एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा हा अनुभव आहे, जिला नैसर्गिक गर्भधारणेसंबंधित समस्या जाणवत होत्या या महिलने तिची आरोग्यस्थिती लपवून ठेवली होती, कारण सर्वजण तिलाच दोष देतील असे तिला वाटत होते. पण, आता तिला बाळ हवे होते व नैसर्गिक गर्भधारणेच्या संकल्पनेमुळे ती घाबरलेली होती. अखेर तिने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवले.

जेव्हा अलिना रेड्डी (नाव बदलले आहे) प्रजनन तज्ज्ञ डॉ. अविवा पिंटो रॉड्रिग्स यांना भेटली, तेव्हा तिची शारीरिक समस्या समजून घेण्यात त्यांना खूप अडचण आली. अलिना तिच्या समस्येबद्दल सुरुवातीला स्पष्टपणे बोलत नव्हती. पण, खूप समजवल्यानंतर तिने सांगितले की, तिला स्पर्शाची भीती वाटते; कारण तिला योनी मार्गामध्ये एक विचित्र प्रकारचा घट्टपणा (vaginal tightness) किंवा योनी बंद (closed vagina) असल्याचे जाणवते. ज्यामुळे योनी कोणत्याही प्रकारचा प्रवेश नाकारते आणि कधीकधी येथे रक्तस्त्रावही होतो, त्यामुळे तिला आणखी दुखापत होईल या भीतीने तिने तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांना ओटीपोटाची तपासणीही (pelvic exam) करू दिली नाही.

Is it possible to be pregnant without a baby bump
बेबी बंपशिवाय महिला गर्भवती राहू शकते का? खरंच हे शक्य आहे का? वाचा तज्ज्ञ काय म्हणाले…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Loksatta chaturang Menstruation Women Life
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : समाप्तीचे ‘सेलिब्रेशन’
Prenatal diagnosis of well developed fetus in fetu
महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळ!.. काय आहे ‘फिट्स इन फिटू’ हा दुर्मिळ प्रकार?
Woman with baby in babys belly gives birth safely
‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…
Woman to High Court for seeking abortion due to marital dispute
वैवाहिक कलहामुळे महिलेची गर्भपाताच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव
buldhana after multiple checks woman had baby in her womb and another in baby s stomach
धक्कादायक! गर्भवतीच्या पोटात बाळ आणि… बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘!! अतिदुर्मिळ प्रकार
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?

हे प्रकरण तसे विचित्र नाही, फक्त याबाबत महिलांना फारशी माहिती नसते. पण, अनेक तरुणींना या समस्येमुळे वैवाहिक जीवनात त्रास सहन करावा लागतो. या स्थितीला व्हॅजेनिसमीस (vaginismus) असे म्हणतात; जी योनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रवेशाच्या भीतीमुळे निर्माण होणारी शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. कधी कधी ही स्थिती आयुष्यात खूप नंतरही विकसित होऊ शकते. परंतु, यामागे मानसिक परिणाम खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो. कारण ते स्त्रीला कोणाशीही लैंगिक संबंध निर्माण करण्यापासून रोखते”, असे डॉ. रॉड्रिग्स यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – मेटाबॉलिजम कशामुळे प्रभावित होते? डॉक्टरांकडून जाणून घ्या तुम्ही काय केले पाहिजे?

डॉ. रॉड्रिग्स सांगतात की, ही स्थिती कशामुळे उद्भवते याबाबत बरेच रुग्ण अजूनही सांगताना संकोच करतात. यामागे एक निश्चित कारण नाही, पण स्थिती अनेकदा शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आणि एक प्रकारच्या भीतीमुळे निर्माण होते. यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की, चिंता(anxiety disorders), योनी मार्गातील झीज (vaginal tears) (ही योनीच्या ऊतींमध्ये झालेली जखम) किंवा आयुष्यात पूर्वी झालेल्या दुखापतींचा परिणाम, एखादी शस्त्रक्रिया, लैंगिक शोषण, बलात्कार किंवा मानसिक आघात अशा घटनांमुळेदेखील जोडीदाराबरोबर जवळीक निर्माण करण्यासाठी भीती वाटणे किंवा नकारात्मक भावना निर्माण होते. तसेच रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांना (post-menopausal ), vaginal atrophy होऊ शकतो, कारण योनीचे अस्तर पातळ आणि कोरडे होते”, “ स्कार थेरपी (ही लेझर किंवा लाइट थेरपी, ज्यामध्ये जास्त प्रमाणात डागांच्या ठिकाणी लालसरपणा कमी करू शकतात) किंवा रेडिएशन थेरपी ( हा एक प्रकारचा कर्करोग उपचार आहे.) सारखी आणखी कारणे असू शकतात.

