पुण्यातली घटना. बारावीत शिकणाऱ्या मुलीला फोनचा अतिवापर करते म्हणून वडील रागावले आणि तिने आत्महत्या केली. मुंबईत १५ वर्षांच्या मुलीचं फोनवरुन घरच्यांशी भांडण झालं. आणि तिने आत्महत्या केली. ही मुलगी नैराश्याशी झुंजत होती. मुंबईतच १५ वर्षांच्या मुलाचा स्मार्टफोन त्याच्या बाबांनी काढून घेतला या कारणाने त्या मुलाने आत्महत्या केली. गुजरातमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नववी आणि १२वीच्या मुलींकडून त्यांचे फोन काढून घेतल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

सोळा वर्षांच्या गेमिंगचं व्यसन असलेल्या मुलाकडून गेम्स काढून घेतल्यावर त्याने आत्महत्या केली. एका पबजीच्या व्यसनात अडकलेल्या १५ वर्षांच्या मुलानेही असंच स्वतःला संपवून घेतलं आहे. या सगळ्या घटना २०२३ च्या आहेत. वर्ष संपायला आलं आहे. या वर्षभरात स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया या सगळ्याच्या अतिवापरातून झालेल्या वादावादीमुळे टिनेजर्सनी आत्महत्या केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडलेल्या आहेत. हे प्रमाण कदाचित २०२४ मध्ये अजून वाढेल जर आपण वेळीच काही पावलं उचलली नाहीत. विविध स्तरांवरुन मोबाईलचे व्यसन आणि त्याच्या अवलंबत्वाविषयी बोलणं आणि जागृती करणं आवश्यक होऊन बसलं आहे. कारण हे डिजिटल ड्रॅग सहज आपल्या मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि त्यांच्या जीवावर उठतंय.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
Australia bans social media for children under 16
ऑस्ट्रेलियाचं स्वागतार्ह पाऊल…

हेही वाचा – यकृत, मेंदू अन् डोळ्यांसाठी फायदेशीर ‘ही’ भाजी तुम्ही खाल्ली आहे का? फायदे वाचा, न खाणारेही आवडीने खातील

मुलांमध्ये आणि टिनेजर्समध्ये मोठ्या प्रमाणावर इंटरनेट आणि मोबाईलचं व्यसन दिसतंय ही कोरोनाची देणगी आहे. २ वर्ष मुलं घरात कोंडली गेली होती. शाळांपासून सगळ्या गोष्टी ऑनलाईन सुरु होत्या. ज्या मुलांच्या हातात फोन नव्हते त्यांच्याही हातात फोन आणि इंटरनेट आलं. अगदी लहान मुलंही स्क्रीन समोर बसली. या सगळ्यातून दोन वर्षांत त्यांच्यात आणि इंटरनेटच्या जगात, त्या ब्लॅक स्क्रीनमध्ये एक नातं तयार झालं. एक बॉण्ड तयार झाला आहे. आणि त्यांना प्रत्यक्ष जगापेक्षा अनेकदा आभासी जग सहज आणि आपलंसं वाटतं. पालक काळजीपोटी जेव्हा त्यांच्या हातातून फोन काढून घेतात तेव्हा ते फक्त एक यंत्र काढून घेत नाहीत तर त्यांचं जग हिसकावून घेतात असं त्यांना वाटतं आणि मुलांच्या/टिनेजर्सच्या प्रतिक्रिया बदलतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण मुलांना फोन दिले आहेत पण त्याविषयी बोलण्याची तसदी आपण घेतलेली नाही.

स्मार्टफोनवरुन आत्महत्या होणं हे समाज म्हणून आपण अतिशय कठीण काळातून जातो आहोत याचंच लक्षण आहे. मुलांच्या जगण्याशी आपला काहीही कनेक्ट उरलेला नाहीये. सायबर पेरेंटिंग हा विषय आपण समजून घ्यायला कमी पडतोय. स्मार्टफोनच्या आहारी का जायचं नाहीये हे मुलांना समजावून देण्यात आपण कमी पडतोय. महागडे फोन घेऊन दिले किंवा त्यांना जे काही हवं ते तत्काळ घेऊन दिलं म्हणजे आपण उत्तम पालक झालो हा समज आहे तो बदलायला हवा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभर प्रत्येक ७ मुलांपैकी एक मूल आज कुठल्या ना कुठल्या मानसिक प्रश्नाशी झुंजत आहे. त्यात सोशल मीडिया, गेमिंग, पॉर्न हे सगळे विषय आणि इंटरनेटचं व्यसन भर घालतंय. या सगळ्यावर वेळीच पावले उचलणं गरजेचं आहे.

हेही वाचा – Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी कोणता आहार योग्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

पालक/शिक्षक म्हणून तुम्ही काय करू शकता?

१) फोन विषयी सातत्याने संवाद हवा. इथे ‘संवाद’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे. पालक दिवसरात्र मोबाईलमध्ये अडकलेले आणि मुलांनी वापरला तर त्यांच्यावर आरडाओरडा, हा संवाद नाही.

२) स्वतःही फोनचा वापर कमी करा, मुलांचा आपोआप कमी होईल.

३) अतिमोबाईल वापराचे दुष्परिणाम सांगा. पुन्हा पुन्हा सांगा. हे सांगत असताना आरडाओरडा करु नका. शांतपणे, समजावून द्या. ओरडल्याने प्रश्न सुटत नाहीत, मुलांना तुम्ही काय सांगू बघताय ते समजणार नाही. ते फक्त इतकंच घेऊन बसतील की आईबाबा किंवा शिक्षक रागावले.

४) घरात, शाळा कॉलेजमध्ये मोबाईल वापरासंदर्भात नियम करा. ते सगळ्यांनी पाळा. उदा. शाळा, कॉलेजमध्ये शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी कुणीच वर्ग/तास चालू असताना मोबाईल वापरायचा नाही. घरात जेवताना कुणीच मोबाईल वापरायचा नाही.

५) आपलं मूल कुठल्या अडचणीत नाहीये ना, ते निराश नाहीये ना, ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्याला कुणी त्रास देत नाहीये ना याकडे लक्ष हवं. ते संवादातूनच होऊ शकतं. अनेकदा मोबाईल हे निमित्त होतं, आत्महत्येमागे इतर कुठली तरी कारणे असू शकतात ज्यामुळे मूल निराश आहे.

६) मुलांचे वर्तन बदलले आहे असं वाटत असेल तर त्यांच्याशी बोला. शांतपणे बोला. समजून घ्या. आपलीच मुलं आहेत, प्रेमाने वागा. गरज भासली तर समुपदेशकांची मदत घ्या.

७) त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुणी छळत असेल, रॅगिंग करत असेल तर लगेच पोलिसांची मदत घ्या. शाळा कॉलेजमधल्या प्रमुखांच्या कानावर घाला. मुलं एकटीच त्रास सहन करत राहिली तर ती सहज नैराश्यात अडकू शकतात.

Story img Loader