हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे दमा किंवा श्वासाशी निगडित आजार असणाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज असते, इतकेच नाही तर अशा समस्या नसणाऱ्यांना देखील नव्याने काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हिवाळ्यातील धुके, वातावरणात होणारे बदल, प्रदुषण या कारणांमुळे दम्याचा आजार असणाऱ्या व्यक्तींचा त्रास आणखी वाढु शकतो. दम्याची रुग्णांनी हिवाळ्यात त्रास वाढू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या.
दम्याच्या त्रास असणाऱ्यांनी अशी घ्या स्वतःची काळजी
आणखी वाचा- Yearender 2022: यावर्षी ‘हे’ घरगुती उपाय झाले सर्वाधिक सर्च; यातला तुम्ही कोणता उपाय केला होता सर्च?
- दमा वाढू शकतो असे वातावरणात बदल होत असतील, तर त्याचा आधीच अंदाज बांधून त्यावर काय उपचार करता येईल याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या
- जर दमा ट्रिगर झाला म्हणजे त्रास खुप वाढला तर त्यावेळी कोणती औषधं घेणे गरजेचे असते, ती औषधं अशी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याआधीच जवळ ठेवावी. त्यामुळे ऐनवेळी तुम्हाला ती लगेच उपलब्ध होतील आणि त्रास कमी होण्यास मदत मिळेल.
- डॉक्टरांद्वारे देण्यात आलेला इन्हेलर नेहमी सोबत ठेवा. जर तुम्हाला कोणतीही वेगळी लक्षणं जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तापमानात सतत बदल होत असल्यास शक्य तितके बाहेर जाणे टाळावे.
- बाहेर जाताना मास्क वापरावा. ज्यामुळे थंड हवा, हवेतील धुलीकण यांपासून श्वसनलिकेचे संरक्षण करता येते.
- गरम पेयांचे सेवन करा, यामुळे श्वसनलिकेत होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळण्यास मदत मिळते.
- घरात धुळ जमा होणार नाही याची काळजी घ्या.
- जेवणाकडे विशेष लक्ष द्या. जेवणात ‘विटामिन डी’चा समावेश करा, ज्यामुळे दम्याच्या लक्षणांपासून सुटका मिळण्यास मदत होईल.
- इतर इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी दिवसभरात सतत हात पाणी आणि साबणाने स्वच्छ धुण्याची सवय लावा.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)