Uric Acid: डॉ. अमरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते, शरीरातील युरिक ऍसिड हे मुख्यतः किडनीच्या मार्फत फिल्टर होऊन मलमूत्रातून बाहेर पडते पण जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ऍसिड वाढीस लागते. हेच युरिक ऍसिड छोट्या खड्यांसारखे शरीरात जमा होते. युरिक ऍसिडचा मारा शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करतो. मुख्यतः किडनी निकामी करण्यातही युरिक ऍसिड हे कारण ठरू शकते. जेव्हा शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू लागते तेव्हा आपले शरीरच काही खास संकेत देण्यात सुरुवात करते. युरिक ऍसिड वाढल्याचे किंवा किडनी निकामी होत असल्याची पहिली लक्षणे पायात दिसून येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किडनी निकामी होण्याआधी दिसतात ‘ही’ लक्षणे

शरीरात युरिक ऍसिड वाढल्याने सांधे दुखीचा त्रास सुरु होतो, विशेषतः उठताना बसताना या व्यक्तींना सतत आधार घ्यावा लागतो व तरीही वेदना कमी होत नाहीत. बोटांना सूज येणे, गाठ झाल्याचे वाटणे, हातापायाच्या बोटांमध्ये सतत काहीतरी टोचतंय असं वाटणे ही सर्व युरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे आहेत. तुम्हालाही सतत थकवा जाणवत असल्यास युरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे हे मुख्य कारण असू शकते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार आंबट पदार्थांचे तसेहच प्युरीन युक्त पदार्थांचे अधिक सेवन केल्यास युरिक ऍसिडचा त्रास वाढतो. युरिक ऍसिडवर आता आपण काही सोपे घरगुती उपाय सुद्धा जाणून घेऊयात..

ऍपल व्हिनेगर

मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार ऍपल व्हिनेगरच्या मदतीने यूरिक एसिड नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रोज एक चमचा ऍपल व्हिनेगरचे सेवन केल्यास पचनक्रिया सुद्धा सुधारण्यास मदत होते. हे व्हिनेगर किंचित उग्र असू शकते म्हणूनच आपण एक ग्लास पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिक्स करून प्यावे.

ओवा

आयुर्वेदाच्या माहितीनुसार ओवा खाल्ल्याने युरिक ऍसिड अगदी वेगाने कमी होण्यास मदत होते. तसेच जर आपल्याला वारंवार पायाला सूज येणे व वेदना होणे असे त्रास जाणवत असतील तरी ओव्याची मदत होऊ शकते. ओव्याचे सेवन पोटाच्या समस्या सुद्धा दूर करतात.

भरपूर पाणी प्या

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, युरिक ऍसिड कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाण्याने युरिक ऍसिड डायल्युट होण्यास मदत होते यामुळे शरीरातील टॉक्सिन्स शरीरातून निघून जाण्यास मदत होते.

हे ही वाचा<< थायरॉईडची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा; हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी धण्याचे पाणी कसे प्यावे पाहा

ऑलिव्ह ऑइल

हेल्थ लाइनच्या माहितीनुसार, ऑलिव्ह ऑइल युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. ऑलिव्ह ऑइल हे व्हिटॅमिन ईचा साठा मानले जाते. यामुळे युरिक ऍसिड नियंत्रणात राहण्यास मदत होते. युरिक ऍसिडचा त्रास असल्यास जेवण ऑलिव्ह ऑइल वापरून बनवणे फायद्याचे ठरू शकते.

झोप पूर्ण करा

युरिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या जीवनशैलीतील बदल आवश्यक आहेत. कमी झोप ऍसिडिटीचे प्रमाण वाढवू शकते. यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स पसरू लागतात. यामुळेच निदान ७ ते ८ तासाची झोप शरीराला द्या.

हे ही वाचा<< मनुक्याचे पाणी ‘या’ ५ आजारात करते अमृतासारखे काम; कधी व कसे सेवन करणे ठरेल फायदेशीर?

दरम्यान, युरिक ऍसिडचा त्रास आपल्याला होत असल्यास किंवा वरीलपैकी कोणतेही लक्षण जाणवत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uric acid cause kidney failure these symptoms can be seen in legs know 5 remedies by ayurveda expert svs