Urfi used toilet cleaner to clean the teeth: कॉटेन्ट क्रिएटर आणि अभिनेत्री उर्फी जावेदने अलीकडेच तिच्या चेहऱ्यावर अँटीसेप्टिक लिक्विड वापरले, ज्यामुळे तिच्या चेहऱ्याची जळजळ झाली. तसेच तिने स्वत:चे दात पांढरेशुभ्र करण्यासाठी टॉयलेट क्लिनरचा वापर केला, याबाबत स्वत: उर्फीने धक्कादायक खुलासा केला आहे.

नैना भान आणि साक्षी शिवदासानी यांच्या युट्यूब चॅनेलशी बोलताना उर्फीने सांगितले की, चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी तिने एकदा झोपायच्या आधी चेहऱ्यावर अँटीसेप्टिक लिक्विड लावायचे ठरवले आणि जेव्हा ती सकाळी उठली, तेव्हा तिचा संपूर्ण चेहरा ॲलर्जीमुळे जळजळत होता.

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Worlds most expensive human tooth
जगातील सर्वात महागडा दात कोणाचा आहे माहित्येय का? एका दाताची किंमत आहे….
Women Worli agitation toilets, Mumbai,
मुंबई : वरळीतील महिलांचा शौचालयासाठी आंदोलनाचा इशारा; सागरी किनारा बांधून होतो, पण शौचालयाला मुहूर्त नाही
how to make neem kadha for glowing skin
त्वचेच्या समस्येसाठी कडुलिंबाचा काढा आहे फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
How often should you bathe your pets in winter Experts weigh in
हिवाळ्यात आपण आपल्या पाळीव प्राण्यांना किती वेळा अंघोळ घालावी? तज्ज्ञ काय सांगतात….
Man Urinates In Pants At Bryan Adams Show
“… आणि मला पँटमध्येच लघवी करावी लागली”, ब्रायन ॲडम्सच्या कॉन्सर्टमध्ये सुविधांची वानवा; प्रेक्षकानं सांगितला धक्कादायक अनुभव

“मी माझ्या अर्ध्या चेहऱ्यावर अँटीसेप्टिक लावलं होतं. मी विचार केला की, हे नक्की काम करतं की नाही याचा प्रयोग करून बघू. पण, जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा माझे डोळे खूप सुजले होते”, असं उर्फी म्हणाली. ॲलर्जीचे डाग तिच्या चेहऱ्यावर जवळजवळ १५ ते २० दिवस होते.

हेही वाचा… हॉलीवूड अभिनेत्रीचं ‘हे’ फेशियल होतंय व्हायरल! अ‍ॅंटी एजिंगसाठी खरंच ठरतंय का फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

उर्फीने हेदेखील सांगितलं की, तिने टॉयलेट क्लिनरने दात घासले आहेत. जेव्हा तिला यामागचं कारण विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, “माझे दात खरोखर खूप पिवळे होते आणि मी पाहिलं की टॉयलेट क्लिनर इतकं पांढरंशुभ्र आणि स्वच्छ टॉयलेट करू शकतं. मग मी ही म्हटलं की, एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि मी त्याचा वापर केला आणि मला पश्चाताप झाला.”

उर्फीच्या या कबुलीवरून हे लक्षात आले की, काही जण स्कीन आणि दातांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेकदा अत्यंत असुरक्षित गोष्टी आजमावून पाहतात. डॉ. दीक्षित कॉस्मेटोलॉजी सेंटरच्या सल्लागार डरमॅटॉलोजिस्ट डॉ. श्वेता श्रीधर सांगतात, “त्वचेवर किंवा दातांवर घरगुती साफसफाईचे प्रोडक्ट्स वापरणे अत्यंत धोकादायक आहे आणि त्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते. ही प्रोडक्ट्स मानवी शरीरावर वापरण्यासाठी नसून पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी आणि निर्जंतूक करण्यासाठी तयार केली जातात.”

ही प्रोडक्ट्स हानिकारक का आहेत?

डॉ. श्रीधर यांनी स्पष्ट केले की, “उर्फीने नमूद केलेल्या या विशिष्ट अँटीसेप्टिक लिक्विडमध्ये क्लोरोक्सीलेनॉल (chloroxylenol) आहे, जे जीवाणू आणि बुरशीविरुद्ध प्रभावी असे एक संयुग (compound) आहे. तथापि, ते त्याच्या या फॉर्ममध्ये असताना त्वचेवर थेट अप्लाय करण्यासाठी डिझाइन केलेले नाही. चेहऱ्यावर किंवा त्वचेच्या कोणत्याही संवेदनशील भागावर त्याचा वापर केल्याने केमिकल जळजळ, ॲलर्जी, लालसरपणा आणि फोड येऊ शकतात, तसेच त्वचा सोललीदेखील जाऊ शकते.

