यूरिक ॲसिड हे शरीरात तयार होणारे एक प्रकारचे विष आहे, जे आपल्या सर्वांच्या शरीरात तयार होते, जे किडनीद्वारे फिल्टर केले जाते आणि लघवीद्वारे शरीरातून सहज काढले जाते. यूरिक ॲसिड तयार होणे ही समस्या नाही, परंतु ते शरीरातून बाहेर न पडणे ही समस्या वाढवू शकते. आहारात प्युरीनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढू लागते. जेव्हा किडनी शरीरातून यूरिक ॲसिड काढू शकत नाही, तेव्हा ते सांध्यामध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते, ज्यामुळे हायपरयुरिसेमिया नावाची स्थिती निर्माण होते, ज्यामुळे संधिरोग होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा शरीरात यूरिक ॲसिड जमा होऊ लागते तेव्हा त्यामुळे सांधेदुखी आणि सूज येते. बर्‍याच संशोधनांमध्ये हे उघड झाले आहे की उच्च यूरिक ॲसिड देखील टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फॅटी लिव्हरशी संबंधित आहे. उपचार न केल्यास, यूरिक ॲसिड हाडे, सांधे आणि ऊतींचे नुकसान करू शकते.

जर यूरिक ॲसिडची पातळी ७.० mg/dL पर्यंत पोहोचली तर काही भाज्या टाळणे आवश्यक आहे. मायोक्लिनिकच्या अहवालानुसार, हिवाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात असतात, अशा स्थितीत युरिक ॲसिडच्या रुग्णांनी विचार करूनच भाज्यांचे सेवन करावे. चला जाणून घेऊया हिवाळ्यात कोणत्या भाज्या युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने वाढवू शकतात.

( हे ही वाचा: कांद्याच्या रसाने खरोखरचं केस गळणे थांबतात का? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच)

युरिक ॲसिड जास्त असल्यास कोबी खाणे टाळा

कोबी आणि फुलकोबी अशा भाज्या आहेत ज्या बहुतेक लोक हिवाळ्यात खातात. कोबीच्या सेवनाने यूरिक ॲसिडच्या रुग्णांवर विषाप्रमाणे परिणाम होतो. प्युरीन युक्त कोबी खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढते आणि सांधेदुखीच्या तक्रारीही जास्त होतात. जर तुम्ही युरिक ॲसिडच्या समस्येने त्रस्त असाल तर कोबी खाणे बंद करा.

हिवाळ्यात मशरूम खाणे टाळा

हिवाळ्यात घसरलेल्या तापमानामुळे हाडे आणि सांधे दुखतात. हिवाळ्यात आहाराची काळजी न घेतल्यास युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखी आणि किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. युरिक ॲसिडच्या रुग्णांनी हिवाळ्यात मशरूम खाणे टाळावे.

हिवाळ्यात मटार खाणे टाळा

हिवाळ्यात मटार ही सर्वात आवडती भाजी आहे, जी सर्वांना खायला आवडते. हिवाळ्यात मटार खाल्ल्याने युरिक ॲसिडच्या रुग्णांची समस्या वाढू शकते. प्रथिनेयुक्त मटार खाल्ल्याने युरिक ॲसिड झपाट्याने वाढते.

( हे ही वाचा: आतड्यांना खराब करू शकतात ‘हे’ १० पदार्थ; आजपासूनच खाणे टाळा!)

पालक खाणे टाळा

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, महिलांमध्ये यूरिक ऍसिडची सामान्य पातळी १.६ ते ६.० mg/dL असते, तर पुरुषांमध्ये २.४ ते ७.० mg/dL असते. जेव्हा यूरिक ऍसिडची पातळी ७.० mg/dL पेक्षा जास्त असते तेव्हा ते खूप धोकादायक असू शकते.

अशा परिस्थितीत पालकाचे सेवन केल्यास समस्या वाढू शकते. पालकामध्ये भरपूर प्रोटीन असते, ज्याचे सेवन केल्याने यूरिक ॲसिड वाढू लागते. तुम्हालाही पायाची बोटं, गुडघ्यांसह सांध्यांमध्ये तीव्र वेदना आणि सूज येत असेल तर चुकूनही या भाजीचं सेवन करू नका.