे नाव किंवा आपले आणि त्यांचे नाते माहित असते. फोन करणारा गुन्हेगार आपल्याला सांगतो तुमच्या काका/मामा/ मित्र/ मामी/काकू यांनी तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायला सांगितले आहेत. आपण तुम्ही कोण बोलताय असं विचारलं की त्या नातेवाईकांचे कुणी मित्र असल्याचं सांगितलं जातं. त्या नातेवाईकांच्या नंबरला काहीतरी प्रॉब्लेम आहे, पैसे ट्रान्सफर होत नाहीयेत त्यामुळे तुमच्या नंबरवर करायला सांगितले आहे असं सांगण्यात येतं. एक QR कोड पाठवून तो स्कॅन करा म्हणजे पैसे लगेच जमा करता येतील असं सांगितलं जातं. बोलण्या बोलण्यात गोंधळून टाकतात हे गुन्हेगार. आपण आलेला QR कोड स्कॅन केला की खात्यातून पैसे गायब.

अजून एक प्रकार म्हणजे कुठलीतरी स्कीम असते, लॉटरी असते, एक QR कोड स्कॅन झाला की महागडा फोन फुकट मिळेल, एखाद्या OTTचे सबस्क्रीप्शन मोफत मिळेल असं अमिश असतं. हे खरंच आहे असं वाटून QR कोड स्कॅन केला जातो आणि खात्यातून पैसे गायब. मेलवर, व्हॉट्सअपवर किंवा साधा sms वर मेसेज येतो, अमुक तमुक संस्थेला, मुलांना, अपंगांना, कोविडमध्ये पालक गमावलेल्या मुलांना डोनेशन द्या, त्यासाठी दिलेला QR कोड स्कॅन करा. QR कोड स्कॅन केला की पैसे गायब.

QR कोड स्कॅम घडतं कसं?

जो QR कोड किंवा लिंक आलेली असते ती मुळात फेक असते. त्यामुळे एकदा का तुम्ही त्यावर क्लिक केलं किंवा QR कोड स्कॅन केला की, पैसे येण्या ऐवजी तुमच्या खात्यातून त्या गुन्हेगाराकडे पैसे जातात आणि तुमची फसगत होते.

काय लक्षात ठेवा?

तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी कुठल्याही एम पिन म्हणजे मोबाईल पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर किंवा युपीआय पिनची गरज नसते. अनोळखी नंबर वरुन आलेला QR कोड कधीही स्कॅन करायचा नाही किंवा लिंक कधीही उघडायची नाही. पैसे भरायचे आहेत असा कॉल आला आणि त्याविषयी तुम्हाला काहीही माहित नसेल तर आधी माहिती करून घ्या. संबंधित व्यक्तीला कॉल करा. त्यांनी कुणाला तुमच्या खात्यात पैसे जमा करायला सांगितले आहेत का याची माहिती घ्या. त्या व्यक्तीचे नाव नंबर मागा. ते ज्या व्यक्तीने तुम्हाला कॉल केला होता त्याच्याशी तपासून बघा. अनोळखी कॉल वर चटकन विश्वास ठेऊ नका. आपल्या अकाउंट मधून पैसे डेबिट झाले की मेसेज येतो. त्याकडे दुर्लक्ष नको.

समजा चुकून QR कोड स्कॅन झालाच आणि पैसे गेलेच तर काय?

लगेच फोनचा, नेट बँकिंगचा, जीपे, फोनपे, पेटीएमचा पासवर्ड बदला.

ताबडतोप बँकेला कळवा.

पोलीस स्टेशन गाठून सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवा. सायबर गुन्ह्याची तक्रार तुम्ही ऑनलाईनही नोंदवू शकता.

https://cybercrime.gov.in/ या सरकारच्या पोर्टलवर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.