Socks To Reduce Fever: बऱ्याचदा जास्त ताप आल्यावर ताप कमी व्हावा यासाठी डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जातात. हा उपाय जवळपास जगभरातील अनेक घरांमध्ये केला जातो. पण, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लहान मुलांचा आणि प्रौढांचा ताप कमी करण्यासाठी चक्क ‘ओल्या सॉक्सचा’ वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

एका सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटरच्या मते, मुलांना थंड, ओले मोजे घालायला लावावे आणि नंतर त्यांना कोरडे, लोकरीचे मोजे घालावे, यामुळे ताप कमी होण्यास मदत होऊ शकते. “थंड मोजे घातल्याने रक्ताभिसरणाला चालना मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तुमचे शरीर थंड मोजे गरम करण्यासाठी कार्य करत असल्याने ते रक्तप्रवाहास प्रोत्साहन देते आणि नैसर्गिकरित्या ताप कमी करण्यास मदत होते,” असे पोस्टवर लिहिण्यात आले आहे.

Shocking viral video of a person broke his neck during a massage at a salon watch video
PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

या पोस्टनुसार पायात ओले सॉक्स घालण्याचे उपाय

१. सुरक्षितपणे आणि नैसर्गिकरित्या ताप कमी होतो.
२. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
३. रक्ताभिसरण वाढते.
४. आजारपणात चांगली झोप येण्यास मदत होते.
५. औषधांची गरज भासत नाही.

या युजरने वैज्ञानिक आधारावर सांगितल्याप्रमाणे हा अभ्यास दर्शवितो की, “हायड्रोथेरपी रक्त प्रवाह सुधारून आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित करून ताप प्रभावीपणे नियंत्रित करू शकतो. ही निसर्गोपचाराच्या तत्त्वांमध्ये रुजलेली एक पद्धत आहे, जी शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेस समर्थन देते.”

त्यांनी त्यात नमूद केले आहे की, तापाच्या औषधांप्रमाणे हा उपाय नैसर्गिक आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. “हे आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनदेखील प्रोत्साहित करते.”

आणखी काही टिप्स

या कंटेंट क्रिएटरने पुढे आणखी काही टिप्स दिल्या आहेत, ज्यात लिंबू आणि आल्यासह हर्बल-टीसारख्या इतर काही गोष्टींसह एकत्र करण्याचे सुचवले आणि जर मुलाचे वय एक वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यात मध घालता येईल.

हेही वाचा: तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..

सोशल मीडियावरील ही संपूर्ण माहिती पाहून आम्ही याची खात्री करून घेण्यासाठी डॉ. हरिचरण जी, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन, एचओडी इंटरनल मेडिसिन, ग्लेनेगल हॉस्पिटल्स, लकडी का पूल, हैदराबाद यांच्याशी संपर्क केला. “’ओले सॉक्स वारण्याची पद्धत’ हा एक घरगुती उपाय आहे, जो काही लोक ताप कमी करण्यासाठी वापरतात. या पद्धतीमध्ये पातळ कापसाचे मोजे थंड पाण्यात भिजवून ते पिळून घेतले जातात आणि नंतर पायात घातले जातात. या ओल्या सॉक्सवर कोरड्या लोकरीच्या सॉक्सची जोडी ठेवली जाते. समर्थकांचा असा दावा आहे की, हे उपचार ताप कमी करण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेस उत्तेजन देऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करू शकते. परंतु, वैद्यकीय दृष्टिकोनातून ताप कमी करण्यासाठी ओल्या सॉक्सच्या उपचारांच्या परिणामकारकतेचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत,” असे डॉ. हरिचरण म्हणाले.

“ताप हा सामान्यत: संसर्गामुळे होतो. ओले सॉक्स या पद्धतीसारखे घरगुती उपचार अल्पकालीन आराम देऊ शकतात, परंतु ते पारंपरिक वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत. तापाचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. सततच्या तापासाठी योग्य निदान आणि उपचार सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. हरिचरण म्हणाले.