Uric Acid Food: युरिक ॲसिड हे एक टॉक्सिन आहे जे अन्न पचल्यानंतर शरीरात तयार होते. ही विषारी द्रव्ये लघवीतून फिल्टर करण्याचे काम किडनी करतात, पण जेव्हा हे विष वाढते तेव्हा ते सांध्यांमध्ये जमा होऊ लागते, जे किडनी काढू शकत नाहीत. यामुळे तुमच्या सांध्यांमध्ये वेदना होतात. वेदना होणे ठीक आहे परंतु जेव्हा पीडित व्यक्तीला बसणे किंवा उभे राहण्यास त्रास होतो तेव्हा परिस्थिती बिघडते. शरीरात यूरिक ॲसिड वाढल्यामुळे सांधेदुखी, सूजची समस्या खूप वाढते.

प्युरीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील युरिक ॲसिड वाढते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या गोष्टींचे सेवन करणे बंद केले तर तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला युरिक अॅसिडची समस्याही होणार नाही.

Roasted chana with kishmish benefits
उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
poha rate increase, poha , poha rate, poha pune,
पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ
what post dinner sugar cravings are doing to your sleep metabolism and health
रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय ठरतेय धोकादायक! झोपेसह आरोग्यावर होतायत ‘हे’ गंभीर परिणाम, वाचा….
Eating Fruit at Night
Eating Fruit at Night: रात्रीच्या वेळी फळ खाल्ले पाहिजे का? जाणून घ्या फळ आणि ज्यूस घेण्याची योग्य वेळ
What is the best way to eat amla
आवळा खाण्याचा उत्तम मार्ग कोणता? ‘ही’ जुगाड वापरून पाहा, गायब होईल सर्व तुरटपणा, मिळतील दुप्पट फायदे
Nashik grape, grape cracking, Nashik cold,
थंडीच्या कडाक्याने द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची भीती, नाशिकमध्ये सहा वर्षांत डिसेंबरमधील सर्वात कमी तापमान

डाळींचे सेवन

जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असेल तर रात्रीच्या वेळी डाळ खाणे बंद करावे. डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीरात ऊर्जा वाढते. ज्या लोकांना युरिक ॲसिडची समस्या आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात कधीही डाळींचा समावेश करू नये.

जेवल्यानंतर खाणे टाळा

अनेकांना जेवल्यानंतर काहीतरी खाण्याची सवय असते. जर तुम्हालाही ही सवय असेल तर तुम्ही ती बदलावी. जास्त खाल्ल्याने मधुमेह, रक्तदाब आणि थायरॉईडसारख्या समस्यांचा धोका वाढतो. जास्त खाल्ल्याने संधिरोगाचा त्रास वाढतो आणि नंतर सांधे दुखू लागतात. यासाठी प्रत्येकाने कमी खावे.

( हे ही वाचा; किडनी निकामी होण्यास कारण ठरेल रक्तातील खराब युरिक ॲसिड; ‘या’ ५ उपायांनी वेळीच करा कंट्रोल)

मांस आणि मटण खाणे टाळा

जास्त युरिक ॲसिड असलेल्यांनी रात्री मटण खाणे टाळावे. रेड मीट, ऑर्गन मीट, बारीक केलेले मांस आणि सी फूड यासारख्या गोष्टी रात्री खाल्ल्याने शरीरात युरिक ॲसिड होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुम्हीही रात्री अशा प्रकारचे अन्न खात असाल तर ते बंद करा.

दारू पिणे टाळा

यूरिक ॲसिडची समस्या असलेल्या लोकांनी कधीही दारू पिऊ नये. विशेषतः रात्रीच्या वेळी दारूला स्पर्श करू नये. रात्री दारू प्यायल्यास हा त्रास आणखी वाढतो आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Story img Loader