अलिनाच्या बाबतीत कोणताही अत्याचाराचा इतिहास नव्हता; परंतु तिला काही मानसिक समस्या होती आणि थोड्या फार वेदनाही सुरू झाल्या होत्या, ज्यामुळे तिची योनी बंद झाली होती. तरीही तिला एक बाळ हवे होते आणि तिच्या पतीने प्रजनन तज्ज्ञांकडे जाण्याचे ठरवले. त्याने तिला खूप आधार दिला आणि तिच्या सुरुवातीच्या वैद्यकीय तपासणीत तो नेहमी तिच्याबरोबर उपस्थित होता. तिच्या वैद्यकीय तपासणीत कोणतीही शारीरिक विकृती आढळून आली नाही. नंतर लक्षात आले, तिचा पती नोकरीच्या असाइनमेंटसाठी मोठ्या प्रमाणात प्रवास करत असल्याने तिला एका मोठ्या कुटुंबात एकटेपणा जाणवत होता. तिने स्वत:ला एका वर्तुळात सामावून घेतले होते, ज्यामुळे तिची स्थिती आणखी अवघड झाली होती. तरीही तिचा पती आजूबाजूला असताना डॉक्टरांकडून physical manipulation थेरपी घेताना ती प्रतिसाद देत होती. त्यामुळे तिची भीती नवऱ्याचा सहवास नसल्यामुळे उद्भवली होती, ज्यामुळे त्यांना शारीरिक जवळीक निर्माण करता आली नाही”, असे डॉ. रॉड्रिग्स यांनी सांगितले.

हेही वाचा – हाताच्या कोपराला दुखापत झाल्यानंतर इतक्या वेदना का होतात? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

डॉ. रॉड्रिग्स यांनी सांगितले की, “ सुरुवातीला तपासणीदरम्यान ती हायपरव्हेंटिलेटेड होती आणि तिला प्राथमिक योनी मार्गाचा दाह (primary vaginitis) असल्याचे निदान झाले. परीक्षेदरम्यान ती अक्षरश: किंचाळली. प्रथम आम्ही योनी मार्गात झालेला दाह किती झाला, हे समजून घेण्यापासून सुरुवात केली आणि तिच्या योनी मार्गाच्या स्नायूंचा पटकन येणारा प्रतिसाद कमी करण्याचा प्रयत्न केला. जरी अलीना अत्यंत चिंतेत होती, तरीही जेव्हा योनीमध्ये कॅथेटर टाकल्यानंतर ती सहकार्य करत होती. यातून एक चांगली गोष्ट समोर आली की, योनीमध्ये कोणत्याही प्रवेशाच्या कल्पनेबद्दल तिची भीती कमी झाली आहे. त्यानंतर अलिना आणि तिच्या पतीचे वैयक्तिकरित्या आणि एकत्रिपणे समुपदेशन केले. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी वापरून, समुपदेशक आणि स्त्रीरोगतज्ज्ञांनी त्यांच्या समस्येवर एकत्रितपणे काम केले. दरम्यान, पेल्विक फिजिओथेरपिस्टने तिची भीती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि तिला स्वतःच्या शरीराला स्पर्श करण्यास मदत केली. हळूहळू तिच्या प्रकरणात प्रगती दिसून आली आणि आता सुमारे एक वर्षाच्या थेरपी आणि देखरेखीनंतर असे म्हणू शकतो, ती नैसर्गिकरित्या गर्भवती झाली आहे.”

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक मंद गतीने फॅटस् का बर्न होतात? तज्ज्ञांनी सांगितले कारण…

…तर थेरपीमध्ये काय समाविष्ट आहे?

  • प्राथमिक उपचार : यामध्ये क्रीम आणि ल्युब्रिकंट्सचा वापर सुरू करतात.
  • पेल्विक फ्लोअर फिजिकल थेरपी : यामध्ये व्यायामाचा एका फेरीचा समावेश असतो, जिथे तुमचा ट्रेनर तुम्हाला स्नायू शिथिल करण्याचे व्यायाम शिकवतो, जे तुम्हाला तुमच्या योनीच्या प्रतिसादांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल.
  • व्हजायनेल डायलेटर थेरपी : योनी मार्गाच्या स्नायूंना ताणण्यासाठी आणि योनी मार्गात कोणत्याही प्रवेशाबाबत रुग्णाला अधिक आरामदायक बनविण्यासाठी हे एक manipulation device आहे.
  • कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) : हे चिंता, नैराश्य आणि कोणत्याही प्रकारचे पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) हाताळण्यास मदत करते आणि तुमच्या मनाला भीतीवर मात करण्यास प्रशिक्षित करते.

Story img Loader