विशेषतः चेहऱ्यावरील त्वचा नाजूक असते, हे अँटीसेप्टिक सतत चेहऱ्याला लावत राहिल्याने त्वचेच्या नैसर्गिकपणावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अति-कोरडेपणा, क्रॅकिंग आणि इन्फेक्शन होऊ शकते. “काही लोकांना लालसर त्वचा, खाज सुटलेली आणि सूज आलेली त्वचा यांसारख्या ॲलर्जिक रिॲक्शन्सचा अनुभव येऊ शकतो.”

हेही वाचा… अनुष्का-विराट लवकर जेवण करतात अन् लवकर झोपतात; जाणून घ्या त्यांचं स्लीप रुटीन अन् त्याचे फायदे

टॉयलेट क्लीनरमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडसारखी घातक रासायनं असतात, जी शौचालयातील डाग आणि न निघणारी घाण काढून टाकण्यासाठी डिझाइन केलेली असतात. दातांवर अशी घातक रसायनं वापरणं अत्यंत चुकीचं आहे, असा इशारा डॉक्टरांनी दिला. “या रसायनांमुळे हिरड्या, जीभ आणि तोंडातील इतर मऊ टिश्यूजना रिॲक्शन होऊन लगेच केमिकल रिॲक्शन होऊ शकते.”

डॉ. श्रीधर नमूद करतात, “अगदी कमी प्रमाणातदेखील अशा प्रोडक्ट्सचे सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (gastrointestinal) डॅमेज, विषबाधा आणि पचनसंस्थेला संभाव्य दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. आम्लयुक्त पदार्थ आणि पेयांमुळे दातांवर असलेला मुलामा (संरक्षणात्मक कवच) पूर्णपणे नष्ट होऊ शकतो, ज्यामुळे अतिसंवेदनशीलता, वेदना आणि दात पडू शकतात. शिवाय या रासायनिक (टॉयलेट क्लिनर) पदार्थांच्या संपर्कात आल्याने तुमच्या अन्ननलिका आणि पोटाच्या अस्तरांनादेखील गंभीर नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही साखरयुक्त आणि आम्लयुक्त पदार्थ/पेयांचा वापर मर्यादित करा, चांगल्या पद्धतीने तोंडाची स्वच्छता राखा आणि तुमच्या दंतवैद्याचा सल्ला घ्या.”

मुरूमं होण्याच्या किंवा दात पिवळे होण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षित पर्याय

मुरूमांसाठी डॉ. श्रीधर यांनी बेंझॉयल पेरोक्साईड, सॅलिसिलिक ॲसिड किंवा रेटिनॉइड्स असलेले टॉपिकल ट्रीटमेंट्स सुचवले आहेत, जे डरमॅटॉलोजिस्ट टेस्टेड आहेत. “बेंझॉयल पेरोक्साईड मुरूमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियांना मारण्यास मदत करते, तर सॅलिसिलिक ॲसिड स्कीन एक्सफोलिएट करण्यास आणि क्लॉग्ड पोअर्स साफ करण्यास मदत करते. व्हिटॅमिन ए पासून मिळणारे रेटिनॉइड्स पोअर्स क्लॉग्ड होण्यापासून रोखू शकतात आणि जळजळ कमी करू शकतात.”

“विशेषत: ॲक्ने-प्रोन स्कीनसाठी डिझाइन केलेले सौम्य, नॉन-कॉमेडोजेनिक क्लीन्सर वापरा. त्वचेला त्रास होईल अशाप्रकारचे स्क्रब करणे टाळा,” असंही त्या पुढे म्हणाल्या.

हेही वाचा… तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

मुरूमांचा जर जास्तच त्रास असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले आहे. ते तुम्हाला आवश्यक ती ट्रीटमेंट, औषधे किंवा केमिकल पील आणि लेजर ट्रीटमेंटसारख्या ॲडव्हॉन्स थेरिपी लिहून देऊ शकतात.

दात पिवळे पडल्यास, “हायड्रोजन पेरोक्साईडसारखे केमिकल घटक असलेल्या व्हाईटनिंग टूथपेस्टचा वापर करा, जे तुमच्या दातावरील पिवळटपणा गायब करतील”, असं डॉ. श्रीधर म्हणतात. “व्हाईटनिंग माऊथवॉशचादेखील वापर केल्यास तुम्हाला फरक जाणवू शकतो.”

दात पांढरेशुभ्र करण्यासाठी ईन-ऑफिस टीथ व्हाईटनिंगसारखे प्रोफेशनल ट्रीटमेंट्स घेऊ शकता किंवा डेंटल व्हीनियर्सचा वापर करू शकता. दंतचिकित्सक ब्लीचिंग एजंट्सचे नियंत्रित प्रमाण वापरतात, जे कोणत्याही घरगुती क्लिनरपेक्षा खूप सुरक्षित असतात.

डॉ. श्रीधर पुढे म्हणतात, “बेकिंग सोडा पाण्यात मिसळून किंवा चारकोल टूथपेस्ट वापरून नियमित दात घासल्याने दातांवरील डाग कमी होण्यास मदत होते.”

Story img Loader